वृत्त विशेष

सोनं खरेदीवेळी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा नाहीतर खूप मोठी फसवणूक होईल !

सोने खरेदी करण्यामध्ये भारत हा अव्वल देश आहे.तसेच सोने खरेदी करणे हा बहुतेकांच्या आवडीचा विषय असतो.त्यामध्ये स्त्रियांच्या तर हा विशेष जिव्हाळ्याचा विषय. उन्हाळ्यामध्ये लग्नसराई मुळे सोनं घेण्याचे प्रमाण वाढते आणि सध्या सोने खरेदी करताना होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण देखील वाढत आहे.बाजारामध्ये सोने खरेदी करतो तेव्हा काही गोष्टी ग्राहक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. ग्राहकांची होणारी फसवणूक आणि आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी त्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे सोने खरेदी करताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी हे आपण या लेखातून जाणून घेऊया.

सोनं खरेदीवेळी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा नाहीतर खूप मोठी फसवणूक होईल ( जागो ग्राहक जागो):

हॉलमार्कचे निशाण:

सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावर हॉलमार्कचे निशाण आहे की नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे.

हॉलमार्क म्हणजे काय?

हॉलमार्क म्हणजे सोन्याची शुद्धता आणि त्याच्या कॉलीटीची भारत सरकारने प्रमाणित केलीली मान्यता आहे. हॉलमार्क सोबत लिहिलेल्या नंबर वरून तुम्ही त्या सोन्याची कॉलीटी देखील पारखू शकता. ज्या सोन्याच्या दागिन्यांवर ७५० हा आकडा असेल तर सोने हे १८ कॅरट कॉलीटीचे आहे व ९१६ हा आकडा असेल तर सोनं हे २२ कॅरट कॉलीटीचं आहे.

दागिन्यांवर बनलेल्या हॉलमार्कवर मुख्य ४ प्रकारची माहिती असते.

पहिले म्हणजे त्रिभुजची निशाणी, दुसरं म्हणजे सोनं किती कॅरटचे आहे तो नंबर, तिसरं दुकानदाराचा लोगो आणि हॉलमार्किंग सेंटरचा लोगो. कुठल्याही सोन्याचा दागिना विकत घेताना ह्या चार गोष्टी तपासून घेणे गरजेचे आहे.

१८ कॅरटच्या सोन्याला २२ कॅरटचा भाव सांगून फसवणूक:

आपल्याकडे बहुतेक वेळा सण आले की, ह्या मोठमोठ्या सोन्याच्या दुकानांचे ऑफर्स सुरु होतात. पण कधी विचार केलात ह्या दुकानदारांना कमी भावात सोनं विकणे कसं परवडत असेल आणि ते असे का करत असतील? कारण ह्या ऑफर्समध्ये काही असे दागिने असतात ज्यांच्यात स्टोन, क्रिस्टल, बीड ह्याचे वर्क जास्त असते. आणि सोनं कमी. पण ते विकणार सोन्याच्याच भावात.

जसे सोनं असेल २२ कॅरटचं पण ते विकणार २४ कॅरटच्याच्या भावाने. त्यामुळे या ऑफर्सना तुम्ही बळी पडू नका. दुकानदार तुमचा फायदा करवून देण्यासाठी ह्या ऑफर्स ठेवत नाहीत तर त्यात तुमचं नुकसान आणि त्या दुकानदाराचा फायदा असतो. कारण सोन्याचा भाव हा तर रोज बदलत असतो.

सोन्याची शुद्धता:

आपण जेव्हा सोने खरेदी करतो तेव्हा सोन्याची शुद्धता तपासून घेणे गरजेचं आहे. शुद्ध सोन्यासाठी कॅरेट हे मापक आहे. त्यामध्ये 24 कॅरेट सोनं हे सर्वात शुद्ध सोनं समजलं जातं. पण 24 कॅरेटचं सोनं दागिने बनविण्यासाठी करता येत नाही.

दागिने तयार करताना 22 कॅरेट सोन्यासोबत 2 कॅरेट चांदी मिक्स केली जाते. त्यामुळे एक गोष्ट जरुर लक्षात घ्या की, तुम्ही जे काही सोनं खरेदी कराल ते 22 कॅरेटपेक्षा कमी असता कामा नये.

सोन्याचा दर:

सोन्याचे दर हे दररोज बदलत असतात. त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करत आहात त्या दिवशी सोन्याचा दर किती आहे याची खात्री करुन घ्या.

मेकिंग चार्ज कमी करा:

दागिने खरेदी करताना मेकिंग चार्ज कमी करणे गरजेचे आहे.कारण प्रत्येक दागिन्यांचा मेकिंग चार्ज हा वेगवेगळा असतो. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे प्रत्येक दागिन्यांची पोत, कटिंग आणि फिनिशिंग हे वेगवेगळे असते. मशीनद्वारे तयार करण्यात आलेले दागिने हे मानव निर्मित दागिन्यांपेक्षा स्वस्त असतात.

मेकिंग चार्ज हे दोन प्रकारे निश्चित केले जातात. एकतर सोन्याच्या किंमतीवरील टक्केवारी किंवा प्रति ग्रॅम सोन्याचे फ्लॅट मेकिंग चार्ज. ग्राहकांनी मेकिंग चार्ज कमी करण्याचा आग्रह केल्यास अनेक ज्वेलर्स हे शुल्क कमी करतात. कारण, ज्वेलरी इंडस्ट्रीजमध्ये या संदर्भात अद्याप कोणतेही विशिष्ट मानक सेट करण्यात आलेले नाहीये.

दागिन्याचा Touch Report घेणे:

जेव्हा आपले दागिने सोनाराकडून तयार होतील तेव्हा त्याचे Net Weight सोन्याचे आणि Gross Weight पाहिजे असे दुकानदाराला सांगा. तसेच दुकानदाराकडून 50/-रुपयाचा Touch Report नक्की घ्या. Touch Report मुळे दागिन्यांमध्ये किती टक्के सोने आहे आणि किती कॅरेट सोने वापरले आहे ते कळते.

समजा उदाहरणार्थ: तुम्ही मंगळसूत्र बनवायला दिले आहे 3 (30 ग्राम) तोळे चे आणि त्यादिवसाचा सोन्याचा भाव हा 31500/- असेल तर आपला प्रश्न सोनाराला हा असला पाहिजे की हा दागिना किती कॅरेट चा असेल ? आणि जसे 916 हॉलमार्क बनवायच्या असेल तर त्यात 91.60 % सोने असते इतर तांबे,चांदी, असते तर सोनाराने 31500 च्या 91.60% च सोन्याचा भाव लावला पाहिजे.

जेव्हा दागिने तयार होतील तेव्हा त्यांच्या net weight सोन्याचे आणि gross weight नक्की पाहिजे असे सांगा तसेच त्यांच्या कडून touch report नक्की घ्या 50/- रुपयात येतो. जेणे करून त्यात किती टक्के सोने आहे आणि किती कॅरेट सोने वापरले आहे ते कळेल, माझ्या कडे एक याजमान पुष्कराज, निलम करीत आले त्यांनी आपल्या जवळील मंगळसूत्र दिले ते त्यांना सोनाराने KDM मध्ये बनवुन दिले 6 वर्षांपासून ते वापरत होते, बनविले त्यावेळेस 91% सोने वापरले आहे असे सांगितले आणि पैसे पण 91% घेतले सोन्याच्या भावा प्रमाणे परंतु मी tunch काढला त्यावेळेस ते फक्त 70 ते 75 टक्के सोने होते. ही खुप मोठी फसवणूक आहे म्हणजे आजच्या तारखेला 21 % सोन्याचे 3 तोळे चे (31500 × 21% × 3 तोळे – 19845 /-) अश्यांप्रकारे हे प्रकार चालु आहेत.

सध्या हॉलमार्क पद्धत शहरात जरी असली तर बरेच सोनार हे जास्त मजुरी सांगून KDM मध्ये बनवण्याचा PLAN करीत लूट करीत आहेत . गावातील सध्या अशिक्षित लोक तर सर्वात जास्त बळी पडत आहेत. अशा काही गोष्टी सोने खरेदी करताना ध्यानात घेतल्या तर संभाव्य फसवणूक टाळली जाईल.

हेही वाचा – सोनं तारण ठेऊन कर्ज घेताना फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.