घरबसल्या घ्या विविध सरकारी सेवांचा ऑनलाईन लाभ – Government Services Online
विविध प्रकारची कागदपत्रे काढण्यासाठी आपली नेहमीच धावपळ होत असते. ही धावपळ टाळण्यासाठी मात्र आपणास सेवा हमी कायदा 2015 व या कायद्यामुळे एका क्लिकवर उपलब्ध झालेल्या सरकारी सेवांची माहिती असणं गरजेचं आहे. आपले सरकार पोर्टल, आपले सरकार केंद्रे व मोबाईल ॲपच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यात विविध सेवांसाठी 10 कोटी 99 लाख 81 हजार 744 अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी 10 कोटी 51 लाख 89 हजार 727 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
राज्यातील नागरिकांना पारदर्शक व कार्यक्षमतेने लोकसेवा देण्याच्या उद्देशाने शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 संपूर्ण राज्यात 28 एप्रिल 2015 पासून अमलात आणला आहे. या अधिनियमाच्या माध्यमातून नागरिकांना विहित कालावधीमध्ये लोकसेवा पुरविण्याची तरतूद केली आहे. यासाठी राज्यातील विविध 37 शासकीय विभागाच्या 389 सेवा सर्वसामान्य लोकांना ‘आरटीएस महाराष्ट्र’ मोबाईल ॲप व आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या आहेत. या संकेतस्थळावर सर्वाधिक 41 सेवा कामगार विभागाने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याखालोखाल नगरविकास 39, महसूल 38, राज्य उत्पादन शूल्क 27 , कृषी 24 आदी विविध शासकीय विभागाच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्या नागरिकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सहाय्याची गरज आहे. त्यांच्यासाठी राज्यात 30878 ‘आपले सरकार केंद्र’ स्थापन करण्यात आले आहेत. या विविध माध्यमातून आपणास घरबसल्या शैक्षणिक व इतर कामांसाठी लागणारी कागदपत्रे काढता येतील. यामध्ये जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलीयर प्रमाणपत्र, मिळकतीचे प्रमाणपत्र, जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, 7/12 उतारा, निराधार असल्याचा दाखला, आदी प्रकारच्या विविध शासकीय विभागांचे 389 दाखले आपणास घरबसल्या घेता येतील.
नागरिकांना या सेवा मुदतीत मिळाल्या पाहिजेत. यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय कार्यालयांना त्यांच्या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवांची यादी ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर प्रसिध्द करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सेवा हक्क नियमानुसार प्रत्येक शासकीय विभागाने त्यांच्याकडील सेवा आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन जाहीर केल्या आहेत. त्यासाठीच्या अधिसूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
या सेवा नागरिकांना विहित मुदतीत उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जाहीर केलेल्या सेवेतील कालावधी संपल्यानंतर नागरिकांना सेवा देण्यास जबाबदार असलेल्या पदनिर्देशित अधिकारी विरोधात त्याच विभागातील प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे 30 दिवसाच्या आत अपील दाखल करता येईल. सदर अपिलांवर प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांने 30 दिवसाच्या आत निर्णय पारित करणे आवश्यक आहे. प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात त्याच विभागातील द्वितीय अपिलीय अधिकारी यांच्याकडे 45 दिवसाच्या आत दुसरे अपील दाखल करता येईल. द्वितीय अपिलीय अधिकारी यांच्या निर्णयाने समाधान न झालेला नागरिक या द्वितीय अपिलाविरोधात 60 दिवसाच्या आत शेवटचे व तिसरे अपिल राज्य सेवा हक्क आयोग यांच्याकडे करतील. या आयोगाचे कामकाज पाहण्यासाठी राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, मुंबई यांच्या अखत्यारित प्रत्येक महसूल विभागात शासनाने राज्य सेवा हक्क आयुक्तांचे पद निर्माण केले आहे. राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त व राज्य सेवा आयुक्त या पदांवरील व्यक्तींची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.
महसूल विभागात सेवा हक्क आयुक्तांच्या झालेल्या नेमणुकींमुळे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची अधिक प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित होईल तसेच अधिनियमाने निश्चित केलेल्या उद्देशांना चालना मिळेल.
घरबसल्या घ्या विविध सरकारी सेवांचा ऑनलाईन लाभ – Government Services Online:
१) जातीचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
२)नॉन क्रिमिलेयर दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
३) उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
४) विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन कसे काढावे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
५) जन्म नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
६) मृत्यु नोंद दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
७) दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
८) रहिवासी दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
९) भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
१०) निराधार असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
११) शॉप एक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
१२) कृषी सेवा केंद्र परवाना (बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना) ऑनलाईन कसा काढायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
१३) जीवन प्रमाणपत्र : पात्रता, नोंदणी आणि जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रोसेस, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
१४) आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड (PMJAY Card) ऑनलाईन आधारकार्डने कसे डाऊनलोड करायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
१५) आयुष्मान मित्र आयडीसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
१६) FSSAI फूड लायसन्स (फूड परवाना) ऑनलाईन कसे काढायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
१७) आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पाहायची? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
१८) डिजिटल स्वाक्षरीत फेरफार उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
१९) ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन कशी भरायची? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
२०) अंतिम मतदार यादी 2021 वार्डनुसार PDF फाईल मध्ये ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
२१) नाव, जन्मतारीख व धर्मामध्ये बदल करण्यासाठी (गॅझेट) राजपत्र नोंदणी अर्ज करा ऑनलाईन; याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
२२) आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत असे बनवा हेल्थ आयडी कार्ड ऑनलाईन; याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
२३) नवीन मायआधार पोर्टल वरून आधार कार्ड (नाव, पत्ता, जन्म तारीख व लिंग) मध्ये बदल करून ऑनलाईन अपडेट करा; याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
२४) नवीन मायआधार पोर्टल वरून आधार PVC कार्ड ATM सारखं दिसणार आधार कार्ड ऑनलाईन ५० रुपयात बनवा, जाणून घ्या सविस्तर प्रोसेस; याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
२५) पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र (चारित्र्य दाखला) ऑनलाईन काढण्याची प्रोसेस पहा ! याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
२६) केंद्र सरकारच्या वाहन 4.0 (Vahan 4.0 Portal) पोर्टलवर RTO च्या विविध सेवांचा घरबसल्या ऑनलाईन लाभ घ्या; याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
२७) आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आधार बायोमेट्रिक लॉक/अनलॉक कसे करायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
२८) आपल्या पंतप्रधान जन धन बँक खात्याची शिल्लक अशी तपासा; याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
२९) 1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन कसे पाहायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
३०) सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
३१) भविष्य निर्वाह निधी ऑनलाईन कसा काढावा? जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस (PF-Provident Fund); याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
३२) ईपीएफओ पोर्टल वरून यूएएन (UAN) नंबर कसे सक्रिय करावे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
३३) आपले ईपीएफ पासबुक (EPF Passbook) कसे डाउनलोड करावे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
३४) भविष्य निर्वाह निधी (PF) अकाउंटचे KYC अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस; याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
३५) भविष्य निर्वाह निधी (PF) अकाऊंट संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
३६) भाडे करार नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन; याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
३७) आधार व्हर्च्युअल आयडी (VID) कसा तयार करावा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
३८) डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा (7/12) ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
३९) नवीन रेशनकार्ड किंवा रेशनकार्ड रास्तभाव दुकानासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
४०) रेशन कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करा आणि आधार प्रमाणीकरण झाले आहे की नाही ते तपासा, अन्यथा स्वस्त धान्य होईल बंद; याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
४१) जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
४२) मालमत्ता (जमीन/घर/दुकान) यांचे नोंदणी कागदपत्रे ऑनलाईन कसे पाहायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
४३) गाडीचे आरसी बुक (Duplicate RC book) ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
४४) रेशनकार्डवर आपल्याला किती धान्य मिळते हे ऑनलाईन कसे तपासायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
४५) गावातील तलाठ्याचे सर्व जमिनीचे फेरफार आणि जमिन मोजणीचे व्यवहार पहा ऑनलाईन; याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
४६) जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
४७) डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
४८) घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
४९) पॅनकार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास काय करावे? ते रिप्रिंट करून कसे मिळवाल, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
५०) 5 मिनिटात मोफत पॅन कार्ड काढा – Instant e-PAN वाटपाची सर्वसाधारण योजना; याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
५१) पॅनकार्ड आधार कार्डला लिंक कसे करायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
५२) कृषी केंद्र दुकानातील खताचा उपलब्ध साठा आणि खताचा दर पहा ऑनलाईन; याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
५३) लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढा फक्त आधार कार्डने, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
५४) महसूल विभागाच्या ePropertycard अॅपवर अशी पहा तुमच्या जमिनीची मिळकत पत्रिका; याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
५५) डिजिटल स्वाक्षरीचा ८अ खाते उतारा ऑनलाईन कसा डाउनलोड करायचा? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
५६) डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
५७) शासकीय कामे होत नसतील तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!