वृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

UPSC Exams Time Table : यूपीएससी २०२५ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !

नागरी सेवा परीक्षा ही भारतातील एक देशव्यापी स्पर्धात्मक परीक्षा आहे, जी भारत सरकारच्या उच्च नागरी सेवांमध्ये भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाते. या सेवांमध्ये भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा आणि भारतीय पोलिस सेवा यांचा समावेश आहे. त्याला UPSC परीक्षा म्हणतात.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) वर्ष २०२५ साठीच्या विविध भरती परीक्षांचे वेळापत्रक (UPSC Exams Time Table) जाहीर केले आहे. यूपीएससीने सीएसई, एनडीए, एनए, सीडीएस, ईएसई, आयएफसी, आयईएस, आयएसएस, जिओ सायंटिस्ट आणि इतर परीक्षांसाठी नोंदणी आणि परीक्षेची तारीख (UPSC exam schedule) जाहीर केली आहे.

UPSC Exams Time Table : यूपीएससी २०२५ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर !

यूपीएससीच्या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षा (ईएसई प्रिलिम्स) २०२५ साठी नोंदणी १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत होईल. यानंतर ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ही परीक्षा होणार आहे. तसेच संयुक्त भू- शास्रज्ञ (प्राथमिक) परीक्षादेखील ९ फेब्रुवारी २०२५ लाच होणार आहे.

नागरी सेवा परीक्षा २०२५ आणि भारतीय वनसेवा परीक्षा २०२५ म्हणजेच युपीएससी पूर्व परीक्षेसाठी (सीएसई) नोंदणी प्रक्रिया २२ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. ही परीक्षा २५ मे रोजी पार पडेल. ही प्रिलिम्समध्ये यशस्वी होत असलेल्या उमेदवारांसाठी नागरी सेवा मुख्य परीक्षा २२ ऑगस्ट २०२५ पासून आयोजित केली जाईल, ही परीक्षा ५ दिवस चालणार आहे.

यूपीएससी वेळापत्रक २०२५ – UPSC Exams Time Table:

यूपीएससी २०२५ च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
यूपीएससी २०२५ च्या परीक्षांचे वेळापत्रक

UPSC चे अधिकृत संकेतस्थळ :

यूपीएससीच्या परीक्षां बाबत अधिक माहितीसाठी व  UPSC Exams Time Table बाबत उमेदवारांनी युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर पहावे असे आवाहन करण्यात आले आहे. UPSC चे अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 109 जागांसाठी भरती – UPSC Recruitment 2024

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.