आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आधार बायोमेट्रिक लॉक/अनलॉक कसे करायचे?
आपण या लेखामध्ये आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आधार (Aadhaar card biometric Lock Unlock) बायोमेट्रिक लॉक/अनलॉक कसे करायचे? ते सविस्तर पाहणार आहोत. आधार कार्ड हे कोणत्याही भारतीय नागरिकासाठी महत्त्वपूर्ण मानलं जाते. आधारकार्डच्या माध्यमातून आपण बऱ्याच सरकारी योजनांचा सहज लाभ घेऊ शकता. पण जर तुमचं आधार कार्ड कुठे हरवले तर तुम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच कधीकधी हरवलेल्या आधारकार्डाचा गैरवापरही केला जाऊ शकतो. मात्र आता तुम्हाला याबाबत चिंता करण्याची काहीही गरज नाही.
आधार कार्ड हा एक महत्वाचा (unique identification number) युनिक आयडेंटिफिकेशन ओळख क्रमांक आहे आणि लोक आधार कार्ड हे ओळख किंवा पत्ता पुरावा दस्तऐवज म्हणून वारंवार वापरतात. आधारमध्ये तुमची महत्वाची माहिती आहे आणि म्हणूनच माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आधार कार्ड प्राप्त करताना, व्यक्तींनी त्यांचा रेटिनल आणि फिंगरप्रिंट स्कॅन डेटा सरकारला प्रदान करणे आवश्यक आहे. इतर सेवांचा लाभ घेताना या बायोमेट्रिक डेटाचा उपयोग पडताळणीसाठी केला जाऊ शकतो.
यूआयडीएआय सर्व्हरवर साठवलेला बायोमेट्रिक डेटा फक्त लॉक करून लोक आधार कार्डचा गैरवापर करण्यापासून टाळू शकतात. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा डेटा अनलॉक केला जाऊ शकतो आणि आपण तो पुन्हा लॉक करण्यापूर्वी सत्यापनासाठी वापरला जातो.
आधार बायोमेट्रिक लॉक/अनलॉक – Aadhaar card biometric Lock Unlock:
नागरिकांसाठी वैयक्तिक डेटाची सुरक्षा आणि गोपनीयता हे मुख्य लक्ष केंद्रित केले आहे, सुरक्षितता मजबूत करण्यासाठी पुढील प्रयत्न आणि रहिवाशांना नियंत्रण प्रदान करण्यासाठी 12 अंकी यूआयडी लॉक करणे आणि अनलॉक करण्यास समर्थन पुरविले आहे.
आपण आपला यूआयडी नंबर रहिवासी पोर्टल मार्गे लॉक करू शकतो, असे करून बाईमेट्रिक, डेमोग्राफिक आणि ओटीपी आधारित प्रमाणीकरणासाठी यूआयडी, यूआयडी टोकन आणि एएनसीएस टोकनचा वापर करुन रहिवासी कोणत्याही प्रकारचे प्रमाणीकरण करू शकत नाही. एकदा यूआयडी लॉक झाल्यावर निवासी सर्व प्रकारच्या प्रमाणीकरणासाठी (डेमो, बायो आणि ओटीपी) 16 अंकी व्हीआयडी नंबर वापरुन प्रमाणीकरण करू शकतो.
आपण यूआयडी अनलॉक करू इच्छित असल्यास तो निवासी पोर्टलवर हे करू शकतो. अनलॉक केल्यानंतर रहिवासी यूआयडी, यूआयडी टोकन आणि एएनसीएस टोकन बायोमेट्रिक, डेमो आणि ओटीपी आधारित व्यवहारासाठी प्रमाणीकृत करू शकतात आणि तो व्हीआयडीसह अधिकृत करू शकतो.
आधार कार्ड लॉक करण्याची प्रोसेस – Aadhaar card biometric Lock:
आधार कार्ड लॉक (Aadhaar card biometric Lock Unlock) करायचे असल्यास खालील लिंक वर क्लिक करून UIDAI ची MYAadhaar वेबसाईट ओपन करा.
https://myaadhaar.uidai.gov.in/
यूआयडीएआय My Aadhaar वेबसाइट ओपन झाल्यानंतर ‘Lock Unlock Biometrics’ वर क्लिक करा.

लॉक अनलॉक बायोमेट्रिक्स क्लिक केल्यानंतर Next वर क्लिक करा आणि “I Understand that after locking my biometric, I will not be able to perform biometric authentication until I unlock my Biometrics.” वर टिक करून Next वर क्लिक करा.

स्क्रीनवर पुढील संदेश येईल, “Your biometrics have been locked successfully” तुमचा आधार नंबर यशस्वीरित्या लॉक झाला आहे. प्रमाणीकरणासाठी व्हीआयडी वापरा.
आधार कार्ड अनलॉक करण्याची प्रोसेस – Aadhaar card biometric Unlock:
आता आधार कार्ड (यूआयडी) अनलॉक करण्यासाठी पुन्हा खालील लिंक वर क्लिक करून UIDAI ची MYAadhaar वेबसाईट ओपन करा.
https://myaadhaar.uidai.gov.in/
यूआयडीएआय My Aadhaar वेबसाइट ओपन झाल्यानंतर ‘Lock Unlock Biometrics’ वर क्लिक करा.
लॉक अनलॉक बायोमेट्रिक्स क्लिक केल्यानंतर Next वर क्लिक करा आणि “I Understand that after unlocking my biometric, I will be able to perform biometric authentication.” वर टिक करून ‘Unlock Biometrics Temporarily‘ किंवा ‘Unlock Biometrics Permanently‘ निवडून Next वर क्लिक करा.

सबमिट वर क्लिक करा. आपले यूआयडी यशस्वीरित्या अनलॉक केले जाईल.
या लेखात, आम्ही आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आधार बायोमेट्रिक लॉक/अनलॉक (Aadhaar card biometric Lock Unlock) कसे करायचे? विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- आधारकार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्याची प्रोसेस ! Download Aadhaar Card in PDF File
- आधार PVC कार्ड ATM सारखं दिसणार आधार कार्ड ऑनलाईन ५० रुपयात बनवा, जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Aadhaar PVC card)
- आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- मुलींच्या लग्नानंतर आधार कार्डवरील नाव बदलण्याची प्रोसेस !
- तुमच्या आधारकार्डवर किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत ते पहा !
- तुमचे आधार कार्ड कुठे वापरले जातेय ? असे तपासा !
- घरबसल्या आधारकार्डला नवीन मोबाईल नंबर अपडेट होणार!
- आता पोस्टमन काढणार लहान मुलांचे आधारकार्ड; जाणून घ्या सविस्तर माहिती !
- (PAN 2.0) – पॅन कार्ड वरील मोबाईल नंबर, ईमेल आयडी व पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- पॅनकार्ड हरवल्यास काय करावे? तुमचा पॅन कार्ड नंबर आठवत नसेल तर कसा शोधावा ?
- पॅनकार्ड आधार कार्डला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस – PAN Card Aadhar Card Link
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!