वृत्त विशेष

Satbara: सातबाऱ्यावरील बदलाची माहिती आता ‘एसएमएस’वर मिळणार

राज्यामध्ये जमिनीसंदर्भात सातबारा (Satbara) किंवा मिळकत पत्रिकेमध्ये कोणत्याही स्वरूपाचा काही बदल होत असल्यास त्याची माहिती लगेच समजण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून पावले उचलण्यात येत आहेत. यासाठी भूमी अभिलेख विभाग नाममात्र शुल्क आकारून ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ची सुविधा लवकरच उपलब्ध करून देणार आहे.

भूमी अभिलेख विभागाने जास्तीत जास्त ऑनलाइन पत्रिकांचे मिळकत डिजिटायझेशन भूमी अभिलेख सातबारा (Satbara) उताऱ्यातील आहे. याशिवाय बदलाची माहिती सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘अधिकार अभिलेख’ म्हणजे सातबारा उतारा (Satbara) अथवा पत्रिकांचे मिळकत डिजिटायझेशन राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने केले आहे. याशिवाय फेरफार उताऱ्यावर शंभर टक्के नोंदी या ऑनलाइन घेतल्या लगेच समजणार आहेत. जमिनीच्या मोजणीची ई- नोटीस अर्जदारांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई-मोजणी व्हर्जन दोन हा पर्यायही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सातबाऱ्यावरील (Satbara) बदलाची माहितीचे असे असेल स्वरूप:

राज्य शासनाकडून नाममात्र दर निश्चित झाल्यानंतर प्रति मिळकत दरवर्षी तेवढे शुल्क शासनाकडे जमा करावे लागणार आहे. जेव्हा कधी त्या मिळकतीवर मोजणी माध्यमातून हद्दीत अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदलाबाबत कोणतीही कार्यवाही सुरू असेल, तर त्याचा एसएमएस ही सुविधा घेणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइलवर येणार आहे. ई-मेल नोंदविला असल्यास त्यावरही माहिती मिळणार आहे.

जमीन मोजणीच्या माध्यमातून अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदल होत असल्यास त्याची माहिती नवीन पोर्टल संबंधित जमिनीच्या मालकास तत्काळ मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाने याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. पोर्टल विकसनासाठी साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

भूमी अभिलेख विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या सुविधेमुळे एखाद्या जमिनींमध्ये मोजणीच्या माध्यमातून अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदल होत असल्यास त्यांची माहिती संबंधित जमिनींच्या मालकास तत्काळ मिळणार आहे. त्यासाठी जमिनींच्या मालकांना महाभूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर नजर ठेवण्याची गरज राहणार नाही. ही सुविधा नागरिकांना अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. पोर्टल विकसनास किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

सातबाऱ्यावरील (Satbara) बदलाची माहितीची अशी आहे सुविधा:

राज्य सरकारकडून नाममात्र दर निश्चित झाल्यानंतर प्रती मिळकत दरवर्षी तेवढे शुल्क शासनाकडे जमा करावे लागणार आहे. जेव्हा कधी त्या मिळकतीवर मोजणी माध्यमातून हद्दीत अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदलाबाबत कोणतीही कार्यवाही सुरू असेल, तर त्याचा एसएमएस ही सुविधा घेणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर येणार आहे. ई-मेल नोंदविला असेल्यास त्यावरही याबाबतची माहिती मिळेल. मिळकतीच्या सातबारा (Satbara) अथवा मिळकत पत्रिकेबाबत अपडेटेशन मिळत राहणार आहे.

हेही वाचा – सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? Satbara correction in Marathi

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.