उद्योगनीतीवृत्त विशेष

झेंडूची फुले अशी विकून भरपूर नफा मिळवा

गणेशोत्सव, दसरा, आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर झेंडूची आवक होईल, झेंडूची फुले ही या दिवसांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये येतील आणि विक्रीच्या नियोजना अभावी त्यांचा लाल चिखल होईल. आधीच आपण या निसर्गाच्या लहरीपणामुळे परेशान झालेलो आहोत, त्यात उद्याचा हा प्रकार होऊ नये म्हणून मार्केटिंग आणि विक्री याचे योग्य नियोजन करणे अतिशय आवश्यक आहे ,चला तर मग आजपासून त्याच्या तयारीला लागू या!

आपण जर झेंडू फुलांचे उत्पादक असाल? तर दिवाळीपर्यंत आपल्या फुलांना चांगल्या प्रकारची मागणी राहू शकते, तेव्हा योग्य प्रकारे याची विक्री कशी करता येईल ?आपण हे बघूया !

विकायला लाजू नका ! Don’t be ashamed to sell:

पिकवायला येतंय ना आपल्याला?, मग विकायला काय लाजायचंय? माणसानं फक्त चोरी आणि चांडाळकी करायला लाजावं !बाकी दोन पैसे पोटाला कमवायला कशाची आलीय लाज ? त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं हे करा आणि विकायला जायचंय हे ठरवा.

आपल्याकडे माल असेल तर त्याची माहिती उपलब्ध करा. Provide information if you have the goods:

आपण हळूहळू अनलोकच्या प्रक्रियेमध्ये आहोत, परंतु अजूनही मार्केटमध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणावर ओपन झालेले नाही आणि आपल्याला फुलं विकायची आहेत ,तर याची माहिती आपण आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून समाजात दिली पाहिजे.

बघा सोशल मीडिया हे जरी फक्त लोकांनी एकत्र येण्याचे साधन असले, तरीही आज सोशल मीडियाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर व्यापार करता येतो, सगळी दुनिया वापरायलीये आपण ज्या कोणत्याही उद्योजकीय फेसबुक ग्रुपला किंवा उद्योग संबंधीत व्हाट्सअपग्रुपला सामील असाल, त्या ग्रुपमध्ये आपल्याकडे उपलब्ध होणाऱ्या फुलांची जाहिरात करायला सुरुवात करा. यामुळे वेळेच्या आधी अनेक लोकांपर्यंत आपल्याकडे उपलब्ध होणाऱ्या फुलांची माहिती पोहोचून जाईल.

बघा साधारणपणे एका घरामध्ये पाच किलो फुलांची गरज लागते, जर अगोदरच आपल्याकडे बुकिंग झाली तर ऐन वेळी होणारी फजिती टाळता येते.

संपूर्ण विक्रेत्यांशी संपर्क साधा: Contact the Whole sellers:

मी तर म्हणेन , आपल्या हातावर माल विका, कारण ?तेंव्हाच चांगला रेट मिळेल , पण होलसेलला दयायचंय तर आतापासूनच आपण ज्या मार्केटमध्ये आपली फुले घेऊन जाऊ शकता, त्या ठिकाणच्या होलसेलर लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा ,त्यांचे संपर्क क्रमांक घ्या , प्लॉटचे फोटो टाका ,भाव ठरवा आणि आपण डिलिव्हरी कधी कशी देऊ शकता? याची माहिती द्या.

बऱ्याच वेळेला आपल्याकडे एैन वेळेला फोन केल्यावर भाव कमी मिळतात किंवा आपण त्यांच्याकडे जातो ,तेव्हा भावाची पडझड करून माळ खरेदी केला जातो त्यामुळे आतापासून त्याची तयारी करायला लागा.

विक्री बिंदू निश्चित करा. Fix the Point of sales:

बऱ्याच वेळेला शेतकरी बंधू ऐन वेळेला शेजारच्या शहरात जातात, त्या ठिकाणी मग कोणत्या जागेवर बसून फुलं विकावी? याच्यासाठी प्रश्न उद्भवतात आणि ऐन वेळेला जाऊन शोधाशोध केल्यामुळे आपल्याला चांगली जागा मिळू शकत नाही, जर विक्रीसाठी चांगली जागा भेटली नाही तर आपली विक्री कमी होऊ शकते, किंवा त्या स्पॉटवर ग्राहक कमी येऊ शकतात, म्हणून सांगायचं असं कि, दोन दिवस आगोदरच त्या जागेची पाहणी करून या, ज्या ठिकाणी आपल्याला फुले विकण्यासाठी बसायचा आहे.

राईट स्पॉट मालकाशी संपर्क साधा. Contact right spot owner:

आपल्याला ज्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये फुलांची विक्री करायची आहे? त्या ठिकाणी अनेक स्पॉट हे योग्य असतात, पण काही स्पॉट जास्त योग्य असतात , परंतु त्या ठिकाणी काही दुकानदाराचे दुकाने असू शकतील ,मग अशावेळी आपण त्या या दुकानदाराशी व्यवस्थित बोलणं करून घेतलं, काका, दादा, आण्णा करून गोड बोललं, तर तो आपल्याला साधारणपणे दहा ते बारा तासांसाठी त्याची जागा बसण्यासाठी देऊ शकतो, त्याच्या बदल्यात दुकानदाराला पैसे किंवा त्याला लागणारी फुले देऊनती जागा बुक करून ठेवू शकता. जागा फार महत्वाची असते .

भाव सुरुवाती पासूनच योग्य ठेवा. Keep prices right from the start:

बऱ्याच वेळेला आपण विक्रीची सुरुवात करत असता ,सकाळी सकाळी फुलांचे रेट जास्त मिळतात, दुपार होईल तसतसे रेट खाली यायला सुरू होतात आणि संध्याकाळ होईल तसतसे रेट पार गडगडतात किंवा शेवटी शेवटी फुले जागेवर टाकून घरी निघून जाण्याची पाळी येते,

आपण इतक्या काळजीपूर्वक पिकवलेली फुले जर फेकून द्यायची वेळ आली तर त्याच्यासारख वाईट काहीच नाही, त्यामुळे एक फुलही आपल्याला फुकट फेकून द्यावे लागू नये याचा विचार करता,अगदी सुरुवातीपासून योग्य भावाने आपण विक्री जर केली तर, आपल्याला साधारण दुपारी पाच वाजेपर्यंत पूर्ण माल विकून मोकळं होता येईल.

कारण???? ऍवरेज सेमच पडतं !

संपर्कांचा लाभ घ्या. leverage the contacts:

बऱ्याच वेळेला उत्पादक शेतकऱ्यांचे शहरांमध्ये चांगले कॉन्टॅक्ट असतात, पाहुणे असतील / मित्र असतील/ मित्रांचे मित्र असतील,अशा लोकांपर्यंत आजपासूनच पोहोचायला सुरुवात करा,अगदी ज्याप्रमाणे एखादा पक्का सेल्समन आपली विक्रीची प्रोसेस व्यवस्थित आखतो त्याप्रमाणे आजपासूनच या लोकांना मेसेजिंग करायला सुरुवात करा,जेणेकरून ऐनवेळेला ही लोक आपण आहोत त्या ठिकाणी येऊन आपल्याकडून खरेदी करू शकतात.

बोलवा! बोलवलं कि लोकं येतात !

तुमचा संपर्क क्रमांक वाटा. Share your contact number:

मित्रांनो, ज्यांना गणेशोत्सव, दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत रिटेल ग्राहकांना फुलं विकायचीत , त्यांनी अगदी पहिल्या विक्रीपासून ग्राहकांना आपला नंबर दयायला चालू करा . भलेही स्केचपेनने एका पांढऱ्या कागदावर तो नंबर लिहून , फुलांच्या प्रत्येक बॅगमध्ये टाकून दया !

याने तो ग्राहक ज्यावेळी फुलं घेऊन घरी जाईल त्यावेळी त्याच्या बरोबर तो नंबर पण जाईल आणि त्यांच्या कॉन्टक्ट मधे आपण राहू.

रेफरंस मागा. Ask for a reference:

आपण एखाद्या शेजारच्या गावात रिटेल विक्री करतोय, त्या ठिकाणी आपल्या जास्त ओळखी नसू शकतात ,अशा वेळी ज्या ग्राहकांने आपल्याकडून खरेदी केलीय, त्यांना म्हणा ,”तुमचे मित्र, नातेवाईक असतील तर सांगा,चiगले फुलं आहेत”

आता ही बाब खरंतर पोरकटपणाची वाटेल,पण अशा रेफरंसने विक्री वाढते,आणि खर्च काय?काहीच नाही !

माल निवडून तीन पार्ट करा. Choose goods and make three parts:

आपण काय करतो ? जसा झाडाचा माल तोडला तसं पोत्यात भरून आणतो , आणि बाजारात बसतो !

तसं करू नका. छाटणी करून आणा ! जमलंच तर त्याचे हारं करून आणा ! लगेच रेट जास्त भेटेल. कारण फुला पेक्षा हाराचे रेट जास्ती मिळतात. काय आहे ?ग्राहकाला चौकशी करायला आवडते,भाव करायला आवडतो , मग ? आपल्या मालाची छाटणी करून ,साईज नुसारत तीन वेगवेगळ्या क्वालिटीचा माल काढा,तीन वेगवेगळे ऑप्शन असले कि झालं ! समोरच्याला जो पटेल तो माल ग्राहक घेईल ! जसा दाम तसा माल, आपला सुद्धा चांगला चांगला माल विकून, बारीक माल पडून रहाण्याची झंझट नाही .

आपलीच तीन दुकाने करा. Make your own three shops

फळविक्रेत्यांची एक पद्धत आहे, समजा एक विक्रीचा पाँईट आहे, त्या ठिकाणी ग्राहक आला, त्याने एका गाडयावर चौकशी केली,भाव पटला नाही >>दुसऱ्या गाडयावर भाव बघीतले : नाही >>तिसऱ्या गाडयावर तो घेतो,पण त्याला काय माहित?तीनही गाडे एकाच मालकाचे असतात.

तसं आपल्या घरातील,तरूणांना पण बरोबर घ्या ! यातून त्यांची ट्रेनिंग पण होऊन जाईल आणि चांगली विक्री पण होईल, कुठवर एकटेच पळणारेत तुम्ही ?

“मित्रांनो,या आणि अजुन अनेक टेक्नीक लावून,आपण झेंडूची फुले चांगल्या भावाने विकू शकतो” !

“विक्री करणे हे शास्त्र आणि कला दोन्ही आहे,ते अवघड नाही आणि लाज वाटायसारखंतर कधीच नाही”.

“माझ्या मालाला चांगला भाव मिळेल का “? अशी नुसती आशा करून उपयोग नाही,आपण त्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

“खूपदा,शेतकरी रडताना बघीतलाय, निसर्ग त्याला कसा नडतोय?ते बघीतलंय ! त्यामुळे हे लिहावं वाटलं !

“आम्ही कार्पोरेट जगाला विक्री शिकवतो” , तेच थोडया वेगळ्या पद्धतीने आपल्या भावासाठी लिहावं वाटलं” !

“दादा,आबा,तात्या,आण्णा,भाऊ ,

दाजी ,या वरच्या विक्रीच्या टेक्नीक वापरा”, तुमच्या घामाला योग्य दाम मिळेल.झेंडूची फुले अशी विकून भरपूर नफा मिळवाझेंडूची फुले अशी विकून भरपूर नफा मिळवा.

हेही वाचा – मनरेगा अंतर्गत रेशीम उद्योग अनुदान योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “झेंडूची फुले अशी विकून भरपूर नफा मिळवा

  • Balvant

    रोजगार नोंदणी बद्दल माहिती पाहिजे
    Export import बद्दल माहिती पाहिजे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.