वृत्त विशेषसरकारी योजना

कष्टकऱ्यांच्या रिटायरमेंट साठी; अटल पेन्शन योजना!

अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana), पूर्वी स्वावलंबन योजना म्हणून ओळखली जाणारी ही भारतातील सरकार-समर्थित पेन्शन योजना आहे, जी प्रामुख्याने असंघटित क्षेत्रासाठी लक्ष्यित आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2015 च्या अर्थसंकल्पीय भाषणात याचा उल्लेख केला होता. कोलकाता येथे 9 मे 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आले.

कष्टकऱ्यांच्या रिटायरमेंट साठी; अटल पेन्शन योजना – Atal Pension Yojana:

केंद्र सरकारने सात वर्षांपूर्वी असंघटित क्षेत्रासाठी अटल पेन्शन (Atal Pension Yojana) योजना आणली. या क्षेत्रातील व्यक्तींनाही वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन स्वरूपात काही रक्कम हाती पडावी, यासाठी अटल पेन्शन (Atal Pension Yojana) योजना आहे. ही योजना घेणारा रक्कम भरेल तेवढीच रक्कम केंद्र सरकार त्या खात्यात सुरुवातीला पाच वर्षे भरत होते. मात्र योजनेला प्रतिसाद वाढल्याने केंद्राने आता त्यातील आपला सहभाग बंद केला आहे.

अटल पेन्शन योजनेमध्ये कसे सहभागी व्हाल ?

  • १८ ते ४० वयोगटातील कोणीही व्यक्ती यात सहभागी होऊ शकते. त्यांना वयाच्या ६० वर्षापर्यंत पैसे भरावे लागणार.
  • त्यासाठी त्या व्यक्तीचे बँक खाते असणे आवश्यक आहे. ते आधार कार्डाला लिंक हवे, तसेच त्यासोबत मोबाईल नंबरही हवा. म्हणजे त्यावर खात्याशी संबंधित माहिती येत राहते.
  • राष्ट्रीयीकृत बँका, काही खासगी बँका, पोस्ट ऑफिसात हे खाते उघडता येते. या खात्यासाठी नॉमिनेशन आवश्यक आहे. तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर किती पेन्शन हवी, ते ठरवायचे. त्यानुसार तुम्हाला किती रक्कम जमा करावी लागेल, ते ठरते. ती रक्कम आपल्या बँक खात्यातून वळती केली जाते.

रक्कम काढण्याच्या अटी:

  • ६० वर्षे वयानंतर पेन्शन धारकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या पती किंवा पत्नीला पेन्शन मिळते. समजा, त्या जोडीदाराचेही निधन झाले, तर नॉमिनी जमा रक्कम काढू शकतो. आपल्या पेन्शन प्लॅननुसार नॉमिनीला किती रक्कम मिळू शकते, हेही या योजनेत ठरलेले आहे.
    ज्याने पेन्शन (Atal Pension Yojana) योजना घेतली आहे. त्याला गंभीर आजार झाला तर रक्कम काढता येऊ शकते. पण त्याचेही नियम आहेत. ते आधी समजून घ्यायला हवे.
  • प्रसंगी पेन्शनधारकाचे नॉमिनी ते खाते बंदही करू शकतात.

अटल पेन्शन योजनेमध्ये तुमच्या प्लॅनमध्ये बदल करता येतो का ?

तुम्ही जर एक हजाराच्या पेन्शनचा प्लॅन निवडला आणि नंतर आपले उत्पन्न वाढले, तर आपण आपला प्लॅन सुधारू शकता. (अपग्रेड करू शकता.) प्रसंगी उत्पन्न कमी झाले तर ही रक्कम आपण कमीही करू शकता- डाऊनग्रेडही करता येते. पण ही संधी वर्षातून एकदा एप्रिल महिन्यात मिळते. त्यासाठी ज्या बँकेतून आपण पेन्शन प्लॅन घेतला आहे, त्या बँकेत जाऊन आपल्याला फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यासाठी ५० रुपये फी घेतली जाते.

अटल पेन्शन योजनेच्या काही अटींत बदल झाला आहे:

सुरवातीला ईपीएफ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) खाते असणारे, टॅक्स भरणारे यांना या योजनेत सहभागी होता येत नव्हते. मात्र योजनेला पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती अट काढून टाकली आहे. सुरुवातीला पाच वर्षे केंद्र सरकारही या योजनेत पैसे भरत असल्याने अन्य कोणत्याही सोशल सिक्युरिटी स्कीममध्ये किंवा ईपीएफमध्ये खाते असेल, तर तुम्हाला हे खाते उघडता येत नव्हते. मात्र आता फॉर्ममध्ये उल्लेख असला तरी ती अट रद्द केली आहे.

अटल पेन्शन योजनेचे स्वरूप:

  • पीएफआरडीएचे (पेन्शन फंड रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी) या योजनेवर नियंत्रण आहे.
  • या योजनेत पेन्शन किती हवी त्यानुसार १००० ते ५००० असे एकूण पाच प्लॅन आहेत. तुमचे वय, तुम्ही निवडलेली पेन्शन (म्हणजे वयाच्या साठीनंतर एक हजार ते पाच हजार यातील किती रक्कम मिळावी, ते ठरवून) प्रीमियम भरायचा.
  • तुमचे वय किती तुम्हाला पेन्शन किती हवी, यानुसार प्रीमियम किती असेल, त्याचा चार्ट तयार आहे. तो पाहून तुम्ही निर्णय घेऊ शकता.

करसवलत, दंड, अन्य खर्च:

  • या पेन्शनच्या गुंतवणुकीवर करसवलत मिळू शकते. खास करून ज्या कामगारांच्या कंपनीचे मालक अटल पेन्शन (Atal Pension Yojana) योजना लागू करत असतील, त्यांना याचा फायदा मिळू शकतो.
    आपण आपली रक्कम दरमहा तीन महिन्यानी किंवा सहा महिन्यांनीही भरू शकता.
  • रक्कम वळती होताना खात्यात पैसे नसतील, तर बँक दंड आकारू शकते. तो एक ते दहा रुपयापर्यंत असेल, तो तुमच्या रकमेवर अवलंबून आहे. तो नेमका किती असेल, हे त्या त्या बँकांतून समजू शकते.
  • या योजनेत सहा महिने पैसे भरले नाहीत, तर खाते गोठवले जाईल (फ्रीज केले जाईल.) १२ महिने पैसे भरले नाहीत, तर खाते निष्क्रिय होईल. २४ महिने पैसे भरले नाही , तर खाते बंद होऊ शकते.
  • हे पेन्शन खाते उघडण्यासाठी १५ रुपये खर्च येतो.
  • वर्षभर त्या खात्याच्या मेन्टेनन्ससाठी बँक किवा टपाल खाते १५ ते २५ रुपये फी आकारू शकते.

अटल पेंशन योजना अर्ज:

अटल पेन्शन (Atal Pension Yojana) योजना लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html

अटल पेन्शन (Atal Pension Yojana) योजना ऑफलाईन अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. APY Subscriber Registration Form‘ डाऊनलोड करून त्यांची प्रिंट घ्यावी, त्यानंतर, आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग परवाना, नरेगा जॉबकार्ड, UIDAI लेटर इत्यादी जे काही कागदपत्रे असतील, त्यांसह जवळच्या कोणत्याही बँकेत भेट द्यायची आहे.

अटल पेन्शन योजना चार्ट पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

अटल पेन्शन (Atal Pension Yojana) योजनेच्या अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1800-110-069 यावर संपर्क करू शकता.

हेही वाचा – प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना – Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.