सरकारी कामेकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

शेताच्या नुकसानीची अशी मिळवा भरपाई

महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल आणि नुकसान भरपाई मिळवायची असेल, तर नुकसानीच्या ७२ तास म्हणजे तीन दिवसांच्या आत तक्रार करणे आवश्यक असते. अन्यथा भरपाईमधून वगळण्यात येते.

विमा कंपनीसोबत संपर्क साधा:

जर तुमच्या पिकांच्या विमा धारक असाल, तर त्यांना तक्रार केल्यानंतर त्यांच्या विमा कंपनीसोबत संपर्क साधा. त्यांना तुमच्या नुकसानाच्या विवरणांची संपूर्णता करून तक्रार करा.

ऑनलाइन तक्रार अशी नोंदवा:

>

प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शुरन्स (Crop Insurance) नावाचे अॅप नंबरचा पर्याय ‘नोंदणी खात्याशिवाय खाते सुरू ठेवा’ हा पर्याय निवडावा.

त्यानंतर पाच प्रकारचे पर्याय आपल्यासमोर येतील. त्यातील पीक नुकसान हा पर्याय निवडावा. त्यानंतर पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती असे दोन पर्याय येतील. त्यातील पीक नुकसानीची पूर्वसूचना’ हा पर्याय निवडावा.

त्यानंतर मोबाइल क्रमांक भरून त्यावरील ओटीपी टाकून सबमिट करा. त्यानंतर हंगाम, वर्ष, योजना, राज्य अशी माहिती भरा.

‘नोंदणीचा स्रोत’ या रकान्यामध्ये विम्याचा फॉर्म कुठून भरला त्याची माहिती भरणे आवश्यक आहे. विमा पॉलिसी क्रमांक भरा. विम्याची संपूर्ण माहिती दिसेल. त्यानंतर कोणत्या पिकाचे नुकसान झाले आहे ते निवडा.

आता फोनवरील लोकेशनचे अॅक्सेस अॅपला देऊन, तपशीलामध्ये घटनेचा प्रकार, दिनांक, वेळेसह पीक वाढीचा टप्पा, नुकसानीची संभाव्य टक्केवारी, फोटो, व्हिडीओ अशी माहिती भरून ‘सादर करा’ या बटणावर क्लिक करा. त्यानंतर जो डॉकेट आयडी नंबर येईल तो जपून ठेवा. त्याचबरोबर नुकसानीची माहिती आपल्या गावातील तलाठ्यालासुद्धा देणे आवश्यक आहे.

हेही वाचा – नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? मग पीक विम्याचा दावा करताना या गोष्टी लक्षात ठेवल्यास नुकसान भरपाई मिळू शकते ! – Crop Insurance Claim

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.