वृत्त विशेषअर्थ मंत्रालय

सोनं तारण ठेऊन कर्ज घेताना फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या !

आपल्या भारत देशामध्ये सोनं तारण ठेवून कर्ज घेण्याचं प्रमाण खूप जास्त वाढत चाललं आहे. बऱ्याच जणांना नोकरी नसल्यामुळे दैनंदिन खर्च चालवण्यासाठीही कर्ज घ्यावे लागत आहे. सामान्य लोकांना बँकांच्या अटी-शर्तींमुळे पटकन कर्ज मिळत नाही. त्यामुळे अनेकजण घरातील सोने तारण (Gold mortgage) ठेऊन पैसे कर्जाऊ घेत आहेत.

तथापि गेल्या काही काळापासून या कर्ज व्यवसायात असणारी अनियमितता समोर आल्याने अर्थ मंत्रालय तसेच रिझर्व्ह बँक सारख्या यंत्रणा याबाबत सतर्क झाल्या आहेत.

सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अर्थ मंत्रालयाने गोल्ड पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले आहेत. सोने तारण (Gold mortgage) ठेऊन पैसे कर्जाऊ देताना नियमांचं उल्लंघन होत असल्याच्या घटना घडत असल्याचं अर्थ मंत्रालयालाच्या निदर्शनास आलं आहे.

बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या सोन्यावर कर्ज देताना नियमांचं उल्लंघन करतात. त्याचा फटका जे ग्राहक ग्राहक सोन्यावर कर्ज काढतात त्यांना बसतोय. काही कंपन्या सोन्यावर कर्ज देताना लोन टू व्हॅल्यू रेशो (एलटीव्ही) मध्ये फेरफार करताना दिसतात.

>

तुम्हाला सोन्यावर जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकतं हे एलटीव्ही रेश्योमुळे समजतं. सध्या त्याचं प्रमाण 75 टक्के आरबीआयने निश्चित केलंय, म्हणजेच सोने तारण (Gold mortgage) ठेऊन जर कोणी 1 लाख रुपयांचे दागिने गहाण ठेवले तर त्याला फक्त 75 हजार रुपये कर्ज मिळेल.

सोनं तारण (गोल्ड लोन – Gold mortgage ) म्हणजे काय?

सोनं तारण (गोल्ड लोन) हे एक प्रकारचे सुरक्षित कर्ज असून जे सोन्याचा वापर सुरक्षा म्हणून करते. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमचे सोने सावकाराकडे गहाण ठेवावे लागेल आणि ते तुमच्या सोन्याच्या मूल्यावर आधारित तुम्हाला पैसे देतील. हे असुरक्षित कर्जापेक्षा वेगळे आहे, जिथे तुम्हाला कोणतीही सुरक्षा प्रदान करण्याची गरज नाही परंतु ते करावे लागेल. सोन्याचे मालक असलेल्या आणि पैशांची गरज असलेल्या लोकांसाठी हा एक सोयीस्कर आर्थिक पर्याय आहे.

सोनं तारण ठेऊन कर्ज घेताना फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या !

  • सोने खरेदी करण्यापूर्वी ग्राहकाने त्याच्या सोन्याची गुणवत्ता तपासली पाहिजे,  म्हणजे सोने तारण ठेवताना कंपन्यांकडून चांगली रक्कम मिळवू शकतात.
  • सोने तारण (Gold mortgage) कर्जाची लवकरात लवकर परतफेड करा, कारण सोन्यावरील कर्जाचा व्याजदर हा गृहकर्ज किंवा वाहन कर्जावरील व्याजदरापेक्षा जास्त असतो.
  • सोने तारण ठेवून कर्ज घेताना संबंधित बँक आणि वित्तीय संस्थेकडून आकारण्यात येणाऱ्या व्याजदाराची माहिती घ्यावी. बँक कोणत्याही प्रकारचे हिडन चार्जेस आकारत नाही ना, याची खातरजमा करुन घ्यावी. याशिवाय, प्री-पेमेंट, प्रोसेसिंग फी, री-पेमेंट चार्ज हा सगळा तपशील तपासून घ्यावा.

सोने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला संबंधित बँकेच्या शाखेत जावे लागते. त्याठिकाणी तुमच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची तपासणी केली जाते. त्यानंतर काही कायदेशीर बाबींची पूर्तता करुन तुम्हाला सोने दिले जाते. सोन्याच्या किंमतीनुसार तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ठरते.

हेही वाचा – सोनं खरेदीवेळी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा नाहीतर खूप मोठी फसवणूक होईल

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.