सरकारी कामेजिल्हा परिषदनगरपंचायतनगरपरिषदनिवडणूकपोटनिवडणूकमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

मतदार यादी ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !

मतदान करायचं म्हटलं तर गावातील मतदार यादीत (Matdar Yadi) आपलं नाव आहे की नाही याची माहिती असणं आवश्यक असतं. बऱ्याचदा मतदार (Voter list) यादीतून नाव गाळलं जाऊ शकतं, त्यामुळे आपलं नाव मतदार यादीमध्ये (Matdar Yadi) आहे की नाही हे तपासून पाहावं. हीच माहिती घरबसल्या मोबाईल/लॅपटॉपवर ऑनलाईन कशी पाहायची, हे आपण आता जाणून घेऊया.

मतदार यादी ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रोसेस – Matdar Yadi (Voter list PDF):

मतदार यादी पाहण्यासाठी सगळ्यांत आधी खालील लिंक वर क्लिक करा, त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यलयाची वेबसाईट ओपन होईल.

https://ceo.maharashtra.gov.in

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र या वेबसाईटच्या Electoral Roll या मुख्य मेनूमध्ये PDF Electoral Roll (Partwise) या पर्यायावर क्लिक करा.

PDF Electoral Roll (Part wise) Matdar Yadi (Voter list PDF)
PDF Electoral Roll (Part wise)

त्यानंतर मतदार यादी (Matdar Yadi) पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ (Assembly Constituency) आणि आपली भाषा निवडायची आहे आणि मग कॅप्चा टाकायचा आहे.

Final Electoral Roll PDF (Part Wise) Matdar Yadi (Voter list PDF)
Electoral Roll

त्यानंतर आपल्या विभागानुसार PDF फाईल (Matdar Yadi) डाउनलोडच्या आयकॉनवर क्लिक करा, मग तुमच्यासमोर तुमच्या गावाची/विभागाची मतदार यादी (Matdar Yadi PDF) फाईल मध्ये ओपन होईल, ती फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता.

Voter list PDF Matdar Yadi (Voter list PDF)
Voter list PDF (Matdar Yadi)

मतदार यादी (Matdar Yadi) असं या यादीचं शीर्षक असतं. इथे सुरुवातीला आपले गाव ज्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात येतं त्या मतदारसंघाचं नाव, क्रमांक आणि आरक्षणाची स्थिती दिलेली असते.

पुढे आपल्या मतदान केंद्राच्या तपशीलात मतदान केंद्राचं नाव, क्रमांक आणि पत्ता दिलेला असतो आणि त्यानंतर मतदारांची संख्या (महिला, पुरुष, तृतीयपंथी) दिलेली असते.

त्यानंतर आपल्या गावातील मतदारांच्या नावाची यादी (Matdar Yadi) दिलेली असते. यात मतदाराचं नाव, पती किंवा वडिलांचं नाव, घर क्रमांक, वय, लिंग ही माहिती दिलेली असते. अशा पद्धतीनं तुम्ही या यादीत तुमचं नाव शोधू शकता.

जर तुम्हाला मतदार यादीत (Voter list) कुठलीही कच्ची अथवा चुकीची माहिती मिळाली तर तुम्हाला त्याच्याबद्दल अधिकारांना सूचित करावे आणि त्यांना सुचना द्यावी.

हेल्पलाईन क्रमांक – 1800221950/1950
फोन नंबर – 022-22021987
ई-मेल आयडी – ceo_maharashtra@eci.gov.in

खालील लेख वाचा !

  1. घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? सविस्तर प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
  2. डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
  3. निवडणूक आयोगामार्फत मतदारांसाठी विविध उपयोगी प्रणाली पाहण्यासाठी येथे क्लिक करा!
  4. मतदार यादीत नाव नसेल तर पात्र व्यक्तींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

3 thoughts on “मतदार यादी ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !

  • Rupesh Karalkar

    मतदानाची यादी

    Reply
  • Aarnav rakesh crusoe.

    Graduate constituency!

    Reply
  • Avinash khaniyalal pawar

    Ok

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.