कृषी योजनाआपले सरकार - महा-ऑनलाईनकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागवृत्त विशेषसरकारी योजना

महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे !

शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करत असतो. “अर्ज एक योजना अनेक” या अत्यंत उपयुक्त धर्तीवर विकसित केलेले आपले सरकार महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल कृषि विभागामार्फत राबवला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी एकाच अर्जाद्वारे अनेक वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज करू शकतात. जेव्हा शेतकरी बांधवांची महाडीबीटी प्रणालीवर लॉटरीमध्ये निवड होते आणि त्यानंतर त्यांना महाडीबीटी निवड व पूर्व संमती कागदपत्रे (MahaDBT Farmer Scheme Documents) वेळेत अपलोड करावी लागतात, तेव्हा बऱ्याच जणांना नेमकी कोणती कागदपत्रे द्यायची याबाबत संभ्रम निर्माण होतो. आजच्या या लेखामध्ये आपण लॉटरी लागल्यानंतर आणि पूर्व संमती मिळाल्यानंतर कोणकोणती कागदपत्रे, किती दिवसांच्या आत आणि कशी अपलोड करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा अर्ज कागदपत्रांअभावी बाद होणार नाही.

महाडीबीटी निवड व पूर्व संमती कागदपत्रे – MahaDBT Farmer Scheme Documents:

शेतकरी बांधवांची महाडीबीटी प्रणालीवर लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर आणि पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे (MahaDBT Farmer Scheme Documents) कोणती आहेत ते सविस्तर पाहूया.

महाडीबीटी शेतकरी योजना कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया:

  1. https://mahadbt2.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

  2. शेतकरी नोंदणी करून लॉगिन करा.

  3. आवश्यक योजना निवडा.

  4. लॉटरीत निवड झाल्यानंतर सूचना मिळतील.

  5. दिलेल्या मुदतीत सर्व कागदपत्रे PDF / Scan करून अपलोड करा.

  6. सबमिट केल्यानंतर अर्ज स्थिती “Submitted” दिसेल.

१) ठिबक/तुषार सिंचन:

निवड झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे

1) मुळ 7/12 उतारा
2) मुळ 8 -अ उतारा
3) सामाईक 7/12 असेल तर संमती पत्र
4) लाभार्थी अनु. जाती/जमाती प्रवर्गातील असेल तर वैध अधिका-याचे प्रमाणपत्र

पूर्व संमती मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे

1) मुळ देयक (पुर्व संमती मिळाल्यानंतरच्या तारखेचे)
2) परिशिष्ट -6 (संकल्प आराखडा व प्रमाणपत्र)
3) परिशिष्ट -6 (हमीपत्र)

२) कांदाचाळ/शेडनेट/पॅकहाऊस/ड्रॅगन फ्रुट, अव्होकॅडो लागवड:

निवड झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे

1) मुळ 7/12 उतारा
2) मुळ 8 – अ उतारा
3) सामाईक 7/12 असेल तर संमती पत्र
4) लाभार्थी अनु. जाती/जमाती प्रवर्गातील असेल तर वैध अधिका-याचे प्रमाणपत्र
5) प्रकल्प आराखडा

पुर्व संमती मिळाल्यानंतर 45 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे

१) कांदाचाळ/शेडनेट/पॅकहाऊस साठी मार्गदर्शक सुचनेप्रमाणे काम  पुर्ण करुन मुळ देयके (पूर्व संमती मिळाल्यानंतरच्या तारखेचे) (जीएसटी बिल)
२) ड्रॅगन फुट, अव्होकॅडो लागवड यासाठी रोपे खरेदीचे नोंदणीकृत रोपवाटीकेचे देयक

३) ट्रॅक्टर:

निवड झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे

1) मुळ 7/12 उतारा
2) मुळ 8 – अ उतारा
3) सामाईक 7/12 असेल तर संमती पत्र
4) लाभार्थी अनु. जाती/जमाती प्रवर्गातील असेल तर वैध अधिका-याचे प्रमाणपत्र
5) ट्रॅक्टरचे कोटेशन
6) मान्यताप्राप्त तपासणी संस्थेचा परिक्षण अहवाल घटक

पुर्व संमती मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे

1) मुळ देयक (पूर्व संमती मिळाल्यानंतरच्या तारखेचे)
2) खरेदी रक्कम RTGS द्वारे डिलरकडे जमा केल्याची पावती
3) ट्रॅक्टर विमा पावती
4) ट्रॅक्टर RTO नोंदणी पावती

४) कृषि अवजारे:

निवड झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे

1) मुळ 7/12 उतारा
2) मुळ 8 – अ उतारा
3) सामाईक 7/12 असेल तर संमती पत्र
4) लाभार्थी अनु. जाती/ जमाती प्रवर्गातील असेल तर अधिका-याचे प्रमाणपत्र
5) ज्या अवजारासाठी निवड झाली त्याचे कोटेशन
6) मान्यता प्राप्त तपासणी संस्थेचा परिक्षण अहवाल

पूर्व संमती मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे

1) मुळ देयक (पूर्व संमती मिळाल्यानंतरच्या तारखेचे)
2) खरेदी रक्कम RTGS द्वारे डिलरकडे जमा केल्याची पावती

५) शेततळे अस्तरीकरण/शेततळे/पंपसंच/पीव्हीसी पाईप:

निवड झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे

1) मूळ 7/12 उतारा
2) मुळ 8 – अ उतारा
3) सामाईक 7/12 असेल तर संमती पत्र
4) लाभार्थी अनु. जाती/जमाती प्रवर्गातील असेल तर वैध अधिका-याचे प्रमाणपत्र

पुर्व संमती मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अपलोड करावयाची कागदपत्रे

1) मुळ देयक ( पुर्व संमती मिळाल्यानंतरच्या तारखेचे)
2) खरेदी रक्कम RIGS द्वारे डिलरकडे जमा केल्याची पावती

महाडीबीटी शेतकरी योजना कागदपत्रे अपलोड करताना लक्षात ठेवायच्या टिप्स

  • कागदपत्रे स्पष्ट व वाचनीय असावीत.
  • PDF फाईल 1 MB पेक्षा कमी असावी.
  • सर्व कागदपत्रांची मूळ प्रत जवळ ठेवा.
  • वेळेत अपलोड न केल्यास अर्ज बाद होतो.

वरील प्रमाणे महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर कागदपत्रे (MahaDBT Farmer Scheme Documents) अपलोड करावयाची आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्र.1: महाडीबीटी शेतकरी योजना कागदपत्रे कोणती आवश्यक आहेत?
उ. मूळ 7/12 उतारा, 8A उतारा, संमतीपत्र, जातीचे प्रमाणपत्र, प्रकल्प आराखडा, कोटेशन व मूळ देयके आवश्यक असतात.

प्र.2: कागदपत्रे (MahaDBT Farmer Scheme Documents) कधी अपलोड करावी लागतात?
उ. लॉटरीत निवड झाल्यानंतर 10 दिवसांत प्राथमिक व 30-45 दिवसांत अंतिम कागदपत्रे (MahaDBT Farmer Scheme Documents) अपलोड करावी लागतात.

प्र.3: RTGS पावती का आवश्यक आहे?
उ. कारण अनुदान देण्यासाठी खरी खरेदी झाली आहे हे प्रमाण RTGS पावतीतून मिळते.

प्र.4: सामाईक 7/12 असल्यास काय करावे?
उ. इतर भागधारकांचे संमतीपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.

प्र.5: मदतीसाठी कोणाशी संपर्क साधावा?
उ. तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा महाडीबीटी हेल्पलाइन 022-49150800 वर संपर्क साधावा.

महाडीबीटी शेतकरी योजना (MahaDBT Farmer Scheme Documents) कागदपत्रे योग्य वेळी व व्यवस्थित अपलोड करणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. या प्रक्रियेतील पारदर्शकतेमुळे शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात अनुदान मिळते. त्यामुळे वेळेत अर्ज करा, योग्य कागदपत्रे अपलोड करा आणि शासनाच्या योजनांचा पूर्ण लाभ घ्या.

महाडीबीटी पोर्टल: https://mahadbt.maharashtra.gov.in/

महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप: महाडीबीटी शेतकरी अ‍ॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेल्पलाईन क्रमांक: 022-49150800

शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका: शेतकरी योजना वापरकर्ता पुस्तिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना: ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची (MahaDBT Farmer Scheme Documents) कागदपत्रे ! विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. कृषी यांत्रिकीकरण योजना पूर्वसंमती जाहीर २०२६
  2. सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप” वर – MahaDBT Farmer App
  3. महाडीबीटी शेतकरी योजना: 21 कृषी योजनांसाठी नवीन कार्यपद्धती; जाणून घ्या महत्त्वाचे बदल!
  4. कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य (कृषी यांत्रिकीकरण) योजनेसाठी असा करा महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज!
  5. महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!
  6. ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  7. महासारथी महाआयडी 2026 | नोंदणी, डाउनलोड व संपूर्ण माहिती!
  8. पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती!
  9. शेतीसाठी मिळवा सहज कृषी कर्ज : किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
```html
Join Now
Join Now

One thought on “महाडीबीटी लॉटरी मध्ये निवड व पूर्व संमती मिळाल्यानंतर अपलोड करावयाची कागदपत्रे !”

  • 1Win Login

    धन्यवाद! महाडीबीटी लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिल्याबद्दल खूप उपयुक्त आहे. या प्रक्रियेत अधिक स्पष्टता मिळाल्याने, हा अनुभव सामान्य शेतकऱ्यांसाठी सो easier होईल. पुढील लेखांमध्ये अधिक माहिती समाविष्ट करणे अधिक उपयोगी ठरेल.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *