सरकारी कामेवृत्त विशेषसरकारी योजना

नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाईसाठी आधार प्रमाणीकरण ऑनलाईन प्रोसेस – E -Panchnama KYC MahaOnline

राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्याबाबतच्या निधी उपलब्धतेकरिता प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर करण्यात येतो. प्रचलित कार्यपध्दतीमध्ये विविध बाबींकरिता शासनाकडून निधी वितरणास मान्यता दिल्यानंतर सदर निधी अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (बीडीएस) विभागीय आयुक्त यांना वितरीत करण्यात येतो. विभागीय आयुक्त हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरीत करतात. संबंधित जिल्हाधिकारी हा निधी संबंधित तहसीलदार यांना वितरीत करतात. संबंधित तहसीलदार हे कोषागारात देयक सादर करून रक्कम आहरीत करतात. ही रक्कम तहसीलदारांकडे असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्यानंतर मदतीचा निधी बाधित व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो. सदर प्रकियेमध्ये शासनास प्रस्ताव प्राप्त होणे, प्रस्तावास शासन मान्यता मिळाल्यानंतर त्याबातचा निधी प्राप्त होऊन बाधितांना मदत वितरीत करेपर्यंत बराच कालावधी जातो.

शासन निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, दि. २९.०७.२०२२ अन्वये महात्मा जोतिराव फुले ‘शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना – कार्यान्वित करण्यात आली आहे. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून MAHA IT यांची Portal साठी तांत्रिक सेवा पुरवठादार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अतंर्गत पात्र लाभार्थ्यांना ज्या पध्दतीने प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो, त्याच धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या पात्र बाधित व्यक्तींना द्यावयाच्या मदतीचा निधी प्रचलित कार्यपध्दतीनुसार वितरीत न करता MAHA IT यांचेकडून यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करुन निधी वितरीत करण्याच्या प्रस्तावास विभागीय प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या दिनांक ०४.११.२०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे. शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता पात्र शेतकऱ्यांना द्यावयाचा मदतीचा निधी आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी सुधारित कार्यपध्दती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मदतीचा निधी यापुढे प्रचलित कार्यपध्दतीनुसार वितरीत न करता MAHA IT यांचेकडून यासाठी विकसित करण्यात येणाऱ्या संगणकीय प्रणालीवर खालीलप्रमाणे सर्वसाधारण कार्यपध्दतीनुसार वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

(१) सर्व संबंधित तहसीलदार हे सोबतच्या विवरणपत्रामधील रकान्यात नमूद केलेल्या नमुन्यात पात्र शेतकऱ्यांची सर्व माहिती Excel format मध्ये भरून, MAHA IT या कंपनीकडून त्यांना उपलब्ध करून दिलेल्या लॉगीनद्वारे याकरिता विकसित केलेल्या पोर्टल वर पाठवतील. तहसीलदार यांचेकडून संगणकीय प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हाधिकारी यांचे वतीने त्यांनी प्राधिकृत केल्यानुसार संबंधित प्रांतअधिकारी किंवा निवासी उप जिल्हाधिकारी यांच्याकडून अनुमोदीत करण्यात येतील. या याद्या शासनाने यासाठी मंजूर केलेल्या जिल्हानिहाय निधीच्या मर्यादेत अनुमोदीत करण्यात येतील.

>

(२) तहसीलदार यांनी उपलब्ध करुन दिलेल्या माहितीचे संगणकीय प्रणालीवर संस्करण करण्यात येईल. ज्या माहितीमध्ये त्रुटी आहेत ( उदा. लाभार्थ्यांची द्विरुक्ती, आधार क्रमांक अयोग्य असणे, इ.) अशी माहिती त्रुटी दूर करण्यासाठी तहसीलदार यांना संगणकीय प्रणालीवर दर्शविण्यात येईल. यामुळे एकाच व्यक्तीच्या नावे दोघांना अथवा एकाच बाधित क्षेत्राकरिता दोन व्यक्तींना होणारे रकमेचे प्रदान टाळता येईल. तहसिलदार यांना या माहितीमध्ये आवश्यक ती दुरूस्ती करता येईल आणि ही माहिती पुन्हा संगणकीय प्रणालीवर upload करता येईल. तहसिलदार व प्रांतअधिकारी किंवा निवासी उप जिल्हाधिकारी यांचेकरिता Standard Operating Procedure (SOP) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

(३) अशा रितीने संस्करीत झालेल्या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांचे नाव, बाधीत क्षेत्र, मदतीची रक्कम इ. तपशील दर्शविणारी विशिष्ट क्रमांक यादी (VK List) संगणकीय प्रणालीवर तयार करण्यात येईल. ही यादी तहसीलदार यांना पोर्टल वरुन डाऊनलोड करून घेता येईल. ही यादी ग्रामपंचायतनिहाय देखील उपलब्ध असेल व ती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाहीररित्या प्रसिध्द करण्यात येईल. या विशिष्ट क्रमांक यादीचे वाचन करण्यासाठी संबंधित तलाठी / ग्रामसेवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.

(४) विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी यांना नजिकच्या Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन त्यांची आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटविणे आवश्यक राहिल. लाभार्थ्यांनी ओळख पटविल्यानंतर विभागाने यासाठी खाते उघडलेल्या बँके मार्फत (SBI) रक्कम थेटरित्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल. जर विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी नजिकच्या Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र येथे बायोमेट्रिक ओळख पटविण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विशिष्ट क्रमांक यादीमध्ये काही माहिती (नाव, खाते क्रमांक, आधार क्रमांक इ.) चुकीची आढळल्यास, त्यांना त्याबाबत Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ यांना अवगत करण्याची सुविधा असेल. तद्नंतर Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र सदर माहिती दुरुस्तीसाठी संबंधित तहसिलदार यांना पाठवेल. तहसिलदार यांचेकडून सदर माहिती दुरूस्ती झाल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांना Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे जाऊन त्यांची आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटविल्यानंतर SBI मार्फत रक्कम थेटरित्या त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

(५) हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यासाठी सध्या SBI मध्ये स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येईल.

नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीसाठी निधी उपलब्धतेकरिताचे प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर केल्यानंतर शासन मान्यतेने त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे आवश्यक तो निधी लेखाधिकारी आव्यप्र-६ यांना बीम्स प्रणालीवर वितरीत केल्यानंतर, ज्ञापनाद्वारे निदेशित केल्यानुसार लेखाधिकारी आव्यप्र-६ यांचेकडून आवश्यक निधी कोषागारामार्फत State bank of India या बँकेच्या खाती जमा करण्यात येईल आणि त्यामधून ओळख पटविलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या मदतीचे थेट वितरण लाभार्थ्यांच्या बँक खात्यात करण्यात येईल. आधार प्रमाणीकरणाची सेवा शेतकऱ्यांसाठी विनाशुल्क असेल.

नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाईसाठी आधार प्रमाणीकरण ऑनलाईन प्रोसेस – E -Panchnama KYC MahaOnline:

नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाईसाठी आधार प्रमाणीकरण ऑनलाईन करण्यासाठी खालील महाऑनलाईन CSC च्या वेबसाईट ओपन करा.

https://cscservices.mahaonline.gov.in/DashBoard/Login.aspx

तुमच्याकडे लॉगिन करण्यासाठी CSC VLE युजर आयडी, पासवर्ड नसेल तर जवळच्या CSC सेंटर किंवा ग्रामपंचायत मधील आपले सरकार केंद्रा मध्ये जाऊन ऑनलाईन आधार प्रमाणीकरण करू शकता.

महाऑनलाईन CSC ची वेबसाईट ओपन झाल्यावर युजर आयडी, पासवर्ड टाकून लॉगिन करा.

CSC VLE
CSC VLE

पोर्टल मध्ये लॉगिन झाल्यावर प्रथम आपली मराठी भाषा निवडा. त्यानंतर डाव्या बाजूला “आधार प्रमाणीकरण” मध्ये “नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान मदत” या पर्यायावर क्लीक करा.

आधार प्रमाणीकरण
आधार प्रमाणीकरण

मदत व पुनर्वसन विभागाची पोर्टल ओपन होईल त्यामध्ये Vishisht Kramank मध्ये तलाठी यांच्याकडे लाभार्थी विशिष्ठ क्रमांक मिळेल तो टाकून सर्च करा.

Vishisht Kramank
Vishisht Kramank

विशिष्ट क्रमांक सर्च केल्यानंतर लाभार्थ्यांचे खालील तपशील आपल्याला पाहायला मिळेल.

  • विशिष्ट क्रमांक
  • शेतकऱ्याच गाव
  • गट क्र.
  • तोटा चा प्रकार
  • बाधित क्षेत्र हेक्टर
  • वितरीत केलेली रक्कम
  • आधार नुसार शेतकऱ्याचे नाव
  • शेतकरी आधार नं.
  • बँकेचे नाव
  • बचत खाते क्र.
  • शाखा IFSC कोड
    मोबाईल क्र.

पुढे आधार प्रमाणीकरण बाबतीमध्ये कोणतीही तक्रार असेल तर निवड करायची आहे किंवा तक्रार नसेल तर No grievance निवडून आधार प्रमाणीकरण करण्याच्या परवानगीसाठी बॉक्स मध्ये टिक करा आणि मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाकून OTP/बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करा.

E -Panchnama KYC
E -Panchnama KYC

आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर आपल्याला त्याची पावती मिळेल त्याची आपण प्रिंट काढू शकता. या प्रोसेस नंतर आपल्याला अनुदानाची रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाईल.

हेही वाचा – जून ते ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत जाहीर !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

3 thoughts on “नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाईसाठी आधार प्रमाणीकरण ऑनलाईन प्रोसेस – E -Panchnama KYC MahaOnline

  • SUSHIL JIVAN RATHOD

    आधार प्रमाणीकरण झाले आहे नंतर कळले की बँक डिटेल्स चुकले आहे तर पैसे दुसर्‍याच्या अकाऊंट नंबर ला जातील का

    Reply
  • गजानन महामुने

    OTP पण येत नाही आणि बायोमेट्रिक ने अंगठा पण येत नाही अशा वेळेस काय पर्याय आहे
    कारण बरेच वयस्क लोकांचे हे प्राब्लेम आहेत
    दुसरी गोष्ट या साठी CSP वाल्यांना किती पैसे द्यायचे कारण ते 50 पासून 100 रुपया पर्यंत प्रत्येकी घेत

    Reply
  • प्रल्हाद पुंजाजी चव्हाण

    Kyc jali aahe pan ajun piase jama nahi jale

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.