वैयक्तिक लाभाच्या विविध योजना – जिल्हा परिषद पुणे
पुणे जिल्हा परिषद पुणे, कृषि विभागाअंतर्गत जिल्हा परिषद निधी अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविणेत येत आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजना राबवितांना शासनाच्या ५ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार थेट लाभ हस्तांतरण ( DBT ) या पध्दतीने राबविणेत येणार आहेत. कृषि विभागाच्या विषय समितीने निश्चित केलेल्या अटी व शर्तीनुसार पात्र असणा-या व अंतीमतः मान्यता दिलेल्या पात्र व गरजु लाभार्थ्यांना विहीत बाबींचा लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनांविषयी खालील तक्त्यात थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ, संबंधित सर्व पंचायत समित्या व ग्रामपंचायतीत उपलब्ध आहे. विहीत निकषां प्रमाणे पात्र लाभार्थ्यांकडुन खालील योजनांसाठी दि. २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज कागदपत्रासहित ऑफलाईन पध्दतीने मागविणेत येत आहेत. विहीत मुदतीत अर्ज व कागदपत्रे संबंधित पंचायत समिती कार्यालयात मुदतीत जमा करावयाचे आहेत.
वैयक्तिक लाभाच्या विविध योजना – जिल्हा परिषद पुणे:
1) ७५ % अनुदानावर शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणे.
- ३ एच.पी.ओपनवेल विदयुत मोटार पंपसंच
- ५ एच. पी. ओपनवेल विदयुत मोटार पंपसंच
- ७.५ एच.पी. ओपनवेल विदयुत मोटार पंपसंच
- २ एच.पी. इलेक्ट्रीक कडबाकुट्टी यंत्र मोटारसह ( हॉरिझॅटल मॉडेल )
- ५ एच. पी. डिझेल इंजिन पंपसंच
- प्लॅस्टिक क्रेटस २० किलो क्षमता
- प्लॅस्टिक ताडपत्री ( हूक जॉईन्ट ६x६ मिटर )
- ७५ एमएम पी.व्ही.सो. पाईप ४kg/cm2
- ९० एमएम इंची पी.व्ही.सी. पाईप ४kg /cm2
- ७५ एमएम एच.डी.पी.ई. पाईप ३.२kg /cm2
- क्लीपसह किंवा क्लीपविरहीत
- ट्रॅक्टरचलित दोन फाळी सरोरिजर
- बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप
- हॉरिझेंटल ट्रिपल पिस्टन स्प्रेपंप ऑईल इंजिनसह
लाभाचे स्वरुप: विहित मापदंडाचे साहित्य खरेदी केल्यानंतर खरेदी समितीने निश्चित केलेल्या रक्कमेच्या ७५% अनुदानास पात्र खरेदी रोखीने किंवा कॅशलेस पद्धतीने करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे:
१. संबंधित शेतकऱ्याने विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रांच्या ( ७/१२, ८ अ दाखला, आधार कार्ड ओळखपत्र ) स्वयंसाक्षांकित प्रती सादर करावयाच्या आहेत.
२. लाभार्थ्याचे धारण क्षेत्र जास्तीत जास्त १० एकर पर्यंत असावे. अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना प्राधान्य ( ८ अ किंवा तलाठी यांचा भुधारक दाखला ).
३. योजनेंतर्गत लाभार्थ्यास जास्तीत जास्त एक औजारासाठी लाभ देण्यात येईल.
४. सदर योजनेंतर्गत पी.व्ही.सी. व एच.डी.पी.ई. पाईपचा लाभ प्रति लाभार्थ्यास जास्तीत जास्त २० पाईप ( १२० मीटर ) व प्लॅस्टीक क्रेटस् या बाबीसाठी प्रती लाभार्थ्यास जास्तीत जास्त ३० नग चा लाभ देण्यात येईल. विदयुत मोटार पंप संचाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीने सिंचन सुविधेची नोंद असलेला पुरावा देणे आवश्यक राहील. तसेच लाभार्थ्याने कडबाकुट्टी यंत्र या बाबीसाठी विजेची सोय असलेबाबत विज बिलाची साक्षांकित प्रत देणे आवश्यक राहिल.
५. आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँक पुस्तकाची छायांकित प्रत.
2) नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजना / परसवाग उभारणेस अर्थसहाय्य देणे:
१) नमुद योजनेतंर्गत शेतक-यांस गिर गाय / साहीवाल गाय खरेदीसाठी अनुदान, शेतकरी प्रशिक्षण / अभ्यास दौरा, गांडूळ खत निर्मिती सयंत्रे, जैविक खते / जैविक किटकनाशके, बायोडायनॅमिक खत युनिटसाठी निविष्ठा व प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन अनुदान, हिरवळीची खते ( ताग/ढेंचा बियाणे) व इत्यादी आवश्यक बाबीसाठी लाभ दिला जाईल.
२) सेंद्रिय शेती उत्पादन प्रमाणिकरण करणे. कर्नव्हर्जन ] वर्ष १, २, ३
३ ) नमूद योजनेंतर्गत गाय या घटकाचा लाभ देत असताना प्रति शेतकऱ्यास गाय खरेदी किंमतीच्या ७५% किंवा रु.४५,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल तो अनुदान म्हणून देय राहील.
४) नमूद योजनेंतर्गत गायीसह अन्य सर्व घटकांचा लाभ घेतल्यासचं प्रति लाभार्थी शेतकऱ्यास प्रोत्साहन अनुदान देय राहिल व त्यांची मर्यादा रु.६५,०००/- इतकी राहिल.
लाभाचे स्वरुप: विहित मापदंडाचे साहित्य व नमूद प्रजातीची गाय खरेदी केल्यानंतर खरेदी समितीने निश्चित केलेल्या रक्कमेच्या अनुदानास, मात्र जास्तीत जास्त रु. ६५,०००/- अनुदानास पात्र. खरेदी रोखीने किंवा कॅशलेस पध्दतीने करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे:
१. नमुद योजनेतंर्गत लाभ घेणा-या शेतक-यांकडे किमान एक एकर जमिन असावी.
२. योजनेंतर्गत लाभार्थीने सेंद्रिय शेती करण्यास तयार असलेबाबत प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक राहील.
३. सदर योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थींनी स्वयंस्फुर्तीने स्वतःच्या शेतावर कंपोस्टींग, सोनखत, जैविक खते, निंबोळी पेंड, जिवामृत दशपर्णी अर्क इत्यादी जैविक बाबींचा अवलंबन करणे अपेक्षित आहे.
४. शेतक-यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी व त्याची नोंद ७/१२ उता-यावर असावी.
५. संबंधित शेतकऱ्याने विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रांच्या ( ७ / १२. ८ अ दाखला, आधार कार्ड ओळखपत्र ) स्वयंसाक्षांकित प्रति सादर करावयाच्या आहेत.
६. अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना प्राधान्य. ( ८ अ) किंवा तलाठी यांचा दाखला.
७. आधार कार्डशी बँकपुस्तकाची छायांकित प्रत.
३) शेतक-यांना ७५% अनुदानावर सोलर वॉटर हिटर संयत्र २०० लिटर क्षमता
( अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत निर्माण करणे व सौर प्रकल्प कार्यान्वित करणे योजना. ):
लाभाचे स्वरुप: विहित तांत्रिक मापदंडाचे सोलर वॉटर हिटर संयंत्र लिटर २०० क्षमता खरेदी केल्यानंतर खरेदी समितीने निश्चित केलेल्या रक्कमेच्या ७५% अनुदानास पात्र. खरेदी रोखीने किंवा कॅशलेस पध्दतीने करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे:
१. संबंधित जोडणी केलेल्या शेतक-याने विहीत कालावधीत आवश्यक कागदपत्रांच्या ( ७/१२. ८ अ दाखला, आधारकार्ड / ओळखपत्र, स्वयंसाक्षांकित प्रती सादर करावयाच्या आहेत.
२. लाभार्थी स्वतः शेतकरी असावा, धारण क्षेत्र जास्तीत जास्त १० एकर पर्यंत असावे.
३. अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना प्राधान्य. ( ८ अ किंवा तलाठी यांचा दाखला )
४. अनु. जाती / जमाती, इतर मागास, खुल्या वर्ग संवर्गातील शेतकरी २०० लि. प्रतिदिन क्षमतेचे सयंत्र मिळण्यास पात्र राहतील.
५. MNRE / MEDA मान्यता प्राप्त उत्पादकांकडून सदरचे सोलर वॉटर हिटर सयंत्र खरेदी करणे बंधनकारक आहे.
६. सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यास एकाच सयंत्रासाठी लाभ देण्यात येईल.
७. आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँक पुस्तकाची छायांकित प्रत.
४) ” शारदा ” शेतकरी माता भगिनी अर्थसहाय्य योजना.
( पुणे जिल्हयात वास्तव्य व शेतजमिन असणा-या विधवा शेतकरी महिला, घटस्फोटीत शेतकरी महिला, परितक्त्या शेतकरी महिला व निराधार शेतकरी महिला ) –
लाभाचे स्वरुप: पात्र महिला लाभार्थीच्या बँक खात्यात रक्कम रू. च्या ५०००/- मर्यादेत प्रोत्साहनपर अनुदान जमा करणे.
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे:
१. विधवा शेतकरी महिला / घटस्फोटीत शेतकरी महिला / परितक्त्या शेतकरी महिला / निराधार शेतकरी महिलांनी विहीत कालावधीत आवश्यक कागदपत्रांच्या ७/१२. ८ अ दाखला, आधार कार्डच्या स्वयंसाक्षांकित प्रत.
२. सदर योजनेचा लाभ हा सर्व प्रवर्गातील शेतकरी महिलांना च लागू राहील.
३. योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलेचे वय मर्यादा १८ ते ६५ पर्यंत असणे आवश्यक राहील.
४. कुटूंबातील व्यक्ती / अर्जदार स्वतः शासकीय / निमशासकीय सेवेत नसावी.
५. विधवा असल्याचा दाखला यासाठी नवऱ्याच्या मृत्यु नोंद दाखल्यासोबत पुनर्विवाह न केल्याचे स्वघोषणापत्र देण्यात यावे. परितक्त्या /घटस्फोटीत असल्यास यासाठी मा. न्यायालयाचे अथवा सक्षम प्राधिकाऱ्याचे नवऱ्याने सोडल्याचे / नवऱ्यास सोडल्याचे आदेशासोबत स्वघोषणापत्र देण्यात यावे. निराधार महिला असल्यास तलाठी / मंडल निरिक्षक यांनी दिलेला तात्पुरते रहिवासी असल्याबातचे प्रमाणपत्र व ग्रामसेवक यांचेकडील निराधार असलेबाबतचा दाखला.
६. आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँक पुस्तकाची छायांकीत प्रत, ( खाते चालु स्थितीत आवश्यक )
७. लाभार्थी शौचालय वापरात असलेबाबतचे स्वघोषणापत्र,
उपरोक्त सर्व योजनांतर्गत पुरविण्यात येणारे साहीत्य हे लाभार्थ्याने प्रथम स्वखर्चाने घेण्याचे आहे. परंतु असे साहित्य घेण्यापूर्वी अर्जदाराने केलेल्या अर्जाची पात्रता तपासून प्रथम हेतुपत्र ( EOI ) दिले जाईल व अशा हेतुपत्रात विहित केलेल्या मुदतीत खरेदी समितीने निश्चित केलेल्या मापदंडाचे साहित्य लाभार्थ्याने स्वतः खरेदी करुन त्याचे पुराव्या दाखल जी. एस. टी. ( GST ) धारक पुरवठादाराकडील विक्री पावत्या सादर करणे बंधनकारक राहील. त्याचप्रमाणे असे खरेदी केलेल्या साहित्याची गुणवत्ता जिल्हा परिषदेकडुन निश्चित केलेल्या कार्यपध्दतीने तपासली जाईल व साहित्य विहित गुणवत्ते बरहुकुम आहे असे दिसून आल्यास लाभार्थ्याच्या बँक खात्यात पात्र अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाईल. यासाठी सर्व लाभार्थ्यांनी खालील अतिरिक्त कागदपत्र अर्जासोबतच सादर करणे बंधनकारक आहे.
१ ) लाभर्थ्याचे बँकेतील खात्याचा पुरावा दर्शविणारे खाते पुस्तकाची प्रत, बँकेचे नाव, पत्ता, खाते नंबर व आय.एफ.एस.सी. कोड, खाते बंद नसावे.
टिप : –
१. सदर योजनेचे विहीत नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालयात व जिल्हा परिषद संकेतस्थळावर उपलब्ध आहेत व अर्ज भरून पंचायत समिती कार्यालयात जमा करावयाचे आहेत.
२. उपरोक्त योजनांतर्गत एकाच बाबीसाठी लाभार्थ्यांनी अर्ज करावयाचा आहे.
३.लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय यांचेकडे दि. २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत जमा करावयाचे आहे.
४. लाभार्थी निवडीचा अंतिम अधिकार कृषि समिती सभेस राहील.
५. अर्जासोबत जोडलेली माहिती चुकीची अथवा खोटी आढळल्यास लाभार्थ्यास मिळालेला लाभ १००% वसुल करणेत येईल. अधिक माहितीसाठी नजीकच्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. ” निधीचे उपलब्धतेनुसार लाभार्थी निवड कमी जास्त होऊ शकते.
ऑफलाईन अर्ज (Application Form) आणि सविस्तर माहिती: ऑफलाईन अर्ज आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!