आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
आताच्या काळामध्ये आधार कार्ड आपल्याकडे असणे खूप गरजेचे आहे, कारण कोणतेही शासकीय किंवा सरकारी योजना असेल त्यामध्ये आपल्याला आधार कार्ड असणे गरजेचे आहे. पण कधीकधी आपल्या आधार कार्ड वरील पत्यामध्ये (Aadhaar Address Update) बदल करायचा असल्यास आपल्याला आधार सेंटर ला जावे लागते यामध्ये आपला वेळ आणि पैसे दोन्हीही वाया जातो, पण आता तुम्ही ते घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने त्यामध्ये बदल करू शकता. यासाठी तुम्हाला ५० रुपये चार्जेस आकारले जातील. पण हे बदल करण्यासाठी आपल्या आधार कार्ड ला आपला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
आपण या लेखामध्ये आपल्या आधार कार्ड वरील पत्ता (Aadhaar Address Update) ऑनलाईन अपडेट कसा करायचा याची सविस्तर माहिती घेणार आहोत.
आधार कार्ड वरील पत्ता अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस – Aadhaar Address Update:
आपल्या आधार कार्ड वरील पत्त्या मध्ये काही बदल करायचे असल्यास खालील लिंक वर क्लिक करून UIDAI ची MYAadhaar वेबसाईट ओपन करा.
https://myaadhaar.uidai.gov.in
वरील UIDAI च्या MYAadhaar पोर्टल वरती गेल्यावर त्यामध्ये तुम्हाला Login या ऑप्शन वर क्लिक करा.
Login वर क्लिक केल्यानंतर तुमचा १२ अंकी आधार नंबर, कॅप्चा कोड टाका व Send OTP या ऑप्शन वर क्लिक करा नंतर रजिस्टर मोबाइल नंबर वर जो OTP नंबर येईल तो टाकून Login ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
लॉगिन केल्यानंतर Address Update या वरती क्लिक करायचे आहे.
आता येथे आधार कार्ड वरील पत्ता (Aadhaar Address Update) दोन प्रकारे अपडेट करू शकता १) Update Aadhaar Online (सामान्य आधार ऑनलाइन अपडेट) २) Head Of Family (HOF) based Address Update (कुटुंब प्रमुख (HOF) आधारित पत्ता अपडेट) यामध्ये आपण Update Aadhaar Online क्लिक करून पत्ता अपडेट (Aadhaar Address Update) करणार आहोत.
पुढे “Proceed to Update Aadhaar” पर्यायावर क्लिक करा.
आधार कार्ड वरील पत्ता ऑनलाईन अपडेट (Aadhaar Address Update) करण्यासाठी येथे Address या पर्यायावर क्लिक करून Proceed to Update Aadhaar वर क्लिक करा.
सूचना:- नाव, लिंग, जन्म तारीख, मोबाईल नंबर, ईमेल आणि बायोमेट्रिक्स डेटा अपडेटसाठी, कृपया जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट द्या.
पुढे आपला नवीन पत्ता टाका आणि आवश्यक एक कागदपत्र निवडून ते अपलोड करा. आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पुढे खालील दोन्ही ऑप्शन वर टिक करा आणि त्यानंतर Next बटन वर क्लिक करा.
- Allow UIDAI to correct any transliteration related inaccuracy which may have occurred.
- I hereby confirm that I have read the instructions carefully and the information provided by me to the UIDAI is true and correct.
पुढे “I hereby confirm that I have read and understood the Payments / Cancellation / Refunds Process.” या ऑप्शन वर क्लिक करून Make Payment या ऑप्शन वरती क्लिक करा.
तुम्हाला ऑनलाइन अपडेटसाठी ₹ 50 (फक्त पन्नास रुपये) भरावे लागतील. तुम्ही क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे पेमेंट करू शकता.
पेमेंट केल्यावर तुम्ही (Acknowledgement Slip) पोचपावती Download Acknowledgement बटन वर क्लिक करून डाउनलोड करून ठेवा.
आधार अपडेट स्टेट्स चेक करण्यासाठी पुन्हा डॅशबोर्ड वर येऊन Requests मध्ये बाण चिन्हावर क्लिक करून विनंतीची तपशीलवार स्थिती तपासू शकता.
आधार कार्ड मध्ये बदल झाल्यावर तुम्हाला इथे प्रोसेस स्टेट्स दाखवेल किंवा रजिस्टर मोबाईलवर एसएमएस द्वारे सूचना मिळेल. संपूर्ण अपडेट प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 5-7 दिवस लागतात. तुमची विनंती आधी नमूद केलेल्या वेळेपर्यंत अपडेट केली जाईल.
आधार कार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्याची प्रोसेस:
आधार कार्डवरील पत्ता (Aadhaar Address Update) बदलण्याची वरील प्रोसेस झाल्यानंतर आधार कार्ड ऑनलाईन डिजिटल स्वरूपात डाउनलोड करू शकता, खालील प्रोसेस नुसार आधार कार्ड PDF फाईल मध्ये ऑनलाईन डाउनलोड करा.
- UIDAI च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
- My Aadhaar पर्यायामध्ये Download Aadhaar वर क्लिक करा.
- आधार नंबर, कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.
- Download Aadhaar पर्यायावर क्लिक करा.
- आधार कार्डचा डेटा पहा आणि तपासा.
- आधार कार्डचा डेटा योग्य असल्यास Download पर्यायावर क्लिक करा.
आधार PVC कार्ड ऑनलाईन ऑर्डर करण्याची प्रोसेस:
आधार कार्डवरील पत्ता (Aadhaar Address Update) बदलण्याची वरील प्रोसेस झाल्यानंतर आधार PVC कार्ड ऑनलाईन ऑर्डर करू शकता, खालील प्रोसेस नुसार Aadhaar PVC Card ऑनलाईन ऑर्डर करा.
- UIDAI ची myAadhaar वेबसाईटला भेट द्या.
- आधार नंबर, कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा.
- Order Aadhaar PVC Card पर्यायावर क्लिक करा.
- Aadhaar PVC Card साठी ₹ 50 फी भरून Acknowledgement Slip डाउनलोड करा.
- ८ दिवसामध्ये Aadhaar PVC Card आपल्या घरी पोस्टने येईल.
पुढील लेख देखील वाचा!
- आधारकार्ड PDF फाईल मध्ये डाउनलोड करण्याची प्रोसेस ! Download Aadhaar Card in PDF File
- आधार PVC कार्ड ATM सारखं दिसणार आधार कार्ड ऑनलाईन ५० रुपयात बनवा, जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Aadhaar PVC card)
- आता पोस्टमन काढणार लहान मुलांचे आधारकार्ड; जाणून घ्या सविस्तर माहिती !
- मुलींच्या लग्नानंतर आधार कार्डवरील नाव बदलण्याची प्रोसेस !
- आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आधार बायोमेट्रिक लॉक/अनलॉक कसे करायचे?
- तुमच्या आधारकार्डवर किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत ते पहा !
- तुमचे आधार कार्ड कुठे वापरले जातेय ? असे तपासा !
- घरबसल्या आधारकार्डला नवीन मोबाईल नंबर अपडेट होणार
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!