वृत्त विशेषसरकारी कामे

ट्राफिक पोलिसांनी वाहन टोइंग करण्याच्या कार्यपध्दती !

नो पार्किंगमध्ये वाहने पार्क केली असल्यास ती वाहने ‘टो’ करण्यापूर्वी व्हॅनने सायरन वाजवत अनाऊन्समेंट करणे आवश्यक आहे. मात्र टोइंग वाहनांवरील वाहतूक पोलिस सायरन वाजवत नसल्याचे निदर्शनास येत आहे. दुचाकी उचलून वाहतूक चौकीजवळ आणून चालकांकडून दंड आकारला जातो. या मनमानी कारभारामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांचे पोलिसांसोबत वादाचे प्रसंग घडतात. वाहने उचलण्यापूर्वी सायरन वाजवणे तसेच अनाऊन्समेंट करावी, असा नियम आहे. यामुळे वाहनचालकाला तिथल्या तिथे दंड देऊन गाडी सोडवता येते. पण या नियमाचे पालन केले जात असल्याने चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहने टो करत असताना तत्काळ सोडल्यास टोइंगचे शुल्क भरावे लागणार नसल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला असता. मात्र टोइंग करून वाहने पोलिस चौकीजवळ नेली जात असल्यामुळे हे शुल्क भरून दंड भरावा लागत आहे. वाहतूक पोलिसांकडून सायरन तसेच अनाऊन्सेंट करणे आवश्यक आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी तसे केल्यास वाहनचालक त्या ठिकाणी येऊन पोलिसांशी हुज्जत घालतात. त्यामुळे सायरन वाजवण्यात येत नाही.

ट्राफिक पोलिसांनी वाहन टोइंग करण्याच्या कार्यपध्दती :

वाहतुक उपविभागांना वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याकरिता या कार्यालयाकडुन कर्षित वाहनांची सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

उपलब्ध करून देण्यात आलेल्या कर्षित वाहनांच्या मालकांना उपविभागात नियुक्ती देताना प्रशासकीय अटी व शर्ती नुसार पत्र देण्यात आलेले असुन त्याची प्रत आपल्या उपविभागांना देण्यात आलेली आहे.

कर्षित वाहनावरील अंमलदारास कर्तव्य संबंधाने सुचनांचा कार्यालयीन आदेश देण्यात आलेला आहे. त्यानुसार अटी व शर्ती त्याचप्रमाणे अंमलदारास कर्षित वाहनांवरील कर्तव्याबाबत देण्यात आलेल्या सुचनेनुसार कर्षित वाहनांची कारवाई करण्यात येते किंवा कसे यावर बारकाईने लक्ष देण्यात यावे.

मा. पोलीस सह आयुक्त, ठाणे यांनी कर्षित वाहनाव्दारे करावयाची कारवाई याचा हेतु वाहतुकीस होणारा अडथळा त्वरीत दूर करणे असून केवळ दंड आकारणे असा याप्रमाणे वाहन चुकीच्या पध्दतीने चुकीच्या ठिकाणी पार्क केल्याने आढळून आल्यास टो करण्यापूर्वी वाहन चालक त्या जागेवर उपलब्ध असल्यास दंडाची वसुली जागेवरच करावी. वाहन त्याच ठिकाणी मालकाच्या ताब्यात दयावे. ही कारवाई कमीत कमी वेळेत करण्यात यावी असे आदेशीत केले याची सर्वानी नोंद घ्यावी.

विभागीय सपोआ यांनी कर्षित वाहनासंबंधाने अंमलदारासाठी देण्यात आलेल्या सुचना वजा कार्यालयीन आदेशानुसार तसेच कर्षित वाहन नियुक्ती संबंधाने देण्यात आलेल्या अटी व शर्तीचे अनुपालन होते किंवा नाही याचा आढावा घ्यावा त्यासंबंधाने केलेल्या निरीक्षणाचा अहवाल त्रुटी, कसुरी या संबंधाने अहवाल इकडील कार्यालयात वेळीच पाठवावा.

पोलीसांनी वाहन टो करण्याबाबतची कार्यपध्दत (एसओपी) अधिक सुरळीत राबविण्याच्या दृष्टीने वाहतुक शाखेच्या अधिकाऱ्यांना / कर्मचारी यांना असे सुचित करण्यात येते की वाहने टोईंग करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की, त्या चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनचालकांना/ वाहतुकीस अडथळा आहे. अशावेळी तो अडथळा त्वरीत दूर करणे असा हेतू असून केवळ दंड आकारणे असे ध्येय नाही.

जर एखाद्या वाहन चालकाने आपली मोटार वाहन चुकीच्या पध्दतीने, चुकीच्या ठिकाणी पार्क केली असेल त्यांची वाहने टो करण्यापूर्वी अथवा टो करतांना त्या ठिकाणी तो वाहन चालक आला तर त्यांच्याकडून दंड वसूल करावा व वाहन टो न करता त्यांच्या ताब्यात दयावे.

यासंबंधीची कागदोपत्री कारवाई कमीतकमी वेळेत घटनास्थळी पूर्ण करण्यात यावी. तसेच वाहतुक शाखांनी चलन पध्दत अंमलात आणुन या प्रक्रियेच्या वेळेत अजून कपात करावी.

कर्षित वाहनावरील कर्तव्य संबंधाने अंमलदारास सूचना:

१. कर्षित वाहनावर नेमण्यात येणारा अंमलदार हा वरिष्ठ दर्जाचा अंमलदार नेमण्यात यावा.

२. कर्षित वाहनावरील अंमलदार हा कर्षित वाहनाचा प्रभारी असल्याने त्याच्या नियंत्रणाखाली कर्षित वाहनावरील चालक व कामगार काम करतील.

३. कर्षित वाहनांवरील अंमलदार कर्तव्य करित असताना वाहनावरील कारवाई करण्यापुर्वी मेगाफोनव्दारे उद्घोषणा करून त्यानंतर वाहन उचलून वाहन कर्षित वाहनांवर ठेवतील.

४ कर्षित वाहनाव्दारे कारवाई करत असताना वाहनाचा चालक उपस्थित राहिल्यास त्याच ठिकाणी अंमलदार कायदेशीर कारवाई करून सशुल्क दंडाची पावती जागेवरच देईल. वाहन उचलून घेऊन जाणार नाही व टोईंगचे चार्जेस घेणार नाही.

५. कर्षित वाहनावरील अंमलदारांनी वाहनावर केलेल्या कारवाई संबंधाने वाहन उचललेल्या ठिकाणी खडूने विभागाचे नाव लिहावे.

६. कर्षित वाहनावरील अंमलदारास कर्षित वाहनांना घातलेल्या अटी व शर्ती याची जाणीव करून देतील व त्याप्रमाणे चालक कामगार राहत असल्याची खात्री करतील.

७. कर्षित वाहनावरील अंमलदार तसेच चालक त्यावरील कामगार जनतेशी सौजन्याने वागतील कोणतेही उद्धट वर्तन करणार नाहीत.

८. कर्षित वाहनावरील अंमलदार हा कोणत्याही परिस्थितीत कारवाई करताना कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. कोणत्याही व्यक्तीचा फोन आला तरी कारवाई केल्याशिवाय वाहन सोडणार नाही.

९. कर्षित वाहनावरील अंमलदार अथवा प्रभारी अधिकारी यांना कर्षित वाहनावरील चालक व कामगार यांचेकडुन अटी व शर्ती यांचे उल्लंघन केल्याचे निर्देशनास आल्यास या कार्यालयात अहवाल सादर करतील.

१०. कर्षित वाहनावरील कामगार हा १८ वर्षावरील असावा तसेच स्वच्छ निळ्या गणवेशात निटनेटका असावा. केस, दाढी वाढलेली नसावी. रात्रीच्या वेळी स्वयंप्रकाशी गणवेश वापरतील.

११. कर्षित वाहनावरील कामगार हे कारवाई दरम्यान कोणत्याही प्रकारे मध्यस्थाची भूमिका करणार नाही किंवा स्वतःहुन निर्णय घेणार नाही.

१२. कर्षित वाहनावर Handy Cam असावा तसेच Handy Cam बॅकअप १० दिवसाचा असावा. सदर वाहनावरील कॅमेरेद्वारे झालेले चित्रीकरण वाहनमालकाने संग्रहित करून दर महिन्याला संबंधित प्रभारी अधिकारी यांच्याकडे अभिलेखावर ठेवतील.

हेही वाचा – व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल ११२ मध्ये समावेश !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.