वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनसरकारी कामे

आधार अपडेट सेंटरसाठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (CSC Aadhaar UCL Center)

आधार Demographic Update through UCL सेंटर ही सुविधा CSC केंद्र चालकांना मिळवण्यासाठी कसा ऑनलाईन अर्ज करायचा ते आपण या लेखात पाहणार आहोत. Aadhar UCL द्वारे आपण नागरिकांच्या आधार कार्ड मध्ये चुकीच्या असलेल्या माहितीत बदल करू शकतो, अनेक नागरिक आधार कार्ड काढताना गडबडी मध्ये किंवा चुकून चुकीची माहिती भरली जाते, त्यामुळे ते आधार कार्डवर असलेली माहिती व प्रत्यक्ष माहिती याच्यात फरकामुळे अनेक नागरिकांना अडचणी येतात. तसेच आधार सेंटरही कमी प्रमाणात असल्याने नागरिकांना त्याची माहिती बदल करण्यासाठी अनेक दूरवर अनेक चकरा माराव्या लागत होत्या ही नागरिकांची अडचण दूर करण्यासाठी CSC VLE यांना नवीन सेंटर मिळणार आहेत.

CSC आधार अपडेट सेंटर साठी पात्रता:

  • CSC सेंटर (VLE CSC ID)
  • Bank BC कोड असणे गरजेचे आहे.
  • आधार NSEIT ऑपरेटर / पर्यवेक्षक प्रमाणपत्र
  • ऑपरेटर / पर्यवेक्षक पोलिस वेरिफिकेशन कॉपी 3 महिन्यांपेक्षा जुनी नाही
  • ऑपरेटर / सुपरवायझर आधार कार्ड

CSC आधार अपडेट सेंटर आवश्यक साहित्य:

  • डेस्कटॉप /लॅपटॉप कम्प्युटर
  • कलर प्रिंटर
  • वेब कॅमेरा
  • स्कॅनर
  • इंटरनेट कनेक्शन
  • सिंगल फिंगरप्रिंट स्कॅन डिव्हाइस
  • सिंगल IRIS स्कॅन डिव्हाइस
  • TFT मॉनिटर डिव्हाइस
  • GPS डिव्हाइस
  • CCTV कॅमेरा

यूआयडीएआयनुसार लॅपटॉप तपशील मध्ये काय आवश्यक आहे, जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

आधार अपडेट सेंटरसाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज ( CSC Aadhaar UCL Center):

आधार अपडेट सेंटरसाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज करताना सर्व प्रथम CSC eseva UCLची अधिकृत वेबसाइट https://eseva.csccloud.in/ucl/ ओपन करा.

आता CSC eseva UCL ची वेबसाईट ओपन झाल्यावर “Digital Seva Connect” या पर्यायावर क्लिक करा.

इथे तुमचा CSC ID आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

Digital Seva Connect
Digital Seva Connect

वरती CSC ID आणि पासवर्ड टाकून लॉगिन केल्यावर पुढे Aadhaar UCL Registration पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा CSC ID आणि E-Mail ID दिसेल तो चेक करा आणि Proceed या पर्यायावर क्लिक करा.

Proceed
Click On Proceed

आता तुम्हाला तुमचा तपशील भरण्यासाठी एक पेज ओपन होईल, त्या फॉर्म मध्ये आवश्यक ती माहिती भरा आणि सबमिट बटन वर क्लिक करा.

Please Fill Details
Please Fill Details

आधार अपडेट सेंटर चा फॉर्म भरताना खालील माहिती विचारली जाईल:

1. सीएससी आयडी (CSC ID)
2. बँक बीसी कोड ( Bank BC Code)
3. आधार ऑपरेटर किंवा सुपरवायजर सर्टिफिकेट Aadhaar NSEIT Operator/Supervisor certificate
4. आधार ऑपरेटर किंवा सुपरवायजर पोलिस वेरीफीकेशन आहे का जे तीन महिन्यापेक्षा जुने असू नये Operator/Supervisor Police Verification Copy not more than 3 months old
5. ऑपरेटर / सुपरवायजर ई आधार डाउनलोड केलेले (Jpg फॉरमॅट मध्ये) Operator/Supervisor eAadhaar
6. ऑपरेटर / सुपरवायजर यांचा आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर Operator/Supervisor Mobile number linked with aadhaar
7. ऑपरेटर / सुपरवायजर यांचा ईमेल.
8. लॅपटॉप यूआयडीएआय च्या सूचनेनुसार Laptop Available as per UIDAI Specification
9. कलर प्रिंटर आहे का? Colour Multifunction Printer?
10. सिंगल फिंगर प्रिंट डिवाइस (उदा.मंत्रा ,मोर्फो)Single fingerprint scan device avaialable
11. सिगल आयरीस डिवाइस Single IRIS Scan Device
12. TFT Monitor device
13. GPS device
14. पाच लोक बसतील अशी जागा सीएससी सेंटर मध्ये आहे का? CSC Center having the space of waiting area of at least sitting of 5 citizens?
15. सीएससी सेंटरचा आतील व बाहेरील फोटो. Inside And Outside Centar Photo
16. इंटरनेट आहे का ? असल्यास कोणत्या प्रकारचे आहे ? Internet Availability at the Center?
17. सेंटर मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे का ?CCTV Camera availble at the Center?
18. दिव्यांग लोकांसाठी रम्प व व्हीलचेयर आहे का? Divyang Friendly Center with the availability of RAMP and Wheelchair?
19. नंबर लावण्यासाठी टोकन सिस्टिम आहे का? Token System/ Machine available for citizens?
20. शौचालय आहे का? Toilet Facility available at the center for citizens?

ही सर्व पात्रता आपण पूर्ण करत असाल तर आपला अर्ज सीएससी (CSC)कडून मंजूर होऊन आपल्याला आधार अपडेट सेंटर (UCL) मंजूर केले जाईल व आपल्या डिस्ट्रिक मॅनेजर कडून आपल्याला याची माहिती मिळेल.

हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.