गाव नमुना १-इ (शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती

मागील लेखामध्ये आपण गाव नमुना १, गाव नमुना १ चा गोषवारा, गाव नमुना १-अ, गाव नमुना १-ब, सुधारित गाव नमुना १-क आणि गाव नमुना १-ड विषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे, या लेखामध्ये गाव नमुना १-इ (शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

गाव नमुना १-इ (शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती

गाव नमुना १-इ:

गाव नमुना एक – इ ही एक स्वयंस्पष्ट दुय्यम नोंदवही आहे. या नोंदवहीमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत माहिती असल्यामुळे याचा बराच उपयोग होतो.

यातील स्तंभ १ अनुक्रमांकाचा आहे.

स्तंभ २ मध्ये भूमापन आणि हिस्सा क्रमांक लिहावा. गावात जेव्हा क्रमांक न दिलेल्या शासकीय जमिनींवर अतिक्रमण होते तेव्हा या स्तंभात मार्गाचे, जागेचे नाव इत्यादी तपशील लिहिण्यात यावा.

स्तंभ ३ मध्ये अतिक्रमण करणाऱ्याचे नाव नमूद करावे.

स्तंभ ४ मध्ये अतिक्रमित क्षेत्र हेक्टर – आर मध्ये नमूद करावे व अतिक्रमित क्षेत्राचा कच्चा आराखडा काढावा.

स्तंभ ५ मध्ये अतिक्रमण केव्हापासून झाले तो दिनांक आणि अतिक्रमित जमिनीचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जात आहे ते नमूद करावे.

स्तंभ ६ मध्ये अतिक्रमण ज्या दिवशी नजरेस आले तो दिनांक नमूद करावा.

स्तंभ ७ मध्ये सदर अतिक्रमणाबाबत खंड किंवा आकारणी कोणत्या वर्षांपासून वसूल करायची ते नमूद करावे.

स्तंभ ८ मध्ये स्तंभ ( ४ ) मध्ये नमूद केलेले अतिक्रमण पूर्वी कधी दूर केले होते काय आणि दूर केले असल्यास कोणत्या वर्षी ते नमूद करावे.

स्तंभ ९ मध्ये सदर अतिक्रमणाबाबत घेतलेल्या निर्णयाचा दिनांक व त्याचा तपशील नमूद करावा.

स्तंभ १० हा शेरा स्तंभ आहे. अतिक्रमण दूर केले असल्यास किंवा नियमानुकूल केल्यास त्याचा तपशील या स्तंभात लिहिण्यात यावा.

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!