प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर !
भारतातील अनेक कुटुंबांना अजूनही स्वतःचं पक्कं घर नाही. शहरांमध्ये भाड्याने राहणं महाग होतं, तर स्वतःचं घर विकत घेणं आणखी कठीण. या समस्येवर तोडगा म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY Urban 2.0) ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेअंतर्गत शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), निम्न उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गट (MIG) यांना स्वस्त दरात घर बांधण्यासाठी, विकत घेण्यासाठी किंवा कर्जावरील व्याजावर सबसिडी मिळवण्यासाठी मदत दिली जाते.
प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 – (PMAY Urban 2.0):
2024 मध्ये सरकारने “प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY Urban 2.0)” पुन्हा सुरू केली. यामध्ये ‘Housing for All’ हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला आहे. पुढील ५ वर्षांत १ कोटी शहरी कुटुंबांना पक्कं घर मिळवून देणं हा या योजनेचा हेतू आहे.
योजनेची ४ प्रमुख घटक:
Beneficiary Led Construction (BLC) – स्वतःच्या जमिनीवर पक्कं घर बांधण्यासाठी ₹2.5 लाख पर्यंत मदत.
Affordable Housing in Partnership (AHP) – सरकारी/खाजगी भागीदारीत बांधलेल्या घरांची खरेदी करताना सबसिडी.
Affordable Rental Housing (ARH) – ज्यांना घर विकत घ्यायचं नाही पण भाड्याने स्वस्तात घर हवं आहे त्यांच्यासाठी योजना.
Interest Subsidy Scheme (ISS) – गृहकर्जावरील व्याजदरावर ६-९ लाख उत्पन्न गटासाठी सबसिडी.
पात्रता:
अर्जदार आणि कुटुंबाकडे देशभरात कुठेही पक्कं घर नसावं
कुटुंब म्हणजे पती-पत्नी व अविवाहित मुले/मुली.
उत्पन्न गटानुसार विभागणी:
EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपर्यंत.
LIG (निम्न उत्पन्न गट): ₹3 लाख – ₹6 लाख.
MIG (मध्यम उत्पन्न गट): ₹6 लाख – ₹9 लाख
- अर्जदाराचा आधार क्रमांक व बँक खाते असणे बंधनकारक.
महिलांच्या नावावर किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावावर घर नोंदणीला प्राधान्य.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड (अर्जदार व कुटुंबातील सदस्य).
सक्रिय बँक खाते तपशील (IFSC, खाते क्रमांक).
उत्पन्नाचा पुरावा (PDF स्वरूपात).
जमीन कागदपत्रे (जर BLC घटकाखाली अर्ज करत असाल तर).
ऑनलाईन अर्ज कसा करावा? Apply for PMAY Urban 2.0:
प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY Urban 2.0) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईटवर जा.
पोर्टल ओपन केल्यानंतर Apply for PMAY-U 2.0 वर क्लिक करा.

आता PMAYMIS पोर्टल ओपन होईल; तुम्ही थेट खालील लिंक वर देखील जाऊन Apply for PMAY-U 2.0 वर क्लिक करू शकता.
https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx

आता सूचना वाचून Click to Proceed वर क्लिक करा व आवश्यक कागदपत्रे पाहून Proceed वर क्लिक करा.
पुढे “Pre-requisite Parameters/Eligibility Check” मध्ये पात्रता तापसण्यासाठी आवश्यक माहिती भरा.
आता अर्जदाराचा आधार क्रमांक, नाव (आधारवर जसं आहे तसंच). टाका आणि “Generate OTP” वर क्लिक करून OTP टाकून सबमिट करा.
पुढे वैयक्तिक माहिती, फँमिली मेम्बर माहिती, घर, पत्ता व बँक तपशीलसह अर्ज भरा. सबमिट केल्यानंतर अर्ज क्रमांक (Application ID) मिळेल.
योजनेचे फायदे:
₹2.5 लाखापर्यंत थेट आर्थिक मदत.
गृहकर्जावर व्याजदर कमी – EMI कमी होतो.
भाड्याने घराची सोय – स्थलांतरित कामगार, विद्यार्थ्यांना फायदा.
स्त्रियांना प्राधान्य – घराच्या नोंदणीत महिलांना पहिले हक्क.
पारदर्शक ऑनलाईन प्रक्रिया – अर्ज, पडताळणी आणि सबसिडी थेट बँक खात्यात.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ-PMAY Urban 2.0)
1. प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY Urban 2.0) ऑनलाईन अर्ज कोण करू शकतो?
👉 शहरात राहणारा, ज्याच्याकडे स्वतःचं पक्कं घर नाही आणि उत्पन्न मर्यादेत बसतो.
2. अर्ज करताना आधार कार्ड आवश्यक आहे का?
👉 होय, आधार क्रमांक व बँक खाते जोडलेलं असणं आवश्यक आहे.
3. या योजनेतून किती आर्थिक मदत मिळते?
👉 जास्तीत जास्त ₹2.5 लाख थेट मदत किंवा गृहकर्जावरील व्याजावर सबसिडी.
4. अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे कसं तपासायचं?
👉 अधिकृत वेबसाईटवर “Track Your Assessment Status” पर्याय वापरून Application ID टाका.
5. भाड्याने राहणाऱ्यांना ह्या योजनेचा फायदा होतो का?
👉 होय, Affordable Rental Housing घटकातून स्वस्तात भाड्याचं घर उपलब्ध होऊ शकतं.
प्रधानमंत्री आवास योजना शहरी (PMAY Urban 2.0) ऑनलाईन अर्ज हा शहरातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी घरकुलाचं स्वप्न पूर्ण करणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. सोपी ऑनलाईन प्रक्रिया, थेट आर्थिक मदत, कमी व्याजदर आणि महिलांना प्राधान्य या वैशिष्ट्यांमुळे ही योजना लाखो लोकांना दिलासा देणारी ठरते. जर तुम्ही पात्र असाल तर नक्कीच ऑनलाईन अर्ज करून फायदा घ्या.
पुढील लेख देखील वाचा!
- प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना) घरकुल अनुदानाची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची? जाणून घ्या सविस्तर – PMAY Credit Linked Subsidy Scheme (CLSS Tracker)
- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण); लाभार्थ्यांची घरकुल यादी, हप्त्याचा तपशील व FTO ट्रॅकिंग ई. ऑनलाईन चेक करा !
- ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची घरकुल यादी ऑनलाईन पोर्टलवर कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर !
- अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी १ लाख रूपये अर्थसहाय्य !
- प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० (PMAY Urban 2.0)!
- ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची घरकुल यादी ऑनलाईन पोर्टलवर कशी पाहायची? जाणून घ्या सविस्तर !
- प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण); लाभार्थ्यांची घरकुल यादी, हप्त्याचा तपशील व FTO ट्रॅकिंग ई. ऑनलाईन चेक करा !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!