वृत्त विशेषसरकारी योजना

चक्रीवादळ/पुरग्रस्तांच्या नुकसानभरपाईसाठी केंद्रसरकारचे महाराष्ट्राला एनडीआरएफ मधून 1,056.39 कोटींचे आर्थिक सहाय्य जारी

प्रत्यक्ष पातळीवर बाधित लोकांना मदत पुरवण्यासह आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी ही संबंधित राज्य सरकारांची आहे. राज्य सरकार चक्रीवादळ आणि पूर सारख्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या मंजूर बाबी आणि नियमांनुसार, राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून मदत पुरवण्यासंबंधित उपाययोजना करतात.

‘गंभीर स्वरूपाच्या’ आपत्तीच्या वेळी निर्धारित प्रक्रियेनुसार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) मधून अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते, ज्याचे मूल्यांकन आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाच्या (IMCT) भेटीच्या आधारे केले जाते.

2021-22 या आर्थिक वर्षात (31.03.2022 पर्यंत) संबंधित राज्याच्या एसडीआरएफच्या प्रारंभिक शिल्लक रकमेच्या 50 टक्के समायोजनानंतर 1 एप्रिल, 2021 रोजी पूर आणि चक्रीवादळांसाठी एनडीआरएफ कडून जारी निधीचे राज्यनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे:-

अ.क्र. राज्याचे नाव आपत्तीचे नाव एनडीआरएफकडून मदत (कोटीमध्ये रु.)
1. आंध्र प्रदेश पूर 351.43
2. बिहार पूर 1,038.96
3. गुजरात चक्रीवादळ ‘तौक्ते’ 1,000.00*
4. झारखंड ‘यास’ चक्रीवादळ 200.00*
5. कर्नाटक पूर 1,623.30
6. मध्य प्रदेश पूर 600.50
7. महाराष्ट्र पूर 1,056.39
8. ओडिशा ‘यास’ चक्रीवादळ 500.00*
9. सिक्कीम पूर/भूस्खलन 55.23
10. तामिळनाडू पूर 566.36
11. पश्चिम बंगाल ‘यास’ चक्रीवादळ 300.00*
पूर 50.13

एनडीआरएफ कडून आगाऊ रक्कम जारी, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

>

गृह मंत्रालय प्रेस रिलीज : गृह मंत्रालय प्रेस रिलीज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – महाराष्ट्र “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजना – CM Relief Fund Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.