भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 9124 जागांसाठी मेगाभरती
नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. भारतीय स्टेट बँक लिपिक भरती 2026 (SBI Clerk Bharti 2026) अंतर्गत ज्युनियर असोसिएट (Customer Support & Sales) या पदासाठी तब्बल 9,124 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय स्टेट बँकेने जाहिरात क्रमांक CRPD/CR/2026-27/17 प्रसिद्ध केली असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 11 ऑगस्ट 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत सुरू आहे.
या भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, परीक्षा पद्धत, स्थानिक भाषेची अट आणि पगार याबाबत जाहिरातीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे.
या भरतीतील पगार हा अनेक उमेदवारांसाठी आकर्षणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. जाहिरातीनुसार Clerical Cadre साठी वेतनश्रेणी ₹24,050 ते ₹64,480 अशी आहे. पदवीधर नव्या Junior Associates साठी दोन अतिरिक्त वेतनवाढी लागू असल्याने सुरुवातीचा Basic Pay ₹26,730 आहे.
निवड झाल्यानंतर नव्याने नियुक्त Junior Associates यांचा किमान 6 महिन्यांचा probation period असेल. या काळात बँकेने सांगितलेले e-lessons पूर्ण करणे आवश्यक आहे. कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्यास probation कालावधी वाढवला जाऊ शकतो.
भारतीय स्टेट बँक लिपिक भरती 2026 – SBI Clerk Bharti 2026:
जाहिरात क्र.: CRPD/CR/2026-27/17
एकूण : 9124 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) | 9124 |
| एकूण | 9124 |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : GEN/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2026
मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2026
जाहिरात (SBI Clerk Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for SBI Clerk Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
परीक्षेची तयारी कशी करावी?
परीक्षेची तारीख जवळ येण्याची वाट न पाहता तयारी सुरू करणे उमेदवारांसाठी फायदेशीर ठरेल. पूर्व परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि Reasoning या तीन विषयांवर भर द्यावा. प्रत्येक विभागाला स्वतंत्र वेळ असल्यामुळे फक्त प्रश्न सोडवण्याचा सराव पुरेसा नाही; वेळेचे नियोजनही महत्त्वाचे आहे.
मुख्य परीक्षेसाठी General/Financial Awareness आणि Computer Aptitude यांचाही नियमित अभ्यास करावा. विशेषतः चालू घडामोडी, बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी आणि आर्थिक विषयांचा अभ्यास उपयोगी ठरू शकतो.
चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण असल्यामुळे अंदाजाने उत्तरे देण्याऐवजी अचूकतेवर भर देणे अधिक योग्य ठरेल.
एकूण 9,124 जागांमुळे भारतीय स्टेट बँक लिपिक भरती 2026 (SBI Clerk Bharti 2026) ही पदवीधर उमेदवारांसाठी यंदाच्या महत्त्वाच्या बँकिंग भरतींपैकी एक आहे. विशेषतः महाराष्ट्रासाठी एकूण 1,999 जागा असल्याने महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही संधी लक्षवेधी आहे.
मात्र केवळ जागांची संख्या पाहून अर्ज न करता वयोमर्यादा, पदवीची पात्रता, स्थानिक भाषा, राज्याची निवड आणि इतर अटी तपासणे आवश्यक आहे. अर्जाची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 असल्याने इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
SBI ने स्वतःच्या जाहिरातीत भरतीशी संबंधित पुढील सर्व अपडेट्स अधिकृत करिअर वेबसाइटवरच प्रसिद्ध केले जातील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोशल मीडिया किंवा अनधिकृत वेबसाइटवरील माहितीकडे अंतिम माहिती म्हणून न पाहता SBI च्या अधिकृत पोर्टलवरील सूचना तपासणे महत्त्वाचे आहे.
या लेखात, आम्ही भारतीय स्टेट बँक लिपिक भरती 2026 (SBI Clerk Bharti 2026) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- पंजाब नॅशनल बँकेत 545 जागांसाठी भरती
- भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026
- इंडियन ओव्हरसीज बँकेत 250 जागांसाठी भरती
- कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 134 जागांसाठी भरती
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 | 30,209 रिक्त पदे | Pavitra Portal
- भारतीय रेल्वेत 4098 जागांसाठी भरती
- महाराष्ट्र राज्य तलाठी भरती 2026
- कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती 2026
- IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी मेगाभरती
- हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती 2026
- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2026
- युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 395 जागांसाठी भरती
- DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

