अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी – Ativrushti Nukasan Bharpai Labharthi Yadi
महाराष्ट्र राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी अनुदान हे राज्य शासनातर्फे देण्यात येत आहे. आता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर या याद्या (Ativrushti Nukasan Bharpai Labharthi Yadi) अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे. काही जिल्ह्यांच्या याद्या जर संकेतस्थळावर दिसत नसतील तर त्या लवकरच दिसतील.
या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी जिरायत साठी 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टरी, बागायत साठी 27,000 रुपये प्रति हेक्टर तर फळबागांसाठी 36,000 रु प्रति हेक्टर असे अनुदान हे महाराष्ट्र राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
यासाठी जुलै ते ऑक्टोबर महिन्या मध्ये झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता 5346 कोटी ६७ लाख रुपये इतका निधी आपदग्रस्तांना मदत म्हणून उपलब्ध करून देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम वर्ग करण्याचे काम सुरु आहे. हि मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थी याद्या प्रकाशित कराव्यात अशा सूचना शासननाने दिल्या आहेत. या अनुसरून वेगवेगळ्या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करायला सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांच्या याद्या जर संकेतस्थळावर दिसत नसतील तर त्या लवकरच दिसतील.
अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी – Ativrushti Nukasan Bharpai Labharthi Yadi:
प्रत्येकाने आपल्या जिल्ह्याचं नाव गूगल मध्ये लिहायचं आहे. आपण या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी गूगल मध्ये उस्मानाबाद लिहा तुम्हाला उस्मानाबाद डॉट nic.in किंवा gov.in ची वेबसाईट ओपन करायची आहे.
वेबसाईट ओपन झाल्यावर प्रथम वरती मराठी भाषा निवडा आणि सर्च मध्ये “अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान” असे लिहून एंटर प्रेस करा किंवा मुख्य मेनू मध्ये दस्तऐवज (Documents) किंवा घोषणा (Announcements) मध्ये “सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप(शेतकऱ्यांची यादी)” आपण पाहू शकतो.
आता तुम्हाला काही pdf फाईल दिसतील त्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी ची यादीच्या लिंकवर क्लिक करून ओपन करून तुमचे नाव आहे का ते चेक करा.
हेही वाचा – नैसर्गिक आपत्ती – शेती पिके नुकसान भरपाई अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!