वृत्त विशेष

जेष्ठ नागरिकांसाठी आता घरबसल्या मतदान करण्याची सुविधा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशपांडे म्हणाले, ” मतदानाचा टक्का वाढावा, तसेच ज्येष्ठांना मतदान करणे सोईचे व्हावे, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली. त्यासाठी निवडणूक कर्मचारी घरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांना हा पर्याय देणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पाच दिवसांत मोहीम राबविण्यात येणार आहे. घरीच बसून मतदान करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्यानंतर त्यांच्याकडून १२ ‘ड’ फॉर्म भरून घेण्यात येणार आहे. त्यांनतर घरीच पोलिंग बूथ आणून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान करून घेण्यात येईल.

अनेकदा ज्येष्ठ नागरिकांचे वयोमान, त्यांचे आजारपण या कारणांमुळे त्यांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता येत नाही. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होता यावे यासाठी हा उपक्रम निवडणूक आयोगातर्फे प्राधान्याने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये चिन्हांकित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 12 -डि क्रमांकाचा अर्ज पुरविण्यात येणार असून तो भरुन निवडणूक घोषित झाल्यानंतर पाच दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे. जिल्हाधिकारी या मागणीवर अंतिम निर्णय घेणार असून त्यानंतर प्रत्यक्ष मतदानासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी संबधित मतदाराच्या घरी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ मतदारांसाठी ही एक संधी असली तरीही ज्यांना शक्य आहे अशा ज्येष्ठ नागरिकांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे आणि इतरांना आदर्श घालून द्यावा असे आवाहन देशपांडे त्यांनी केले.

मतदान टक्का वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांची मदत

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आयोगाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांना गृहभेटी देऊन मतदान करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांचे मत परिवर्तन करण्यात येणार आहे. या शिवाय मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात ही त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांना मतदानाची सर्व प्रक्रिया समजावी, तसेच त्यांच्यामध्येही मतदानाबाबत जनजागृती व्हावी, हा उद्देश असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

>

ऐंशी वयाच्या वरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी आता दोन पर्याय उपलब्ध असणार आहेत. घरी बसून अथवा मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार आहे. नुकत्याच कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रथम ही सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली होती. या निवडणुकीत संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

केंद्रावर उमेदवाराची कुंडली

उमेदवारी अर्ज भरताना अर्जाबरोबर नाव, पत्ता याबरोबरच संपत्ती आणि त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती सादर करावी लागते. ती सर्व माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाते. परंतु यंदा प्रथमच मतदान केंद्राबरोबर प्रत्येक उमेदवारांची ही माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. जेणेकरून मतदारांना उमेदवाराची सर्व माहिती घेणे शक्य होणार आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी ‘सी व्हिजिल अॅप’

मतदानाच्या दिवशी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘सी व्हिजिल अॅप’ची सुविधा नागरिकांना आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. अॅपमधून तक्रार दाखल करता येणार आहे. त्यामध्ये फोटो, व्हिडिओ शूटिंगही अपलोड करता येणार आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर १०० मिनिटांत भरारी पथक दाखल होऊन त्यांची खात्री करून कारवाई करतील.

५० टक्के केंद्रांवर वॉच राहणार

यापूर्वी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी संवेदनशील मतदान केंद्र निश्चित करून मतदानाच्या दिवशी तेथे कोणतेही गडबड होऊ नये, यासाठी वेब कास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात होते. परंतु यंदा प्रथमच ५० टक्के मतदान केंद्रांवर ही सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी मतदान केंद्र कोणती असणार आहेत, याचे निकष आयोगाने निश्चित केले आहेत. एका पोलिस ठाण्याच्या हद्दीत किमान पाच मतदान केंद्रांवर ही सुविधा असणार आहे. त्यांची लिंक पोलिस ठाण्याला उपलब्ध करून देण्याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगाला उपलब्ध असणार आहे. त्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी केंद्रांवर थेट वॉच राहणार आहे. जेणेकरून बोगस मतदानालाही आळा बसण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाण असलेल्या दिव्यांगांनाही घरीच मतदान सुविधा पुरविल्या जाणार आहेत. घरीच मतदान करण्याचा निर्णय घेणाऱ्यांचे मतदान मतदानाच्या एक दिवस आधी करून घेतले जाईल.”

हेही वाचा – घरबसल्या मतदान कार्ड ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस – Voting Card Apply Online

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.