कृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना; सौर कृषी पंपांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु – Kusum Solar Pump Yojana

केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी महाऊर्जा संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना – Kusum Solar Pump Yojana :

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

योजनेची वैशिष्टये :

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेची वैशिष्टये खालील प्रमाणे आहेत.

  1. पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्हयात आस्थापना शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार.
  2. शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP. 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप उपलब्ध होणार.
  3. सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा.
  4. स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय

लाभार्थी निवडीचे ठळक निकष :

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचे लाभार्थी निवडीचे ठळक निकष खालील प्रमाणे आहेत.

  1. शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदीनाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
  2. पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
  3. अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार.
  4. 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DC वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय.

आवश्यक कागदपत्रे :

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.

  1. ७/१२ उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
  2. आधारकार्ड प्रत.
  3. रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.
  4. पासपोर्ट आकाराचा छायाचित्र.
  5. शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंपांची किंमत आणि लाभार्थी अनुदान हिस्सा :

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंपांची किंमत आणि लाभार्थी अनुदान हिस्सा खालीलप्रमाणे आहे.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना अनुदान
प्रधानमंत्री कुसुम सोलर पंपांची किंमत आणि लाभार्थी अनुदान हिस्सा

कुसुम सोलर पंपाची सुधारित किंमत व लाभार्थी हिस्सा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी :

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या ऑनलाईन नोंदणीसाठी खालील संकेतस्थळावर भेट दयावी.

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana-component-b

लाभार्थी लॉगिन :

ज्या लाभार्थ्यांची प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेची ऑनलाईन नोंदणी झाली असेल, त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून कुसुम योजनेची माहिती भरा, कागदपत्रे अपलोड करा, आणि पेमेंट करा.

https://kusum.mahaurja.com/beneficiary

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज माहिती पुस्तिका :

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज माहिती पुस्तिका पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेच्या सविस्तर माहितीसाठी :

दि. 14/9/2021 रोजी दुपारी 02:00 वा. पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. योजनांच्या सविस्तर माहितीसाठी त्वरित संपर्क करा. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा ) अमरावती : 0721 2661610 मुंबई : 022 4968558 औरंगाबाद : 02402653595 नागपूर : 0712 256425 कोल्हापूर : 0231 2680009 नाशिक : 0253 2598685 लातूर : 02382 226680 पुणे : 020 35000454 मुख्यालय पत्ता : औंध रोड, पशुसंवर्धन आयुक्तालया शेजारी, स्पायसर कॉलेज समोर, औंध, पुणे – 411007. दूरध्वनी क्र. 020 35000450 | [email protected]

हेही वाचा – कुसुम सोलर पंप योजना सुरु, महाराष्ट्र सरकारचा नवीन शासन निर्णय जारी – Kusum Solar Pump Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.