घरबसल्या करा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नवीन पोर्टल लॉन्च – Aadhar card Mobile number link Service Request
UIDAI आणि IndiaPost ने पुन्हा एक नवीन पोर्टल लॉन्च केले आहे, या पोर्टलच्या मदतीने कोणतीही व्यक्ती घरबसल्या आधार अपडेट (मोबाईल नंबर/ईमेल आयडी लिंक करणे) करू शकते. याशिवाय पोस्ट ऑफिसची अनेक प्रकारची कामेही या पोर्टलच्या मदतीने करता येतील.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने 22 मार्च रोजी आपल्या ट्विटर खात्यावर एक ट्विट पोस्ट केले आहे, “आता तुम्ही घरबसल्या इंडियापोस्ट सेवा सर्व्हिस पोर्टलद्वारे आधार आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेशी संबंधित कामे करू शकाल.
पोस्ट पेमेंट बँक ऑफिशियल ट्विट –
No more rushing to the bank for your basic banking transactions. With @IPPBonline, your Postman/ Gramin Dak Sevak brings the bank to you through our #doorstep banking services.
For online booking of IPPB Doorstep services, please submit request at – https://t.co/44novdHlvu
[1/3] pic.twitter.com/d632Ep2rsz— India Post Payments Bank (@IPPBOnline) March 22, 2022
या पोर्टलद्वारे तुम्ही या सर्व गोष्टी करू शकाल –
- तुम्ही पोस्ट पेमेंट बँक खाते उघडू शकाल आणि बँकेशी संबंधित अनेक प्रकारची कामे करू शकाल.
- कर्जाशी संबंधित सेवा उपलब्ध असतील.
- पैसे ट्रान्सफर करू शकाल.
- AePS सुविधा घेऊ शकतील.
- रिचार्ज आणि बिल पेमेंट करू शकतील.
- विम्याशी संबंधित सेवांचा लाभ घेता येईल.
- G2C सेवा घेण्यास सक्षम असेल.
- आधार मोबाईल नंबर लिंक करू शकणार आहे.
- 1 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी आधार कार्ड बनवता येते.
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी अर्ज कसा करायचा ( Aadhar card Mobile number link Service Request):
जर तुम्हाला आधार कार्ड अपडेट/मोबाईल नंबर लिंक किंवा पोस्ट पेमेंट बँकेशी संबंधित काम करायचे असेल आणि ही कामे करण्यासाठी पोस्टमनला घरी बोलावायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला या नवीन पोर्टलवरून अर्ज करावा लागेल. सर्व प्रथम खालील IndiaPost च्या पोर्टलला भेट द्या.
https://ccc.cept.gov.in/ServiceRequest/request.aspx
पोर्टल ओपन झाल्यानंतर खालील तपशील भरा.
- आपले नाव टाका.
- पत्ता टाका.
- पिनकोड.
- ई-मेल ऍड्रेस.
- मोबाईल नंबर.
- सर्व्हिस निवडा (यामध्ये आधार सर्व्हिससाठी IPPB – Aadhar Services निवडा.)
- UIDAI – Mobile/E-Mail to Aadhar linking/update निवडा.
वरील तपशील भरल्यानंतर ओटीपी टाकून Confirm Service Request वर क्लिक करा.
Confirm Service Request वर क्लिक केल्यानंतर रेफरन्स नंबर दिसेल तो नंबर घेऊन खालील लिंक वर जाऊन तुमची Service Request ट्रॅक करू शकता.
https://ccc.cept.gov.in/ServiceRequest/Track.aspx
पुढे तुमच्या गावातील किंवा भागातील पोस्टमन तुमच्या घरी येईल, तेव्हा तुम्ही त्याला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यास सांगू शकता किंवा इतर पोस्ट पेमेंट बँक संबंधित सेवा घेऊ शकतात.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!