वृत्त विशेषकृषी योजनासरकारी योजना

महाडीबीटी पोर्टलवरून विविध कृषी योजनांचा लाभ घ्या

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार विविध कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करता येणार असून यात ४७९ लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे, त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गतही विविध योजना राबविल्या जातात. त्यानुसार जिल्ह्यात वार्षिक कृती आराखडा २०२२-२३ ला मंजुरी मिळाली आहे.

यामध्ये विविध कृषी योजनांचा समावेश असून अर्ज एक योजना अनेक अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्जही करता येणार आहे.

यात जवळपास विविध योजनांसाठी एकूण ४७९ शेतकऱ्यांची निवड केली जाणार असून यासाठी २६१.३९ लक्ष एवढा निधी खर्च होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज  करा:

कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना https://mahadbt.maharashtra.gov.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वत: च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्रावरूनही अर्ज भरू शकतात. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करून इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. तसेच लाभाच्या घटकामध्ये शेतकरी बदल करू शकतात. तरी ज्यांनी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी अर्ज भरावेत.

या योजनांसाठी करता येणार अर्ज:

१. क्षेत्र विस्तारमध्ये ड्रॅगन फ्रुट, सुट्टी फुले, हळद लागवड व मशरूम उत्पादन प्रकल्पाचा १०१ जणांना लाभ मिळणार असून २९.६० लक्ष तरतूद आहे.

२. ३४ जुन्या फळबागाच्या पुनरुज्जीवनासाठी ६.८० लाखाची तरतूद आहे.

३. २७ सामूहिक शेततळ्यांसाठी ९० लाखांची तरतूद आहे.तसेच ३३ शेततळे अस्तरीकरणासाठी २५ लाख मिळणार आहेत.

४. संरक्षित शेतीच्या ३२ प्रकरणांसाठी ५.१२ लाख प्रस्तावित केले आहेत.

५. ६० जणांना मधुमक्षिका पालनासाठी ४८ हजारांचे अनुदान मिळू शकते.

६. १४८ शेतकरी प्रशिक्षणासाठी ७.४० लक्ष, इतकी तरतूद आहे.

७. १२ पॅक हाऊससाठी २४ लक्ष इतकी तरतूद आहे.

८. १६ कांदाचाळीसाठी १४ लक्ष, इतकी तरतूद आहे.

९. रेपर व्हॅन, रायपनिंग चेंबर, प्राथमिक प्रक्रिया केंद्र प्रत्येकी भौतिक प्रत्येकी ३ घेता येणार असून ५४ लाख उपलब्ध आहेत.

१०. १३ फिरते विक्री केंद्र उभारण्यास २ लाखाची तरतूद आहे.

असे एकूण २.६१ कोटींचा हा कृती आराखड मंजूर आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत वार्षिक कृती आराखड्यास मान्यता मिळाली आहे. शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज भरावा. काही अडचण आल्यास तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

हेही वाचा – शेतकरी बांधवांची महाडीबीटी प्रणालीवर लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर आणि पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.