कृषी योजनावृत्त विशेष

एकात्मिक कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देण्यासाठी राज्य शासन तीन वर्षांसाठी विशेष कृती योजना राबवित आहे. एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी राज्य पुरस्कृत विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे (mahadbt.maharashtra.gov.in) अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ही विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये पुढील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत. नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस, मेटाल्डीहाइड सोयाबीनसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत.

या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बियाणे, औषधे व खते या टाईल्स अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील.

जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

हेही वाचा – MIDH 2024-25 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
```html
Join Now
Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.