वृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागसरकारी योजनास्कॉलरशिप - शिष्यवृत्तीस्पर्धा परीक्षा

RTE 25% Admission Guidelines : आरटीई प्रवेशाबाबत प्राथमिक शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना !

प्राथमिक शिक्षण विभागाने (Right to Education Act) शिक्षक हक्क कायद्याअंतर्गत RTE 25% (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राधान्यक्रम ठरविला आहे. आता संबंधित बालकांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या शाळेत मुलांना प्रवेश मिळणार आहे.

RTE 25% Admission Guidelines : आरटीई प्रवेशाबाबत प्राथमिक शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना !

प्राथमिक शिक्षण विभागाने आरटीई अंतर्गत २५ टक्के (RTE 25% Admission) राखीव जागांवरील प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या त्यानुसार वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के राखीव जागांअंतर्गत महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, कॅन्टोमेंट बोर्ड, जिल्हा परिषद (प्राथमिक), महापालिका (स्वयंअर्थसहाय्यित), जिल्हा परिषद (माजी शासकीय), खासगी अनुदानित (अंशत: अनुदानित वगळून) आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश मिळणार आहे.

यामध्ये अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या आत अनुदानित शाळा, सरकारी शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा नसल्यास तीन किलोमीटरच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले जाईल. विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून, शिक्षण विभागाने सांगितले आहे.

>

RTE 25 टक्के नावनोंदणीनुसार प्राधान्य देताना सर्व प्रकारच्या शाळा जसे की अनुदानित शाळा, सरकारी/स्थानिक संस्था शाळा आणि विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर अंतरावरील स्वयं-वित्तपोषण शाळा उपलब्ध असतील. शाळांना प्राधान्य दिले आहे. त्यानुसार लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

RTE 25% प्रवेशाबाबत पालकांसाठी महत्त्वाचे:

  • पालकांना अनुदानित शाळांऐवजी शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची निवड करता येणार.
  • यापूर्वी आरटीईअंतर्गत प्रवेश घेतला असल्यास त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  • अर्ज भरताना चुकीची माहिती भरून प्रवेश घेतल्यास प्रवेश रद्द होईल.
  • पालकांनी आरटीई पोर्टलवरील माहितीवर लक्ष ठेवावे.

असा असेल क्रम

  • अनुदानित शाळा.
  • शासकीय शाळा/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा.
  • स्वंयअर्थसहाय्यित शाळा.

RTE 25% प्रवेशासाठी कागदपत्रे:

सन 2024-25 या वर्षी करिता RTE 25 % प्रवेश प्रक्रिये अंतर्गत RTE प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन सोमवार दिनांक 04/03/2023 पासून सुरु आहे. सर्व (RTE 25% Admission) आरटीइ 25 टक्के प्रवेश पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी. तसेच शाळांकरिता निर्धारित करुन दिलेल्या वेळेत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

Rte २५ % प्रवेश सन २०२४-२५ साठी ऑनलाईन अर्ज पोर्टल:

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील महाराष्ट्र शालेय शिक्षण RTE २५% आरक्षण प्रवेश पोर्टलला भेट द्या.

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

हेही वाचा – सरकारी योजना किंवा सरकारी कामे असो; मोबाइलमध्ये नक्की ठेवा हे ३ ॲप्स! Best 3 Mobile Apps for Government Schemes and Works

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.