दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयवृत्त विशेष

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ‘मशीन-टू-मशीन दूरसंवादासाठी एम्बेडेड सिमचा वापर’ करण्याबाबतच्या शिफारशी केल्या जारी !

ट्राय, अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI)  आज ‘मशीन-टू-मशीन (एम2एम) दूरसंवादासाठी एम्बेडेड सिमचा वापर’ म्हणजेच दोन उपकरणांमधील संपर्कासाठी उपकरणाचा भाग असलेल्या सीम कार्डचा वापर करण्या संदर्भातील शिफारशी जारी केल्या.

दूरसंचार विभागाने (DoT) 09.11.2021 रोजी लिहिलेल्या पत्रातून, ट्राय कायदा, 1997 अंतर्गत एम2एम संपर्कासाठी एम्बेडेड सिम वापरण्यासंदर्भात ट्राय कडून शिफारशी मागितल्या होत्या. त्या अनुषंगाने, ट्राय ने 25.07.2022 रोजी ‘एम2एम संपर्कासाठी एम्बेडेड सिमच्या वापराबाबत’ भागधारकांकडून सूचना/सूचनांवरील प्रतिसाद मागवण्यासाठी सल्लामसलत पत्र जारी केले. त्याला प्रतिसाद देत, 15 भागधारकांनी आपला अभिप्राय सादर केला. सल्लामसलत पत्रावरील चर्चेसाठी 14.12.2022 रोजी दृकश्राव्य माध्यमातून खुले सत्र आयोजित करण्यात आले होते. भागधारकांकडून मिळालेला अभिप्राय/सूचना, या विषयावरील विस्तृत चर्चा आणि स्वतःच्या विश्लेषणावर आधारित शिफारशींना ट्राय ने अंतिम रूप दिले आहे.

देशात 5G सेवा सुरू झाल्यावर, एम2एम व्यवस्थेसाठीच्या संधी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, त्यामुळे कृषी, वाहतूक, आरोग्यसेवा आणि औद्योगिक ऑटोमेशन (स्वयंचलित प्रणाली) यांसारख्या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये त्याचा वापर करायला मोठा वाव आहे. भारतात एम2एम एम्बेडेड सिम (eSIM) साठीची नियामक चौकट सुव्यवस्थित करणे, हे या शिफारशींचे उद्दिष्ट आहे. या शिफारशींद्वारे, प्राधिकरणाने ‘ग्राहकाला योग्य प्रकारे ओळखून (KYC) सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर भर दिला आहे. यामुळे, नेटवर्कची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, फसवणुकीचे धोके कमी करण्यासाठी आणि एम2एम ई-सिम (eSIM) व्यवस्थेची एकूण अखंडता वाढवण्यासाठी आवश्यक आहे. प्राधिकरणाने ई-सिम चे प्रोफाइल स्विचिंग (वापरकर्ता बदल) आणि SM-SR स्वॅपिंगसाठी (अदलाबदल) नियामक चौकटीची देखील शिफारस केली आहे.

केंद्र सरकारने केलेल्या या शिफारशींची अंमलबजावणी केल्याने  भारताच्या दूरसंवाद क्षेत्रातील मशीन ते मशीन ई सिम या व्यवस्थेला सुव्यवस्थितरीत्या चालना मिळेल आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मित एम टू एम ई सिम व्यवस्थेचा देशात विकास होईल, परिणामी आधुनिक एम टू एम संवाद पद्धतीचीही वाढ होईल.

या शिफारशींची काही प्रमुख वैशिष्ट्ये अशी आहेत:

  1. भारतात आयात केलेल्या उपकरणामध्ये आंतरराष्ट्रीय  रोमिंगवर बसवलेल्या कोणत्याही एम टू एम ई सिम वरील सर्व संवाद प्रोफाइल,  एम टू एम ई सिम वर आंतरराष्ट्रीय रोमिंग सक्रिय झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत किंवा उपकरणाची मालकी बदलल्यावर, यापैकी जे आधी असेल त्या अवधीत अनिवार्यपणे भारतीय दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या (TSPs) संवाद प्रोफाइलमध्ये पुन्हा  अस्तित्वात आणले जातील अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे.
  2. युनिफाइड ऍक्सेस सेवा परवानाधारक, युनिफाइड परवाना (प्रवेश सेवा कायदेशीर परवानगी)धारक, युनिफाइड परवाना (मशीन-टू-मशीन कायदेशीर परवानगी)धारक आणि भारतात सबस्क्रिप्शन मॅनेजर-सिक्योर राउटिंग (SM-SR) अर्थात माहिती प्रसारित करण्यासाठी सुरक्षित मार्ग प्रदान करणाऱ्यासाठी मालकी हक्क आणि माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशिष्ट परवानगी देऊन M2M सेवा प्रदाते (M2MSP) नोंदणी असलेल्या कंपन्यांना भारतात SM-SRs च्या मालकीची आणि त्याच्या व्यवस्थापनाची परवानगी दिली पाहिजे.
  3. भारतात आयात केलेल्या उपकरणांमध्ये बसवलेल्या एम-टू-एम ई सिम्सवर भारतीय दूरसंचार सेवा प्रदात्यांचे प्रोफाइल स्थापित करण्यासाठी, संबंधित मूळ उपकरण उत्पादक (OEM) आणि M2MSP यांना परदेशी SM-SR मधून भारतीय SM-SR मध्ये रूपांतरित केल्यानंतर (i) सध्याच्या (परदेशी) SM-SR द्वारे एम टू एम ई सिम साठी भारतीय दूरसंचार सेवा प्रदात्यांचे सबस्क्रिप्शन मॅनेजर-डेटा सुसज्जता (SM-DP) किंवा (ii) भारतीय सेवा प्रदात्यांच्या SM-DP वरून एम टू एम ई सिम मध्ये नवीन (भारतीय) SM-SR द्वारे प्रोफाइल डाउनलोड करण्यासाठी निवडण्याची लवचिकता दिली पाहिजे.
  4. एम2एमएसपी नोंदणीकृत/दूरसंचार सेवा परवानाधारक, ज्यांचे एसएम -एसआर  भारतात एम2एम ई सिम्स  नियंत्रित करते, त्यांनी परवानाधारक दूरसंचार सेवा प्रदात्याच्या म्हणजेच संबंधित  ओईएम / एम2एमएसपीच्या विनंतीनुसार, परवानाधारक दूरसंचार सेवा प्रदात्याच्या एसएम-डीपीसह, ज्यांचे प्रोफाइल अशा एम 2एम ई सिम्समध्येजोडले जाणार आहेत,  त्यांनी एसएम-डीपीसह एसएम -एसआरचे (सदस्यता व्यवस्थापन सुरक्षित राउटिंग)एकत्रीकरण नाकारू नये. एसएम -एसआरचे एसएम-डीपीसह एकत्रीकरण,जीएसएमएच्या वैशिष्ट्यांनुसार करण्यात यावे आणि संबंधित ओईएम /एम2एमएसपीकडून औपचारिक विनंती मिळाल्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केले जावे.
  5. एम2एमएसपी  नोंदणीकर्ता/ दूरसंचार सेवा परवानाधारक, ज्यांचे एसएम -एसआर  भारतात एम 2एम ई सिम्स  नियंत्रित करते, त्यांनी संबंधित ओईएम / एम2एमएसपीच्या विनंतीनुसार, भारतात एसएम- एसआर  ठेवण्यास पात्र असलेल्या दुसऱ्या कंपनीच्या  एसएम -एसआरसह त्याचे एसएम -एसआर अनिवार्यपणे बदलण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. असे एसएम -एसआर बदलणे जीएसएमएच्या वैशिष्ट्यांनुसार केले जावे आणि संबंधित ओईएम /एम2एमएसपीकडून औपचारिक विनंती प्राप्त झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केले जावे.
  6. याच्या  अंमलबजावणीतील आव्हाने लक्षात घेऊन, या टप्प्यावर, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाद्वारे (आयटीयु)भारतीय कंपन्यांना वितरीत  केलेल्या 901.XX IMSI मालिकेचा वापर एम2एम सेवा प्रदान करण्यासाठी परवानगी देऊ नये.

हेही वाचा – तुमच्या आधारकार्डवर किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत ते पहा ! – Telecom Analytics for Fraud management and Consumer Protection (TAF-COP) portal

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.