कृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

वृक्ष लागवड अनुदान योजना २०२१-२२ – अनुदानावर सर्व प्रकारची रोप/कलम

दि. १५ जून ते ३० सप्टेंबर, हा काळ वन महोत्सवाचा काळ म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. या कालावधीत वृक्षलागवडीसाठी लोकांना उद्युक्त करण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा करण्यात येत असतो. वृक्ष लागवड व संगोपन हा लोकांचा कार्यक्रम व्हावा, त्याचबरोबर जनतेला वनीकरणाचे महत्व पटवून देता यावे. या दृष्टीने वन महोत्सवाच्या कालावधीत सुधारीत केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे रोपांचा पुरवठा केला जातो. त्यानुसार दिनांक १५ जून २०२० च्या शासन निर्णयान्वये सन २०२०-२१ साठी सदर योजना पुढे चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती. आता सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात सदर योजना चालू ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

वृक्ष लागवड अनुदान योजना:

१. सन २०२०-२१ या वर्षातील अनुभव तसेच जनतेचा प्रतिसाद लक्षात घेऊन, ही योजना सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात दिनांक १५ जून २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या वन महोत्सवाच्या कालावधीत पुढे चालू ठेवण्यास व ती प्रभावीपणे राबविण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

२. राज्यात सन २०१७ पासून “५० कोटी वृक्ष लागवड” हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. सदर कार्यक्रमांतर्गत सन २०१९ -२० या वर्षासाठी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करणेत आले होते. या वृक्षलागवडीचा कार्यक्रम अखंडपणे पुढे ही चालू राहावा व या कार्यक्रमांतर्गत खाजगी मालकीचे पडीक क्षेत्र आणि शेत बांधावर, रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामूहीक पडीक क्षेत्र, व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेता यावा. तसेच सर्व सामान्य शेतकरी व वृक्षप्रेमी यांना अल्पदरात रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी वनमहोत्सवाच्या कालावधीत सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येईल. वन महोत्सवाच्या कालावधीत आणि सर्वसाधारण कालावधीत रोपांचा पुरवठा, सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात खालील शासन निर्णयातील तक्त्यात नमूद केलेल्या सवलतीच्या दराप्रमाणे करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

३. राज्यात सन २०२१ च्या पावसाळयात १५ जून ते ३० सप्टेबर या कालावधीत वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा व आस्थापना तसेच निमशासकीय यंत्रणा व लोकांना मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेता यावा. यासाठी वरीलप्रमाणे सवलतीचे दरात रोपांचा पुरवठा करण्यात येत आहे.

४. ज्या शासकीय यंत्रणांना वृक्ष लागवड करावयाची आहे. अशा यंत्रणांना रोप निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद नसल्यास, अशा यंत्रणांना या वनमहोत्सव कालावधीत रोपांचा मोफत पुरवठा केला जाईल. यासाठी त्यांनी लागणा-या रोपांची आगाऊ मागणी नजीकचे उपवनसंरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांचेकडे खालील शासन निर्णयातील मागणी पत्राद्वारे करावी.

५. उपवनसंरक्षक/विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग हे जिल्ह्यात उपलब्ध प्रादेशिक/सामाजिक वनीकरण रोपवाटीकेमधून यंत्रणानिहाय/मागणीदार यांना रोप पुरवठ्याचे आदेश निर्गमित करतील व इतर यंत्रणेशी योग्य समन्वय साधतील.

६. संदर्भ क्र. १ मधील दि. ०४/०६/२०१६ रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र. १० मध्ये नमूद केल्याप्रमाणे वनमहोत्सव काळात वन व सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकांमधून सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा केला जातो. या योजनेचा फायदा सर्व संबंधित विभागांनी घ्यावा. जिथे अडचण असेल तिथे वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत रोपे देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र त्याबाबतची आवश्यक नोंद आणि लेखा, रोपे उपलब्ध करून घेणारा विभाग आणि रोपे उपलब्ध करून देणारा विभाग अशा दोन्ही विभागामार्फत ठेवण्यात यावे. याबाबतची माहिती व अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य यांचेकडे पाठवावी.

७. वनमहोत्सवाच्या कालावधीत (१५ जून ते ३० सप्टेंबर) वनमहोत्सवाचे प्रयोजन व महत्व याबाबत प्रभावीपणे सर्वदूर पोहोचणा-या माध्यमातून योग्य प्रसिद्धी देण्यात यावी. या बाबतचा खर्च “मागणी क्र.सी -७, मुख्य लेखाशिर्ष -२४०६ वनीकरण व वन्यजीवन – १०१ – वन संरक्षण व विकास व पुनर्निमीत- (११) (३४) (२४०६ ८५५१) (योजनेंत्तर्गत) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व सन २०२१-२२ वर्षाकरिता मंजूर केलेल्या निधीतून मागविण्यात यावा.”

८. उपवनसंरक्षक (प्रादेशिक), विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण यांनी विक्रीतून एकूण जमा झालेला महसूल याबाबत चालू आर्थिक वर्षाचा तपशिल सोबतच्या विहीत नमून्यात प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांना सादर करणार.

शासन निर्णय: वन महोत्सव २०२१-२२ वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लीक करा.

हेही वाचा – मनरेगा अंतर्गत बिहार पॅटर्न वृक्ष लागवड योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.