वृत्त विशेषमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी कामे

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन वाढ लागू, शासन निर्णय जारी !

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ६१ प्रमाणे ग्रामपंचायतीला त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी नेमण्याचे व त्यांचे वेतन ठरविण्याचे अधिकार आहेत. सध्या या विभागाच्या वाचा येथील क्र.२ च्या दि. ३०.१०.२०१३ च्या पत्रान्वये उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या क्र किवेअ -२०१३/ ५२/प्र.क्र. २७/कामगार -७ दि. ७ ऑगस्ट २०१३ च्या अधिसूचनेतील तरतुदी लागू करून त्याद्वारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन दर लागू करण्यात आले आहेत.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून किमान वेतन अधिनियम, १९४८ च्या तरतुदींना अनुसरून महाराष्ट्र राज्यातील “स्थानिक स्वराज्य संस्थांमधील (ग्रामपंचायत) कामधंदा” या रोजगारात असलेल्या कामगारांना देय असलेले किमान वेतन दर, शासन, अधिसूचने द्वारे पुनर्निधारित केले जातात. त्यानुषंगाने १० ऑगस्ट २०२० रोजी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने सुधारित अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दि. १० ऑगस्ट, २०२० च्या अधिसूचनेला अनुसरून सुधारित दर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन वाढ लागू, शासन निर्णय :

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दि.१०.०८.२०२० रोजीच्या अधिसूचनेला अनुसरून कामगारांची वर्गवारी व परिमंडळ निहाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मूळ किमान वेतन दर खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे दि.०१.०४.२०२२ पासून पुनर्निधारित करण्यात येत आहेत.

>
अ.क्र.कर्मचारी वर्गवारीमूळ किमान वेतन दर (दरमहा रुपये)
परिमंडळ – १परिमंडळ – २परिमंडळ – ३
कुशल१४,१२५१३,७६०१२,६६५
अर्धकुशल१३,४२०१३,०५५११,९ ६०
अकुशल१३,०८५१२,७१५११,६२५
  1. परिमंडळ – १ : १०,००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे क्षेत्र.
  2. परिमंडळ – २ : ५,००० ते १०,००० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे क्षेत्र.
  3. परिमंडळ – ३ : ५,००० पर्यन्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे क्षेत्र.

विभागाचे शासन निर्णय दि. ४ मार्च, २०१४, दि. १७ सप्टेंबर, २०१८ अन्वये निर्गमित केलेल्या अटींच्या अधीन राहून कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासाठी अनुज्ञेय शासन हिस्सा देय राहील. सदरचा खर्च मागणी क्रमांक एल -२, २०५३- जिल्हा प्रशासन (०७) (०१) ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचे मानधन व इतर भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन यासाठी अनुदान – ३१- सहायक अनुदान (२०५३ १०४२) (वेतनेतर) या लेखाशीर्षाखाली उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या तरतूदीमधून करण्यात येईल.

सदर शासन निर्णयातील तरतूदी दि. १ एप्रिल, २०२२ पासून अंमलात येतील. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौ.सं क्रमांक ४०३/२२, दि. १६/६/२०२२ अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

ग्राम विकास विभाग शासन निर्णय: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन दर लागू करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य; कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती आणि पेमेंट स्टेटस ऑनलाईन कसे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.