आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेषसरकारी कामे

घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस – Voting Card Apply Online

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिला आहे. हा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत निवडणूक ओळखपत्र दिले जाते. अनेक सरकारी कामांसाठी हे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. हे ओळखपत्र मिळवण्यासाठी आपल्याला आता कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ते मिळवू शकता.

मतदान कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस:

राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाइट सुरु केली आहे. ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी nvsp.in या वेबसाइट वर जायचे आहे.

Login-Register
Login-Register
 • Login and Register यावरती क्लिक करायचे आहे.
 • नंतर तुमचा User Name and Password टाकायचा आहे. व Captcha Code भरायचा आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नसेल तर Don’t have Account Register as a New User यावरती क्लिक करायचे आहे. व आपला मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करून घ्यायचे आहे.
 • Login वरती क्लिक करायचे आहे.
 • Login वरती क्लिक केल्यावर Fresh Inclusion /Enrollment वर क्लिक करा.
 • त्यानंतर Citizenship मध्ये जाऊन I Reside in India वर क्लिक करा. व आपले राज्य निवडून Next बटण वरती क्लिक करा.
 • पहिल्यांदा Assembly Constituency (विधानसभा मतदार संघ) निवडायचा आहे. नंतर तुम्हाला तुमच राज्य, जिल्हा, घर नंबर , तालुक्याचे नाव ,पोस्ट ऑफिस ,पिन कोड व आपण ज्या गावाचे नाव टाकले आहे त्या गावात आपण कधीपासून राहत आहेत ती तारीख व आपली जन्मतारीख टाकायची आहे.
Assembly Constituency - address
Assembly Constituency – address

आवश्यक कागदपत्रे:

तुम्हाला Upload Document हा Option येईल,त्यामध्ये Address Proof Upload करायचा आहे . Address Proof मध्ये आपल्याला खालील पैकी एक Documents अपलोड करायचा आहे,त्यामध्ये

 1. बँक/किसान/पोस्ट ऑफीस करंट पास बुक
 2. रेशन कार्ड
 3. इनकम टॅक्स पावती
 4. रेंट अग्रीमेंट
 5. पाण्याचे बिल
 6. टेलिफोन बिल
 7. इलेक्ट्रिसिटी बिल
 8. गॅस बिल
 9. EPIC नंबर:

नंतर तुम्हाला EPIC नंबर विचारला जाईल ज्यामध्ये आपल्याला आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे. व Next बटण वरती क्लीक करा.

Next
Click On Next

त्यानंतर आधारकार्ड प्रमाणे जी जन्मतारीख आहे ती टाकायची आहे. त्यानंतर गावाचे नाव ,राज्य व जिल्याचे नाव टाकायचे आहे.

वयाचा पुरावा:

Age Proof Documents अपलोड करायची आहेत व त्यासाठी लागणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे,खालील पैकी एक Documents अपलोड करायचा आहे.

 1. जन्म प्रमाणपत्र
 2. पॅन कार्ड
 3. आधार कार्ड
 4. Driving लाइन्सन्स
birth details - Age Proof
Birth details & Age Proof

पुढे खालील तपशील भरा.

स्वतःची माहिती:

त्यानंतर तुम्हाला स्वतःची माहिती टाकायची आहे.

 • आधारकार्ड प्रमाणे स्वतःचे नाव
 • आडनाव
 • जेंडर (लिंग)
 • वडिलांचे नाव
 • स्वतःचा फोटो अपलोड करायचा आहे.
 • त्यानंतर नेक्स्ट बटण वरती क्लीक करा.

कृपया आपण व्यंगत्व प्रकारामध्ये असाल तर खालील पर्याय निवडा:

 • Visual impairment -दृष्टीदोष
 • Speech & Hearing disability-भाषण आणि सुनावणीचे अक्षमता
 • Locomotor disability-लोकोमोटर अपंगत्व
 • Other-इतर

नंतर तुमचा Mail idमोबाइल नंबर टाका. व नेक्स्ट बटण वरती क्लीक करा. त्यानंतर Place विचारले तिथे गावाचे नाव टाका व मोबाइल नंबर टाका. व नेक्स्ट बटण वरती क्लिक करा.

त्यानंतर मग Preview या पर्यायाअंतर्गत नवीन मतदान कार्डासाठी तुम्ही आता भरलेला फॉर्म-6 तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. त्याखालील सबमिट या बटनावर क्लिक केलं की तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला एक रेफरन्स आयडी दिला जाईल.

हा आयडी वापरून तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकता.

nvsp.in या वेबसाईटच्या होमपेजवर परत आलात की तुम्हाला तिथं Track application Status हा पर्याय दिसेल.

त्यावर क्लिक केलं की, रेफरन्स आयडी टाकून Track status या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

एकदा का फॉर्म सबमिट झाला की त्याची स्थानिक Booth level officer छाननी करतात. त्यानंतर तो Electoral Registration officer (उपजिल्हाधिकारी) यांच्याकडे पाठवला जातो.

सगळी माहिती आणि कागदपत्रं व्यवस्थित असल्यास तो फॉर्म Accept केला जातो आणि जवळपास 2 महिन्यांत तुमच्या पत्त्यावर मतदान कार्ड पाठवलं जातं.

हेही वाचा – डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.