कृषी योजनाआपले सरकार - महा-ऑनलाईनसरकारी योजना

PM-Kisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा!

आज देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत दरवर्षी ₹6000 थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. पण अनेक शेतकरी एकच प्रश्न विचारतात – “माझे नाव पीएम किसान लाभार्थी यादी (PMKisan Labharthi Yadi) मध्ये आहे का?”

जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुमचे नाव पीएम किसान लाभार्थी यादी (PMKisan Labharthi Yadi) मध्ये आहे का हे तपासायचे असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या लेखात आपण अधिकृत संकेतस्थळावरून पीएम किसान लाभार्थी यादी कशी पाहायची, नाव नसल्यास काय करायचे, तक्रार कशी करायची आणि आवश्यक सूचना याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

पीएम किसान योजना लाभार्थी यादी! PMKisan Labharthi Yadi:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. २०१९ पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) द्वारे जमा होतात. त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाची गरज नसते.

पीएम किसान लाभार्थी यादी (PMKisan Labharthi Yadi) म्हणजे या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची अधिकृत यादी. सरकार वेळोवेळी अपडेटेड पीएम किसान लाभार्थी यादी जाहीर करते. नवीन हप्ता येण्यापूर्वी अनेक शेतकरी ही यादी तपासतात, कारण नाव यादीत असल्यासच हप्ता खात्यात जमा होतो.

पीएम किसान लाभार्थी यादी पाहण्याची प्रोसेस – PMKisan Labharthi Yadi:

PMKisan अंतर्गत लाभार्थ्यांची यादी (PMKisan Labharthi Yadi) पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

वरील लिंक ओपन केल्यावर आपले राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव असा तपशील तेथे भरा.

  • राज्य (State)
  • जिल्हा (District)
  • उप-जिल्हा (Sub-District)
  • ब्लॉक (Block)
  • गाव (Village)

एवढे भरल्यानंतर (Get Report) गेट रिपोर्ट वर क्लिक करा आणि संपूर्ण लिस्ट पाहा.

Beneficiaries list under PMKisan (PMKisan Labharthi Yadi)
PMKisan Labharthi Yadi

नाव यादीत नसल्यास काय करावे?

कधी कधी आधी नाव असतानाही नवीन पीएम किसान लाभार्थी यादी (PMKisan Labharthi Yadi) मध्ये नाव दिसत नाही. अशा वेळी खालील गोष्टी तपासा:

  • e-KYC पूर्ण आहे का?

  • आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का?

  • जमीन नोंदणी योग्य आहे का?

  • अर्जात काही चुकीची माहिती तर नाही?

प्रत्येक हप्त्यापूर्वी पीएम किसान लाभार्थी यादी (PMKisan Labharthi Yadi) अपडेट केली जाते. पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या मागील यादीमध्ये आपले नाव होते आणि अपडेट (PMKisan Labharthi Yadi) यादीमध्ये आपले नाव नसल्यास आपण पीएम किसान यांच्या हेल्पलाइन नंबरवर तक्रार करू शकता.

तक्रार करण्यासाठी, आपल्याला 011-24300606 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करणे आवश्यक आहे. ऑनलाईन तक्रार करण्यासाठी इथे क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

1) पीएम किसान लाभार्थी यादी कशी पाहू?

अधिकृत PM-Kisan Portal वर जाऊन राज्य, जिल्हा, ब्लॉक व गाव निवडून पीएम किसान लाभार्थी यादी पाहू शकता.

2) पीएम किसान लाभार्थी यादी मध्ये नाव नसल्यास काय करावे?

e-KYC तपासा, बँक व आधार लिंक तपासा आणि गरज असल्यास हेल्पलाइनवर संपर्क करा.

3) मोबाईलवरून पीएम किसान लाभार्थी यादी पाहता येते का?

होय, मोबाईल ब्राउझरमधून अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सहज पीएम किसान लाभार्थी यादी तपासता येते.

4) हेल्पलाइन क्रमांक कोणता आहे?

011-24300606

5) हप्ता न आल्यास यादी तपासणे का गरजेचे?

कारण नाव पीएम किसान लाभार्थी यादी मध्ये असल्यासच पुढील हप्ता जमा होतो.

पुढील लेख देखील वाचा!
  1. पीएम किसान योजनेच्या खात्याची माहिती ऑनलाइन कशी अपडेट करण्याची?
  2. PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)
  3. पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांची बायोमेट्रिक eKYC CSC सेंटर मधून करण्याची प्रोसेस !
  4. प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
  5. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
  6. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  7. पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस !
  8. पीएम किसान योजनेचा हप्ता स्वेच्छेने बंद कसा करावा ?
  9. पीएम किसान Voluntary Surrender रद्द करून असे करा पुन्हा हप्ते चालू !
  10. ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

3 thoughts on “PM-Kisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा!

  • Adarsh ukandarao upadhye

    Maje 2000 rupaychi kiat jmaa nahi jale ahi

    Reply
    • तुमचा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २००० चा हप्ता बँकेमध्ये जमा झाला की नाही ते चेक करा किंवा PM Kisan खात्याचे स्टेट्स चेक करा.
      https://bit.ly/3jzLkqj
      पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना : तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले नसतील तर ‘अशी’ करा तक्रार (Grievance PM Kisan)
      https://bit.ly/3yB5RRm

      Reply
      • गणपत शिवराम राठोड

        नमस्कार सर मला पी एम किसान योजनेचा एकच हप्ता मिळाला आहे

        Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.