ओबीसी महामंडळ कर्ज योजना २०२६: पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया!
नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गात येत असाल आणि स्वतःचा एखादा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करण्याचा किंवा चालत असलेला व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बऱ्याचदा आर्थिक अडचणींमुळे अनेकांचे व्यवसायाचे स्वप्न अपूर्ण राहते. अशा तरुणांसाठी आणि महिलांसाठी महाराष्ट्र शासनाने ओबीसी महामंडळ कर्ज योजना (OBC Mahapandal Karj Yojana) सुरू केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी कमी व्याजदराने कर्ज आणि व्याज परतावा (Interest Subsidy) दिला जातो. आजच्या या लेखामध्ये आपण या महामंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध ओबीसी महामंडळ (OBC Mahapandal Karj Yojana) कर्ज योजना, त्यांची पात्रता, लागणारी कागदपत्रे आणि ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज कसा करावा, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
ओबीसी महामंडळ कर्ज योजना २०२६ – OBC Mahapandal Karj Yojana:
महाराष्ट्र राज्यात ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या समाजातील बेरोजगार तरुण-तरुणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी सन १९९९ मध्ये ‘महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची’ स्थापना करण्यात आली. या महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना आधुनिक आणि पारंपारिक व्यवसायांसाठी सुलभ व कमी व्याजदराने आर्थिक मदत पुरवणे हा आहे.
ओबीसी महामंडळ कर्ज योजनांचे प्रमुख प्रकार
या महामंडळाद्वारे गरजू आणि पात्र व्यक्तींसाठी प्रामुख्याने खालीलप्रमाणे वेगवेगळ्या ओबीसी महामंडळ कर्ज (OBC Mahapandal Karj Yojana) योजना राबवल्या जातात:
१. २०% बीज भांडवल योजना (Margin Money Scheme)
ही योजना राष्ट्रीयकृत बँका, जिल्हा अग्रणी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून राबवली जाते.
- आर्थिक रचना: या योजनेमध्ये महामंडळाचा सहभाग २०%, लाभार्थीचा सहभाग ५% आणि बँकांचा सहभाग ७५% असतो.
- प्रकल्प मर्यादा: या योजनेमध्ये जास्तीत जास्त प्रकल्प मर्यादा ५.०० लाख रुपयांपर्यंत असते.
- व्याजाचा दर व कालावधी: महामंडळाच्या २०% सहभागावर व्याजाचा दर फक्त ६% वार्षिक असून परतफेडीचा कालावधी ५ वर्षे आहे.
- वयोमर्यादा: अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षे दरम्यान असावे.
- वार्षिक उत्पन्न मर्यादा: शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न १.०० लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
२. १.०० लाखापर्यंतची थेट कर्ज योजना (Direct Loan Scheme)
अल्प भांडवलाची गरज असलेल्या छोट्या व्यावसायिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.
- लाभार्थी सहभाग: यात लाभार्थीचा स्वतःचा सहभाग निरंक (०%) असतो.
- वयोमर्यादा: अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे असावे.
- सिबिल स्कोर: अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान ५०० इतका असणे आवश्यक आहे.
- उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.०० लाखांपर्यंत असावे.
- विशेष सवलत: नियमित ४८ समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल (रु. २,०८५/- प्रमाणे) परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना कोणतेही व्याज द्यावे लागत नाही! जर हप्ते थकीत राहिले, तर थकीत रकमेवर दरसाल ४% व्याज आकारले जाते.
- हप्ते वाटप: कर्ज रक्कमेचा पहिला हप्ता ७५,०००/- आणि दुसरा हप्ता (२५%) उद्योग सुरू झाल्यानंतर ३ महिन्यांच्या छाननीनंतर दिला जातो.
३. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (१०.०० लाखांपर्यंत)
मोठ्या उद्योगांसाठी किंवा व्यवसाय विस्तारासाठी बँकांमार्फत मिळणाऱ्या कर्जावर ही योजना लागू होते.
- वेबपोर्टल नोंदणी: या योजनेसाठी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर (www.msobcfdc.org) नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- कर्ज मर्यादा व परतावा: बँकेमार्फत १०.०० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. नियमितपणे हप्ते भरल्यास, बँकेच्या प्रमाणिकरणानुसार व्याजाची रक्कम (१२% च्या मर्यादेत) थेट लाभार्थीच्या आधार-लिंक बँक खात्यात अनुदान स्वरूपात जमा केली जाते.
- उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८.०० लाख रुपयांपर्यंत (नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्राच्या आधारे) असावे.
- वयोमर्यादा: १८ ते ५० वर्षे.
४. गट कर्ज व्याज परतावा योजना (१० लाख ते ५० लाखांपर्यंत)
शासनमान्य बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था किंवा कंपन्यांसाठी ही सामूहिक उद्योग उभारणीची योजना आहे.
- व्याज परतावा: गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास जास्तीत जास्त १२% व्याजदराच्या किंवा १५.०० लाख (किंवा पात्रतेनुसार ५० लाखांपर्यंतच्या उद्योगांसाठी) मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम बँक प्रमाणिकरणानुसार थेट बँक खात्यात जमा केली जाते.
- पात्रता: गटातील सदस्यांचे वय १८ ते ४५ वर्षे असावे आणि सर्व सदस्यांचे वार्षिक उत्पन्न ८.०० लाखांच्या आत असावे. तसेच सर्व सदस्यांचा सिबिल स्कोर किमान ५०० असावा.
अर्जदार लाभार्थीसाठी सामान्य अर्हता व अटी
ओबीसी महामंडळ कर्ज योजना (OBC Mahapandal Karj Yojana) अंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील पात्रता असणे आवश्यक आहे:
१. अर्जदार हा इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गातील असावा आणि महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा.
२. अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने यापूर्वी या महामंडळाच्या किंवा इतर कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
३. अर्जदार कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार (Defaultr) नसावा.
४. ज्या व्यवसायासाठी अर्ज केला आहे, त्या व्यवसायाचे थोडेफार ज्ञान किंवा अनुभव अर्जदाराकडे असणे गरजेचे आहे.
५. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि महामंडळाच्या पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
अर्जासोबत जोडावयाच्या आवश्यक कागदपत्रांची यादी
प्रस्ताव सादर करताना किंवा पोर्टलवर अपलोड करताना खालील कागदपत्रे लागतात:
- जातीचे प्रमाणपत्र व सक्षम अधिकाऱ्याने दिलेले प्रगत गटात (Non-Creamy Layer) मोडत नसल्याचे प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार / नायब तहसीलदार यांनी दिलेला).
- ओळखीचा व पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, शिधापत्रिका (Ration Card), पासपोर्ट साईज फोटो.
- वयाचा पुरावा: जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
- व्यवसायाचा पुरावा: व्यवसाय स्थळाची भाडेपावती, करारनामा किंवा ७/१२ चा उतारा.
- इतर कागदपत्रे: व्यवसाय प्रकल्प अहवाल (Project Report), कच्च्या मालाचे व यंत्रसामुग्रीचे दरपत्रक, तांत्रिक व्यवसायासाठी लागणारे लायसन्स/परवाने, आणि ८ वर्षे सेवा शिल्लक असलेल्या दोन जामिनदारांची हमीपत्रे किंवा शेतीचे गहाणखत.
कर्ज अर्ज करण्याची आणि मंजुरीची प्रक्रिया
१. अर्ज मिळवणे व भरणे: २०% बीज भांडवल आणि १.०० लाखांपर्यंतच्या थेट कर्जाचे अर्ज जिल्हा कार्यालयातून नाममात्र शुल्कात (उदा. १०/- रुपये) मिळतात. तर वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनांचे अर्ज www.msobcfdc.org किंवा https://msobcfdc.in/ या अधिकृत वेबपोर्टलवर ऑनलाइन भरावे लागतात.
२. जिल्हा समितीची छाननी: अर्ज केल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ‘जिल्हा लाभार्थी निवड समिती’ अर्जाची व व्यवसाय स्थळाची पाहणी करून छाननी करते.
३. मुख्यालय स्तरावरून मंजुरी: सर्व कागदपत्रे व त्रुटी तपासून मुख्यालय कर्ज मंजुरी समिती प्रस्तावास अंतिम मंजुरी देते व थेट लाभार्थ्यास किंवा बँकेला पत्र पाठवते.
४. वैधानिक कागदपत्रे व निधी वाटप: मंजुरीनंतर आवश्यक स्टॅम्प पेपरवरील करारनामे (बँक किंवा महामंडळाच्या नियमानुसार) पूर्ण केल्यानंतर निधी थेट लाभार्थीच्या किंवा बँकेच्या खात्यात जमा केला जातो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्र१. ओबीसी महामंडळ कर्ज योजनांसाठी अर्ज कुठे करावा?
उत्तर: १० लाखांपर्यंतच्या व्याज परतावा योजनांसाठी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर (www.msobcfdc.org / https://msobcfdc.in/) ऑनलाइन अर्ज करावा लागतो, तर इतर योजनांसाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधावा.
प्र२. या योजनेसाठी सिबिल स्कोर किती असावा लागतो?
उत्तर: थेट कर्ज योजना आणि व्याज परतावा योजनेसाठी अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान ५०० किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
प्र३. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा किती आहे?
उत्तर: बीज भांडवल आणि थेट कर्ज योजनेसाठी उत्पन्न मर्यादा १.०० लाख रुपये आहे, तर वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी उत्पन्न मर्यादा ८.०० लाख रुपयांपर्यंत आहे.
प्र४. या योजनेमध्ये महिलांना प्राधान्य दिले जाते का?
उत्तर: होय, शासनाच्या नियमानुसार महिला उद्योजिका व कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना विशेष प्राधान्य दिले जाते.
या लेखात, आम्ही ओबीसी महामंडळ कर्ज योजना २०२६: पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया! (OBC Mahapandal Karj Yojana) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा !
- शेतीसाठी मिळवा सहज कृषी कर्ज : किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा ऑनलाईन अर्ज !
- पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? संपूर्ण माहिती!
- क्रेडिट-लिंक सरकारी योजनांसाठी जन समर्थ पोर्टलवर असा करा ऑनलाईन अर्ज !
- प्रधानमंत्री मुद्रा योजना – Pradhan Mantri MUDRA Yojana (PMMY)
- बँक खाते आधार नंबरला (Bank Aadhaar Seeding) ऑनलाईन/ऑफलाईन लिंक करण्याची सविस्तर प्रोसेस !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

