मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी जाहीर !
महाराष्ट्र राज्यामध्ये जी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यत 1 कोटी 25 लाख 44 हजार 083 महिलांनी अर्ज केले आहेत. या अर्जदार महिलांना आता पात्रता यादीची (Ladki Bahin Yojana Beneficiary List) प्रतिक्षा लागली आहे. त्यामुळे आता महिलांना पात्रता यादी कुठे पाहता येणार आहे? हे जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजेनेची लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस – Ladki Bahin Yojana Beneficiary List:
आता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या/महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर या याद्या (Ladki Bahin Yojana Beneficiary List) अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे. काही जिल्ह्यांच्या याद्या जर संकेतस्थळावर दिसत नसतील तर त्या लवकरच दिसतील.
प्रत्येकाने आपल्या जिल्ह्या/महानगरपालिकेचे नाव गूगल मध्ये लिहायचं आहे. आपण या ठिकाणी धुळे जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी गूगल मध्ये Dhule Municipal Corporation लिहीत आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या/महानगरपालिकेच्या वेबसाईट ओपन करायची आहे.
आता तुम्हाला मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण – लाभार्थी यादीची (Ladki Bahin Yojana Beneficiary List) लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
पुढे विविध pdf फाईल वार्डनुसार याद्या अपलोड केलेल्या आहेत Dowaload लिंकवर क्लिक करून PDF फाईल डाउनलोड करा.
आता लाभार्थी (Ladki Bahin Yojana Beneficiary List) यादी ओपन करून तुमचे नाव आहे का ते चेक करा.
लाभार्थी यादीची थेट लिंक:
जर ऑनलाईन यादी पाहता आली नाहीतर कुठे पाहाल यादी?
पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या गावात मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण – लाभार्थी यादी पाहता येणार आहे. प्रत्येक गावात समिती मार्फत दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचली जाणार आहेत.
त्यामुळे या दरम्यान महिलांना त्यांचा अर्ज योजनेसाठी पात्र ठरला आहे की नाही? याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे महिलांना गावातील समितीची यादी वाचना दरम्यान हजर राहावे लागणार आहे.
ग्रामस्तरीय समितीच्यामार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांच्या यादीचे वाचन करावे लागणार आहे. तसेच त्यात काही बदल असेल तर तोही करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेचे पैसै कधी जमा होणार खात्यात?
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजनेचे पैसै लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
- लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये लाभासाठी नारीशक्ती दूत ॲपवरून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस !
- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना; ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी नवीन वेबपोर्टल सुरू !
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी जाहीर !
हेही वाचा – लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर अर्जाचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!
Rahul Gadar
👌