EPFO ने पीएफचे पैसे काढण्याची (क्लेम सेटलमेंट) प्रोसेस केली सोपी!
ईपीएफओ EPFO (Employees’ Provident Fund Organisation) ने आता पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया (PF claim settlement process) खूपच सोपी आणि जलद केली आहे. ईपीएफ सदस्यांच्या जीवन सुलभतेसाठी आणि नियोक्त्यांसाठी व्यवसाय सुलभतेबाबत केल्या दोन प्रमुख सुधारणा खालील प्रमाणे आहेत.
पीएफ क्लेम सेटलमेंट प्रोसेस – PF Claim Settlement:
ईपीएफ सदस्यांसाठी जीवन सुलभता आणि नियोक्त्यांसाठी व्यवसाय सुलभता वाढविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) त्यांच्या दाव्याच्या निपटारा (PF claim settlement process) प्रक्रियेत दोन प्रमुख सुलभीकरणे आणली आहेत.
या उपाययोजनांमुळे दाव्याच्या निपटारा (PF claim settlement process) प्रक्रियेत लक्षणीयरीत्या सुलभता येईल तसेच दावे नाकारण्याबाबतीतील तक्रारी कमी होतील.
1.धनादेशाचे पान/ बँक पासबुकची साक्षांकित प्रतिमा अपलोड करण्याची आवश्यकता काढून टाकणे:
पूर्वी PF क्लेम (PF claim settlement) करताना बँक पासबुकची प्रत (बँकेच्या शिक्कासह) किंवा धनादेशाचे रद्द केलेले पान (Cancelled Cheque) हे अपलोड करावे लागत होते. याचा उद्देश म्हणजे खात्याचे तपशील (Account Number, IFSC कोड) तपासणे. आता EPFO ने आता हे दस्तऐवज अपलोड करण्याची गरज काढून टाकली आहे. जर तुमचं बँक अकाउंट UAN मध्ये “Digitally Approved by Bank (via Aadhaar eKYC)” असं दाखवत असेल, तर क्लेम (PF claim settlement) करताना तुम्हाला कसलाही दस्तऐवज अपलोड करावा लागणार नाही.
ईपीएफओने ऑनलाइन दावे (PF claim settlement) दाखल करताना धनादेश किंवा बँक पासबुकची साक्षांकित प्रतिमा अपलोड करण्याची आवश्यकता पूर्णपणे काढून टाकली आहे. सुरुवातीला काही केवायसी-अपडेट केलेल्या सदस्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही आवश्यकता शिथिल करण्यात आली होती. ही आवश्यकता काढून टाकल्याने, ईपीएफओच्या सुमारे 6 कोटी सदस्यांना तात्काळ फायदा होऊ शकेल, ज्यामुळे खराब-गुणवत्तेच्या/वाचता न येणाऱ्या अपलोडमुळे होणारे दावे नाकारण्याचे प्रमाण कमी होईल तसेच संबंधित तक्रारी कमी होतील.
2. युनिव्हर्सल अकाउंट नंबर (युएएन) सह बँक खात्याचे तपशील जोडण्यासाठी नियोक्त्याच्या मंजुरीची आवश्यकता काढून टाकणे:
पूर्वी जर एखाद्या कर्मचाऱ्याला त्यांच्या UAN मध्ये बँक खात्याचे तपशील अपडेट करायचे असतील, तर त्यासाठी: ते खातं नियोक्त्याने (Employer) प्रमाणित करणं गरजेचं होतं. त्यामुळे प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट होत असे. आता EPFO ने आता कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आधार प्रमाणीकरणाद्वारे बँक डिटेल्स अपडेट करण्याची मुभा दिली आहे, म्हणजे: नियोक्त्याची मंजुरी लागत नाही. अपडेट झालेले बँक तपशील आधार OTP द्वारे व्हेरिफाय होतात, त्यामुळे PF क्लेम साठी (PF claim settlement) प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होते.
बँक खात्यांचे तपशील युएएनसह जोडण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने ईपीएफओ ने आता बँक पडताळणीनंतर नियोक्त्याच्या मंजुरीची आवश्यकता काढून टाकली आहे. त्यानुसार, नियोक्त्यांना ‘व्यवसाय सुलभता’ आणि सदस्यांना ‘जीवन सुलभता’ लाभावी, यादृष्टीने सदस्याच्या बँक खात्याच्या सीडिंग प्रक्रियेत बँक खात्याची पडताळणी मंजूर करण्याची नियोक्त्याची भूमिका आता काढून टाकण्यात आली आहे. याचा तात्काळ फायदा 14.95 लाखांहून अधिक सदस्यांना होईल, ज्यांच्या मंजुरी नियोक्त्यांकडे प्रलंबित आहेत.
बँक डिटेल्स अपडेट करण्याची प्रक्रिया:
लॉगिन करा: EPFO Member Portal > “Manage” > “KYC” या पर्यायावर क्लिक करा > बँक सेक्शनमध्ये IFSC कोड, अकाउंट नंबर टाका. “Save” क्लिक करा > आधार OTP द्वारे तपशील व्हेरिफाय करा.
व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्यानंतर, बँक माहिती अपडेट होईल आणि ती “Digitally Approved by Member” म्हणून दिसेल – आता नियोक्त्याच्या अडचणीशिवाय!
या लेखात, आम्ही ईपीएफओने दावा निपटारा प्रक्रिया (PF claim settlement process) केली सुलभ; ईपीएफ सदस्यांच्या जीवन सुलभतेसाठी आणि नियोक्त्यांसाठी व्यवसाय सुलभतेबाबत केल्या दोन प्रमुख सुधारणा विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- ईपीएफओ पोर्टल वरून यूएएन (UAN) नंबर कसे सक्रिय करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
- भविष्य निर्वाह निधी (पीएफ) अकाउंटचे केवायसी अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- आपले ईपीएफ पासबुक (EPF Passbook) कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या सविस्तर माहिती
- भविष्य निर्वाह निधी ऑनलाईन कसा काढावा? जाणून घ्या सविस्तर ऑनलाईन प्रोसेस (PF-Provident Fund)
- ऍडव्हान्स पीएफ रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन क्लेम अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- ईपीएफ मध्ये ई-नामांकन कसे जोडावे? जाणून घ्या सविस्तर माहिती – Add E-Nomination in EPF
- भविष्य निर्वाह निधी अकाऊंट संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
- भविष्य निर्वाह निधी – पीएफ देत आहे ७ लाख रुपयांचे विमा संरक्षण, जाणून घ्या सविस्तर माहिती !
- PF Loyalty Bonus : EPFO तर्फे खातेधारकांना मिळणार ५० हजार रुपयांचा बोनस !
- कष्टकऱ्यांच्या रिटायरमेंट साठी; अटल पेन्शन योजना
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

