महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसामान्य प्रशासन विभाग

आता करा योजनांचे अनुदान शासनाला दान – MahaDBT give it up subsidy

राज्य शासनाच्या विविध योजनांचा आर्थिक लाभ पात्र लाभार्थ्यांना पोहचविण्याकरिता महाआयटी मार्फत महाडीबीटी हे पोर्टल विकसीत केले आहे. महाडीबीटी पोर्टलचा उद्देश शासनाच्या विविध विभागांना त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या योजना राबविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा आहे. याद्वारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभांचे थेटपणे वितरण केले जाते.

सध्यस्थितीत राज्यातील शेतकरी, उद्योजक, विधवा, परित्यक्त्या, पुरबाधित, भूकंपग्रस्त इ. घटकातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जे लाभ मदत देण्यात येते, अशा लाभार्थ्यांमधून शासनाच्या विहित नियमानुसार पात्र नसणारे लाभार्थी (उदा. आर्थिकदृष्ट्या सक्षम घटक) यांना वगळणे/लाभ नाकारणे तसेच केंद्र शासनाने राबविलेल्या Give It Up LPG Subsidy या उपक्रमाप्रमाणे नागरिकांना लाभ नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करुन देणेबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

आता करा योजनांचे अनुदान शासनाला दान – MahaDBT give it up subsidy शासन निर्णय :-

मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दि. २३ ऑगस्ट, २०२३ रोजी आयोजित बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार Give It Up Subsidy या केंद्र शासनाच्या उपक्रमाप्रमाणेच राज्य शासनातील महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या योजनांसाठी Give It Up Subsidy उपक्रम राबविण्यात येईल. सध्यस्थितीत मंत्रालयीन विभाग आणि त्यांच्या अधिनस्त कार्यालयातील महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्चित असलेल्या सर्व ६५ योजनांमध्ये, तसेच भविष्यात महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वीत होणाऱ्या सर्व योजनांकरीता Give It Up Subsidy पर्यायाचे बटण/पर्याय महाआयटीमार्फत विकसीत करुन संबंधित योजनांसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्जदाराने Give It Up Subsidy बटण/पर्याय निवड केल्यानंतर प्रस्तूत पर्याय निवडीबाबतच्या खात्रीकरीता pop-up window मध्ये सूचना येईल. सदर सूचना मान्य केल्यानंतर अर्जदारास मोबाईलवर OTP प्राप्त होऊन, सदर OTP अर्जदाराने वेबसाईटवर नोंदविल्यानंतर Give It Up Subsidy ची प्रक्रिया पूर्ण होईल.

>

महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय : मंत्रालयीन विभाग आणि त्याच्या अधिनस्त कार्यालयातील महाडीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असलेल्या व प्रस्तावित सर्व योजनांमध्ये Give It Up Subsidy पर्यायाचे बटण लागू करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – अवकाळी नुकसान भरपाई दुप्पट दराने मिळणार

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.