आपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

PMFBY Crop insurance : फळपिक विमा योजना सुरु २०२४!

सरकारने फळपिकांसाठीची विमा योजना (PMFBY Crop insurance) लागू केली आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीमध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळ पिकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल.

विविध हवामान घोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना राबविणे शासनाच्या विचाराधीन होते.

पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना (PMFBY Crop insurance) मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) या ८ फळपिकांसाठी २६ जिल्ह्यामध्ये तसेच आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन राबविण्याचे प्रस्तावित आहे.

फळपिक विमा योजना सुरु २०२४ – PMFBY Crop insurance:

प्रधानमंत्री पिक विमा  (Crop insurance) योजनेतंर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षासाठी मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) या ८ फळपिकांसाठी व आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), प्रायोगिक तत्वावर स्ट्रबिरी व पपई या ९ फळपिकांसाठी लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर योजना सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षामध्ये सहपत्र -१ मध्ये नमूद केलेल्या जिल्ह्यांमधील तालुक्यातील महसूल मंडळात सहपत्र २ मध्ये निर्धारीत केलेल्या हवामान धोक्यानुसार लागू करण्यात येत आहे.

सदर योजना कार्यान्वित करणाऱ्या विमा कंपन्या सहपत्र १ मध्ये नमूद केलेल्या अधिसुचित विमा क्षेत्र घटकांकरीता महावेध प्रकल्पांतर्गत कार्यान्वित केलेल्या अधिसुचित संदर्भ हवामान केंद्रावर नोंदल्या गेलेल्या हवामानाची आकडेवारी आणि सहपत्र २ मध्ये नमूद केलेली फळपिक निहाय प्रमाणके यांची सांगड घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करतील. नुकसान भरपाईचे कोणतेही दायित्व शासनावर राहणार नाही.

फळपिक विमा योजनेची उद्दिष्टेः

१. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.

२. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.

३. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.

४. कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून शेतकन्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य करणे,

फळपिक विमा योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :

१. सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी असेल.

२. सदरची योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

३. सदरच्या योजनेत खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र भाडेपट्टीने शेती करणारास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.

४. या योजनेतंर्गत केंद्र शासनाने त्यांचे विमा हप्ता अनुदान ३० टक्के दरापर्यंत मर्यादित केले आहे. त्यामुळे ३० टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्विकारणे क्रमप्राप्त आहे.

५. या योजनेंतर्गत ३० ते ३५ टक्के पर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असुन ३५ टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी प्रत्येकी ५०: ५० टक्के प्रमाणे भरावयाचा आहे.

६. या योजनेत राज्यात प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपीकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे) आणि उर्वरित विभागाकरीता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हे.) अशी मर्यादा राहील तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळुन प्रती शेतकरी ४ हे. मर्यादेपर्यंत राहील.

७. अधिसुचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामा करीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. संत्रा, मोसंबी, डाळिंब व द्राक्ष)

८. सदर फळपीक विमा (PMFBY Crop insurance) योजनेत सहभागी होणाऱ्या शेतक-यांनी ई- पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.

९. विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळणेसाठी शेतकऱ्याचे बैंक खाते आधार आधारित पेमेंट साठी लिंक असावे.

१०. विमा संरक्षणाचे केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच लागु आहे. विहित वयापेक्षा कमी वयाच्या फळबाग लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण केव्हाही संपुष्टात येईल आणि शेतकऱ्याने भरलेला विमा हप्ता जप्त होईल.

अधिसुचित फळपिकांचे उत्पादनक्षम वय:

फळपिक विमा (PMFBY Crop insurance) योजनेत भाग घेण्यासाठी अधिसुचित फळपिकांचे उत्पादनक्षम वय खालील प्रमाणे.

अ.क्र.अधिसूचित फळ पिकउत्पादनक्षम वय (वर्ष)
आंबा
चिकू
काजू
लिंबू
संत्रा
मोसंबी
सिताफळ
पेरू
द्राक्ष
१०डाळिंब

फळपिके – विमा संरक्षित रक्कम (रु. प्रति हेक्टर)

अ.क्र. फळ पिकविमा संरक्षित रक्कम (रु. प्रति हेक्टर)
संत्रा1 लाख
मोसंबी1 लाख
पेरू७० हजार
चिकू७० हजार
डाळिंब१ लाख ६० हजार
लिंबू८० हजार
सिताफळ७० हजार
द्राक्ष३ लाख ८० हजार
9काजू१ लाख २० हजार
10केळी१ लाख ७० हजार
11आंबा१ लाख ७० हजार
12स्ट्रॉबेरी२ लाख ४० हजार
13पपई४० हजार

प्रधानमंत्री फसल बीमा योजना (फळपिक विमा योजना – PMFBY Crop insurance) ऑनलाईन अर्ज करा:

शेतकरी महाऑनलाईन सेवा केंद्र (CSC), आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून खालील संकेतस्थळावर अर्ज करू शकतात किंवा नुकसान भरपाईसाठी PMFBY Crop Insurance App पीक विमा अ‍ॅप वर क्लेम करा.

https://pmfby.gov.in

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग शासन निर्णय:

प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना (PMFBY Crop insurance) राज्यात सन 2024-25 व २०२5-२6 या 2 वर्षामध्ये मृग व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? मग नुकसान भरपाईसाठी असा करा क्लेम आणि लाभ मिळवा – PMFBY Crop Insurance Claim

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.