उद्योगनीतीकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागवृत्त विशेष

काजू पिकावरील कीड रोग व्यवस्थापन ! Management of pest diseases on cashew crop!

काजू पिकावर कीड रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. या रोगामुळे उत्पादनावर परिणाम होणार असल्याने काजू पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

काजू पिकावरील कीड रोग व्यवस्थापन ! Management of pest diseases on cashew crop:

काजू पिकावरील कीड व रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयाबाबत प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती केली जात आहे. कोकण किनारपट्टीलगत या आठवड्यात सुद्धा थंडीचा प्रभाव कमी प्रमाणात आहे. काही ठिकाणी हवामान ढगाळ व दाट धुक्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बऱ्याच काजू बागा मोहोर व फळधारणेच्या अवस्थेमध्ये असून शेतकरी वर्गाने आपल्या काजू बागाचे नियमितपणे कीड-रोगाचे सर्वेक्षण करून त्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या वर जाणार नाही याची काळजी घेऊन उपाययोजना करावे. काजू मोहोर, काजू बोंडू व बियांचे संरक्षण करावे लागणार आहे. धुक्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आवश्यकता असल्यास बुरशीनाशकाचा वापर करावा.

काजू पिकावरील किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. काजू पिक एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापनात ढेकण्या म्हणजेच टी मॉस्किटो बग बागेचे वेळोवेळी सर्वेक्षण करून नवीन मोहोर, फळ यांची पाहणी करावी. मोहोर, बिया काळपट आढळल्यास किंवा प्रादूर्भाव ५ टक्क्यापेक्षा जास्त दिसून आल्यास विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार प्रोफेनोफॉस १० मिली मोहोर फुटल्यावर किंवा अॅसिटामिप्रिड ५ मिली किंवा लॅम्डा सायहॅलोथ्रिन ६ मिली प्रति १० लिटर फळधारणा अवस्थेत पाण्यातून यापैकी एका कीटकनाशकांची फवारणी करावी. थंडीच्या महिन्यात लिकॅनीसियम लिकॅनी या जैविक बुरशीचा वापर ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे.

फुलकिडीचा मोहोर, काजू बी आणि बोंडूवर भुरकट रंगाचे चट्टे आढळल्यास अथवा बियाचा आकार वेडावाकडा झालेला आढळल्यास किंवा प्रादूर्भाव १० फुलकिडी प्रती मोहोर, काजू बी आणि बोंडूवर दिसून आल्यास विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार ढेकण्या नियंत्रणासाठी फवारणी केली असल्यास वेगळे किटकनाशक वापरण्याची गरज नाही. थंडीच्या महिन्यात लिकॅनीसियम लिकॅनी जैविक बुरशीचा वापर ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून वापरावे.

खोडकिडा यावर उपाययोजना करताना बाग स्वच्छ ठेवावी. झाडाची ठराविक कालावधीने व्यवस्थित पाहणी करावी. झाडाला कीड लागलेली आढळून आल्यास पटाशीच्या सहाय्याने साल काढून शक्य तेवढ्या अळ्या काढून नष्ट कराव्यात. प्रादूर्भावामुळे मेलेली किंवा संपूर्ण पिवळी पडलेली झाडे मुळासकट खणून काढून अळी व कोष यांचा नायनाट करावा. प्रादुर्भाव प्राथमिक अवस्थेत असताना प्रादूर्भित खोडाची साल काढून आतील अळ्या नष्ट कराव्यात. नुकसानग्रस्त भाग तसेच झाडाचा बुंधा आणि माती क्लोरपायरिफॉस २५ मिली किंवा फिप्रोनिल १० मिलि प्रति ५ लिटर पाण्यात मिसळून भिजवावा.

काजू बोंडू व बी पोखरणारी अळीवर लॅम्डा सायहॅलोथ्रिन ६ मिली प्रति १० लिटर फळधारणा अवस्थेत पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढेकण्या नियंत्रणासाठी तिसऱ्या फवारणीदरम्यान वरील कीटकनाशक वापरले असल्यास पुन्हा वापरू नये. करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड २० ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १० मिली किंवा अॅसिटामिप्रिड ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून याची मिश्र फवारणी करावी किंवा १ टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

पॉवर स्प्रेयरने फवारणी करताना कीटकनाशकाचे प्रमाण दुप्पट घ्यावे. फवारणी शक्यतो सकाळी १० वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी ४ वाजल्यानंतर करावी. सतत एकाच कीटकनाशकाचा वापर टाळावा.

फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना काजू पिकावरील किड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी उपाययोजना सुचविण्यात येत आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन फलोत्‍पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी केले आहे.

हेही वाचा – महाडीबीटी पोर्टलवर फळबाग लागवड अनुदान (फलोत्पादन) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.