वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनमहाराष्ट्र ग्रामपंचायतसरकारी कामे

ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा (घरठाण उतारा) काढण्यासाठी ऑफलाईन/ऑनलाईन प्रोसेस (Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara)

गावातील ग्रामपंचायत हद्दीमधील येणाऱ्या क्षेत्रात आणि करास पात्र असलेल्या सर्व जमिनी, खुली जागा व घरे, इमारती यांची ग्रामपंचायतीने मान्यता दिलेले यादी त्यांची नोंद नमुना नं ८ कर आकारणी वहीत केली जाते त्याला आकरणी नोंदवही म्हटले जाते. या नोंदवही मध्ये ग्रामपंचातमध्ये येणाऱ्या सर्व करांच्या मिळकतीचे वर्णन असते यामध्ये उदा. इमारतीचे वर्णन त्याची लांबी- रुंदी क्षेत्रफळ व त्यांची किंमत तसेच कर आकारणी असते, याला ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (घरठाण उतारा) असे म्हटले जाते.

गावामध्ये आपले घर किंवा खुली जागा गावठाण क्षेत्रामध्ये येत असेल, तर त्याची नोंद ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (घरठाण उतारा) ला केली जाते व त्याची कर आकारणी सुद्धा केली जाते. यामध्ये आपल्या घराचे मिळकतीचे उल्लेख असेलेले पत्रक असते त्यामध्ये ग्रामपंचायतचा कर म्हणजेच घरपट्टी, दिवाबत्ती, आरोग्य, पाणीकर असे कर आकारले जातात. त्याच प्रमाणे आपल्या मालमत्तेवर आपण जर कर्ज काढले असेल तर त्याचा सुद्धा उल्लेख ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (घरठाण उतारा) मध्ये केला जातो.

ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (घरठाण उतारा) विविध शासकीय कामांसाठी गरजेचा असतो, जसे की मिळकत प्रमाणपत्र, कर्ज घेण्यासाठी उपयोगी पडतो, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी घरठाण उतारा उपयोगी पडतो.

ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (घरठाण उतारा) मिळणेबाबत अर्ज नमुना (ऑफलाईन प्रोसेस) – (Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara):

>

ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (घरठाण उतारा) ऑफलाईन मिळवण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत मध्ये सचिव ( ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी) ला उद्देशून लेखी विनंती अर्ज करावा लागतो, त्यानंतर आपल्याला आपल्या नावे ग्रामपंचायत दप्तरी ज्या मिळकती नोंद असतील याचा उतारा मिळून जाईल.

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे:

  1. घराचा जागेचा ७/१२ उतारा
  2. खरेदी पत्र/बक्षीस पत्र
  3. चतुसिमा (रु. १०० च्या बॉंड पेपरवर)
  4. आणेवारी संमती पत्र.

ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (घरठाण उतारा) मिळणेबाबत अर्ज नमुना PDF फाईल: ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (घरठाण उतारा) मिळणेबाबत अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (घरठाण उतारा) ऑनलाईन काढण्याची प्रोसेस (Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara):

ग्रामपंचायत घराचा/घरठाण उतारा ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची”

https://aaplesarkar.mahaonline.gov.in हि वेबसाईट ओपन करायची आहे.

त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन नोंदणी करावे लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी (युजर प्रोफाईल) कशी करायची? हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे. नोंदणी झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.

ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा (घरठाण उतारा) काढण्यासाठी ऑफलाईन/ऑनलाईन प्रोसेस (Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara)
लॉगिन

आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.

त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “ग्रामविकास व पंचायत राज विभाग” हा पर्याय निवडायचा आहे.

हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यु नोंद दाखला, निराधार असल्याचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला, विवाह नोंद दाखला, असे विविध पर्याय दिसतील, त्यामध्ये “नमुना 8 चा उतारा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करा.

ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा (घरठाण उतारा) काढण्यासाठी ऑफलाईन/ऑनलाईन प्रोसेस (Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara)
ग्रामविकास व पंचायत राज विभाग – नमुना 8 चा उतारा

त्यानंतर “महाऑनलाईन” हे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये “Assessment Certificate” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा (घरठाण उतारा) काढण्यासाठी ऑफलाईन/ऑनलाईन प्रोसेस (Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara)
Assessment Certificate

नमुना ८ नियम ३२ (१) नुसार खालील प्रमाणे अर्जदाराची माहिती आणि नमुना ८ उताऱ्यानुसार संपूर्ण तपशील भरा.

  • जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव, आणि ग्रामपंचायतीचे नाव.
  • रस्त्याचे नाव / गल्ली चे नाव, गट क्र. / भूमापन क्र. / नगर भूमापन, मालमत्ता क्रमांक
  • मालकाचे (धारण करणाऱ्याचे) नाव, भोगवटा करणाऱ्याचे नाव,
  • मालमतेचे वर्णन, मिळकत बांधकामाचे वर्ष (मिळकतीचे वयोमान वर्षांमध्ये)
  • क्षेत्रफळ चौ. मी / (चौ.फू), जमीन, इमारत, बांधकाम, घसारा दर, इ. वापरा नुसार भारांक, भांडवली मूल्य, कराचा दर.
  • इमारत कर, दिवाबत्ती कर, आरोग्य कर.
  • सर्वा. / खा स. पा. पट्टी, इमारत कर, दिवाबत्ती कर, नंतर वाढ किंवा घट झालेल्या बाबतीत आदेशाच्या संदर्भात शेरा.

अर्जदाराची माहिती आणि नमुना ८ उताऱ्यानुसार संपूर्ण तपशील भरल्यानंतर ‘Apply‘ बटनवर क्लिक करा आणि ‘Application Id‘ जतन करून ऑनलाईन पेमेंट करा. अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ७ दिवसांमध्ये आपले सरकार मध्ये लॉगिन करून, ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा (घरठाण उतारा) डाऊनलोड करू शकता.

हेही वाचा – ग्रामपंचायत नमुना 1 ते 33 (अभिलेख) विषयीची सविस्तर माहिती – ग्रामपंचायत नमुना 1 ते 33 PDF फाईल डाउनलोड करा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

3 thoughts on “ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा (घरठाण उतारा) काढण्यासाठी ऑफलाईन/ऑनलाईन प्रोसेस (Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara)

  • Ashutosh Mahajan

    How to find Land Gut/Survey No. from Namuna No.8 of a House in Grampanchayat?

    Reply
    • घराच्या जागेच्या सातबाऱ्यावर पहा!

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.