महाराष्ट्र ग्रामपंचायतवृत्त विशेषसरकारी कामे

ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन कशी भरायची? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !

ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन (Gram Panchayat Gharpatti Panipatti Online) कशी भरायची?  सविस्तर याची प्रोसेस आपण या लेखात पाहणार आहोत. ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. आणि घरपट्टी, पाणीपट्टी, व इतर कर हे ग्रामपंचायतचे उत्पनाचे प्रमुख साधन आहे. ग्रामपंचायतीस शासनामार्फत वेगवेगळ्या योजनेअंतर्गत निधी जरी मिळत असला तरी तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो.

गावाला दैनंदिन पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे, ब्लिचिंग पावडर खरेदी, वीजबिल भरणे, कर्मचारी पगार करणे, गावातील स्वच्छता, किरकोळ रस्ते दुरुस्ती, गटार दुरुस्ती, रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे, कार्यालयीन खर्च यासारखी अनेक नित्याची कामे ग्रामपंचायतीला करावी लागतात. ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते. घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील व इतर आवश्यक कामे ग्रामपंचतीस करणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपला घरपट्टी, पाणीपट्टी कर,व इतर करांचा भरणा त्या त्या आर्थिक वर्षात करणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायत ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे असते, जसे ज्या कुटुंबात पैसा येईल ते कुटुंब त्याच्या आवश्यक गरजा भागवू शकते, तसेच जर ग्रामपंचायतला घरपट्टी, पाणीपट्टी व इतर करातून जर पैसा जमा झाला तरच ग्रामपंचायत गावातील अत्यावश्यक कामे व गरजा पूर्ण करू शकते.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमग्रामपंचायत कर व फी नियम (सुधारणा) २०१५ यामधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचा कर हा प्रत्येक मालमत्ता धारकाला भरावाच लागतो, तो कधीही माफ होत नाही. तसेच थकबाकी रकमेवर दरवर्षी ५% व्याजसुद्धा भरावे लागते.

ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी, ऑनलाईन भरण्याची प्रोसेस – Gram Panchayat Gharpatti Panipatti Online Process:

घरबसल्या ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी, ऑनलाईन (Gram Panchayat Gharpatti Panipatti Online) भरण्यासाठी खालील राज्य सरकारची पोर्टल ओपन करा.

https://pg.gov2egov.com

तुम्ही पहिल्यांदा नोंदणी करणार असल्यामुळे “Register” वर क्लिक करा.

Register : Gram Panchayat Gharpatti Panipatti Online
Register
नागरिक नोंदणी (Citizen Registration):

आता इथे नागरिक नोंदणी करण्यासाठी तुमचे नाव, लिंग, ई – मेल आयडी, आणि मोबाईल क्रमांक टाका. नोंदणी केल्यानंतर मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी वर युजरनेम आणि पासवर्ड येईल.

Citizen Registration : Gram Panchayat Gharpatti Panipatti Online
Citizen Registration
वापरकर्ता लॉगिन (User Login):

आता इथे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

User Login : Gram Panchayat Gharpatti Panipatti Online
User Login

पोर्टलवर लॉगिन झाल्यानंतर तिथे विविध सेवा दिसतील त्यामध्ये “कर भरणा” या सेवा पर्यायावर क्लिक करा.

कर भरणा : Gram Panchayat Gharpatti Panipatti Online
कर भरणा

आता पुढे मालमत्ता आणि पाणी कर तपशील शोधा. आपला जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, प्रॉपर्टी आणि पाणी मिळकत नंबर select करून आपली माहिती search करा.

Search Property and Water tax details here : Gram Panchayat Gharpatti Panipatti Online
Search Property and Water tax details here

पुढे मालमत्ता आणि पाणी कर तपशील कनेक्शन पहा आणि Add Connection करा.

Add Connection: Gram Panchayat Gharpatti Panipatti Online
Add Connection

पुढे “If information is correct then add connection” असा मॅसेज येईल, जर माहिती बरोबर असेल तर ओके वर क्लिक करा.

आता आपण पाहू शकतो मिळकत नंबर ऍड झाला असल्याचा मेसेज दिसेल. पुढे “Click here to make a payment” या पर्यायावर क्लिक करा.

Connection Added Successfully : Gram Panchayat Gharpatti Panipatti Online
Gram Panchayat Gharpatti Panipatti Online

पुढे “Pay Now” हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि तुमची ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टीचे (Gram Panchayat Gharpatti Panipatti Online) पेमेंट ऑनलाईन भरा.

हेही वाचा – ग्रामपंचायत कर आकारणी व दाव्यांच्या रकमांची वसुली (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ ते १३० नुसार)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

3 thoughts on “ग्रामपंचायत घरपट्टी, पाणीपट्टी ऑनलाईन कशी भरायची? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस !

  • मिलिंद अभिमान गेडाम

    Good

    Reply
  • Arun Gulab Parteti

    Ghatpendhari

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.