कृषी सेवा केंद्र परवाना (बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना) ऑनलाईन कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती!
आपण या लेखात कृषी सेवा केंद्र परवाना (Krushi Seva Kendra Parvana – बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना) ऑनलाईन कसा काढायचा? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
शेतीची मशागत करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे कृषी इनपुट म्हणजे बी बियाणे, खते, कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी. हे सर्व मिळण्याचे ठिकाण म्हणजे कृषी सेवा केंद्र होय. कृषी विभागामार्फत बियाणे,खते,कीटकनाशके विक्री करिता परवाने प्रदान करण्यात येतात. कृषी सेवा केंद्रामध्ये शेती संबंधित बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाना (Krushi Seva Kendra Parvana) बाबींविषयी विषयी तुम्ही विचार केला असेल. परंतु यासाठी आपल्याला अधिकृत परवाने काढावे लागतात. ज्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र सुरु करायचे आहे, त्या ठिकाणी गावाची लोकसंख्या किती आहे? कृषी सेवा केंद्र चालेल काय? मालाची विक्री किती होऊ शकेल? आदी बाबींचा अंदाज घ्या.
कृषी सेवा केंद्र परवाना काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- शैक्षणिक पात्रता
- पॅन कार्ड/ आधार कार्ड/ मतदान कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- राशन कार्ड झेरॉक्स
- लाईट बिल
- शाळा सोडल्याचा दाखला
- ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायत
- पत्रक ४
- ऑनलाईन चलन फॉर्म
- जागेचा गाव नमुना आठ
- उगम प्रमाणपत्र / प्रिंसिपल सर्टिफिकेट
- जागा भाड्याची असल्यास शंभर रुपयांच्या बॉण्ड वर ऍग्रिमेंट
कृषी सेवा केंद्र परवाना काढण्यासाठी लागणारी फी:
1) रासायनिक कीटकनाशके = 7500 रू.
2) बियाणे परवाना = 1000 रू.
3) रासायनिक खते = 450 रू.
कृषी सेवा केंद्र असण्याचे ठिकाण:
1) बस स्टॅन्ड मार्केटच्या जवळ.
2) गावातील लोकसंख्या कमीत कमी पाच हजार ते सहा हजार असायला पाहिजे.
3) चार गावांना जोडणारा जो रस्ता असेल तर चालेल.
4) शेतकरी बंधूसाठी जवळ असलं पाहिजे.
मार्जिन/नफा:
ब्रँडेड कीटकनाशके = 5.6 %
लोकल कीटकनाशके = 15 = 25 %
बी बियाणे = 20/30 %
रासायनिक खते = 2/5 %
अर्जदार पात्रता:
कीटकनाशके तथा खते परवान्या (Krushi Seva Kendra Parvana) करीता अर्जदार यांनी कृषी पदविका 2 वर्षे ( पिक संरक्षण, पिक संवर्धन), बी.एस.सी. (कृषी), बि. टेक., बी.एस.सी.(रसायन शास्त्र या विषया सह) इत्यादी पैकी एक शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी.
कृषी सेवा केंद्र परवाना ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया – Krushi Seva Kendra Parvana online:
कृषी सेवा केंद्र परवाना (Krushi Seva Kendra Parvana) ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ ही वेबसाईट ओपन करायची आहे.
त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी (युजर प्रोफाईल) कशी करायची? हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.
आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.
त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “कृषी” हा पर्याय निवडायचा आहे.
आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.
त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला उपविभाग पर्यायामध्ये “कृषी परवाना सेवा” हा पर्याय निवडायचा आहे.
“कृषी परवाना सेवा” हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला विविध परवाने पर्याय तुम्हाला दिसतील.
- कॉटन डीलर लायसन्स रजिस्ट्रेशन
- कीटकनाशके विक्रेता परवाना नोंदणी
- बियाणे विक्रेता परवाना नोंदणी
- खते विक्रेता परवाना नोंदणी
- खते उत्पादक परवाना नोंदणी
- कीटकनाशके निर्माता परवाना नोंदणी
- खते नमुने तपासणी
- किटकनाशके नमुने तपासणी
- ठिबक संच उत्पादक नोंदणी
- खत निर्मिती/ विक्री प्रमाणपत्र देणे (राज्यस्तर)
- बियाणे विक्री परवाना (राज्यस्तर)
- किटकनाशके उत्पादन /विक्री परवाना (राज्यस्तर)
- मृद व पाणी नमुने तपासणी
- बियाणे नमुने तपासणी
वरील पैकी आपल्याला ज्याचा परवाना पाहिजे असेल त्या पर्यायावरती क्लिक करून “पुढे जा” या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
यामध्ये आपण “खते विक्रेता परवाना नोंदणी – Krushi Seva Kendra Parvana” परवाना कसा काढायचा हे पाहूया. त्यासाठी आपण “खते विक्रेता परवाना नोंदणी” या पर्यायावरती क्लिक करून “पुढे जा” या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
आता एक नवीन महा परवाना (Krushi Seva Kendra Parvana) पोर्टल ओपन होईल, त्यामध्ये डाव्या बाजूला विविध पर्याय दिसतील आपल्याला खते विक्रेता परवाना काढण्यासाठी “Fertilizer Dealer License” या पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये दोन पर्याय आपल्याला पाहायला मिळतील १) New License (State Level) आणि २) New License ( District Level) आपण इथे राज्यस्तरीय (Krushi Seva Kendra Parvana) परवाना काढण्यासाठी New License (State Level) या पर्याया वर क्लिक करणार आहोत. तुम्हाला ज्या स्तरावरचा परवाना (Krushi Seva Kendra Parvana) काढायचा आहे तो पर्याय निवडा.
त्यानंतर अर्जदाराची माहिती हे पेज ओपन होईल, त्या पेजमध्ये तुम्हाला अर्जामध्ये दाखविल्याप्रमाणे माहिती भरायची आहे.
यामध्ये आपले राज्य, जिल्हा, License Holder मध्ये New User, License Sub Type मध्ये Wholesale(as sole) license किंवा Retail Dealer license, License Category मध्ये Wholesale(as sole) license/ Retail Dealer license या पैकी पर्याय निवडायचाआहे.
त्यानंतर अर्जदाराची माहिती यामध्ये अर्जदाराचे नाव, आडनाव, जन्मतारीख, वय, शैक्षणिक पात्रता, पदनाम, आधार कार्ड क्र,पॅन क्र. इ. माहिती भरायची आहे.
अर्जदाराचा निवासी पत्ता यामध्ये इमारतीचे नाव, रस्ता, लँडमार्क, परिसर/प्रभाग, राज्य, जिल्हा, तालुका, गाव, पिन कोड हि माहिती भरायची आहे.
अर्जदाराचे संपर्क तपशील मध्ये लँडलाइन क्र.,मोबाईल नं.,व ई-मेल आयडी हि माहिती भरायची आहे. तसेच पुढे खालील तपशील भरून अर्ज सबमिट करायचे आहे.
- Firm Information
- Responsible Person Details
- Sales Address Details
- Storage Address Details
- Fertilizer Type and Grade
- GRAS Payment
कृषी सेवा केंद्र परवाना (Krushi Seva Kendra Parvana) संदर्भात अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशी करा.
खालील लेख देखील वाचा!
- घरबसल्या शॉप एक्ट लायसन्स ऑनलाईन कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस (Shop Act Licenses)
- कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना – Agri Clinics And Agri-Business Centres Scheme
- कृषी पर्यटन केंद्र चालू करण्यासाठी अटी, केंद्रास मिळणारे लाभ पहा आणि नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करा !
- घरबसल्या घ्या विविध सरकारी सेवांचा ऑनलाईन लाभ!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!