दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध ! Saksham-ECI App
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने जे ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग आहेत, अशा व्यक्तींसाठी आणि ८५ वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्धांना मतदान प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या ‘सक्षम’ ॲपच्या माध्यमातून अधिकच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
दिव्यांग मतदारांना सक्षम ॲपच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध ! Saksham-ECI App:
या ‘सक्षम’ ॲपवर दिव्यांग मतदारांसाठी खालील विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
- दिव्यांग म्हणून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध.
- नवीन मतदार नोंदणीसाठीची सुविधा उपलब्ध.
- मत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करणेची सुविधा उपलब्ध.
- मतदान केंद्र बदलाची सुविधा उपलब्ध.
- व्हील चेअरची विनंती करणेची सुविधा उपलब्ध.
- मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध.
- मतदान केंद्र जाणून घेणेची सुविधा उपलब्ध.
- तक्रारी नोंदविणेची सुविधा उपलब्ध.
- मतदान अधिकारी शोधणेची सुविधा उपलब्ध.
- बूथ लोकेटर स्थिती तपासणेची सुविधा उपलब्ध.
इतर सुविधा:
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व ठिकाणी मतदान केंद्र तळमजल्यावर असतील. तेथे पिण्याचे पाणी, प्रतिक्षा शेड, वैद्यकीय किट, सुलभ शौचालय, मतदान केंद्रांवर पुरेशी विद्युत रोषणाई, केंद्रांवर रॅम्प आणि व्हीलचेअरची सोय, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्याने प्रवेश सुविधा, स्वतंत्र रांगेची सुविधा, मानक चिन्हे आणि साइन बोर्ड. असतील.
मतदान केंद्रावर स्वयंसेवक सहाय्य उपलब्ध असणार आहे. अंध आणि अशक्त मतदारांच्या मतांची नोंद करण्यासाठी ईव्हीएम वर ब्रेल लिपीची व मदतनीसाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
सक्षम ॲपवर कोणती व्यक्ती नोंदणी करू शकतात?
सक्षम ॲपवर अंधत्व, अल्प दृष्टी, बहिरेपणा, कमी श्रवणशक्ती, शारीरिक व्यंग, मानसिक आजार (मानसिक सामाजिक अपंगत्व), कुष्ठरोग, बौद्धिक अपंगत्व, सेरेब्रल पाल्सी, बौनेत्व, मस्कुलर डिस्ट्रोफी, अॅसिड हल्ल्यातील बळी, भाषण आणि भाषेतील अपंगत्व, विशिष्ट शिकण्याची अक्षमता, ऑटिझम, स्पेक्ट्रम विकार, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि पार्किन्सन रोगासह क्रॉनिक न्यूरोलॉजिकल विकार, हिमोफिलिया, थैलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमियासह रक्त विकार आणि एकाधिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती नोंदणी करू शकतात.
सक्षम ॲप (Saksham-ECI App): सक्षम ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
हेही वाचा – आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर तक्रार करा ! cVIGIL App
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!