वृत्त विशेषकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी योजना

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना खात्याचे किंवा हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लाभार्थी स्थिती (NSMNY Beneficiary Status) ही माहिती आज प्रत्येक शेतकऱ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा पुढील 2,000 रुपयांचा हप्ता जमा झाला आहे की नाही, हे समजण्यासाठी ही स्थिती तपासणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने प्रमाणे राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करून त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये जमा होतील. प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नेमका काय?

  • नमो शेतकरी महा सन्मान निधी ही केंद्राच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान (pm samman nidhi) योजनेसारखीच योजना आहे.
  • या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र सरकार वर्षाला सहा हजार रुपये जमा करेल.
  • केंद्र सरकारकडून दर तीन महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.
  • याप्रमाणेच आता राज्य सरकारही दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करेल.
  • यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला केंद्राचे सहा हजार आणि महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये असे एकूण 12 हजार रुपये जमा होतील.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लाभार्थी स्थिती – NSMNY Beneficiary Status:

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा २००० चा हप्ता बँकेमध्ये जमा झाला की नाही ते चेक करण्यासाठी NSMNY Beneficiary Status च्या खालील लिंकवर क्लिक करून ओपन करा.

https://nsmny.mahait.org/Beneficiary_Status/Beneficiary

त्यानंतर तिथं तुम्हाला मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकून कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर Get Data या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर २००० च्या हप्त्या (NSMNY Beneficiary Status) विषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा - Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana NSMNY Beneficiary Status:
NSMNY Beneficiary Status

” नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” या योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या PM- KISAN योजनेनुसार खालील वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाद्वारे आयुक्त (कृषी) यांच्या मार्फत वितरीत करण्यात येईल.

अ. क्र. हप्ता क्रमांककालावधीरक्कम
1पहिला हप्तामाहे एप्रिल ते जुलैरु. 2000/-
2दुसरा हप्तामाहे ऑगस्ट ते नोव्हेंबररु. 2000/-
3तिसरा हप्तामाहे डिसेंबर ते मार्चरु. 2000/-

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी लाभार्थी पात्रता:

दिनांक 01.02.2019 रोजी शेतजमीन धारण करणारे शेतकरी कुटुंबे (पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश असलेले) पीएम किसान (pm kisan samman nidhi yojana) आणि NSMNY या दोन्ही योजनेसाठी पात्र आहेत.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे फायदे:

1) पीएम किसान (PMKISAN Yojana) नुसार पात्र शेतकरी कुटुंबांना रुपये 2000/- प्रति हप्ता चा फायदा होईल.

2) पीएम किसान सम्मान निधि (PM KISAN Yojana) मध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना NSMNY चा लाभ मिळेल.

3) NSMNY लाभार्थ्यांना GoI द्वारे प्रदान केलेल्या यादीचा लाभ होईल.

4) NSMNY चा पहिला हप्ता PMKISAN च्या हप्त्याच्या यादीनुसार दिला जातो.

5) पात्र शेतकरी कुटुंबाला PMKISAN आणि NSMNY कडून रु. 2000/- दिले जाते.

6) पात्र शेतकऱ्यांना PM KISAN आणि NSMNY या दोन्ही योजनांमधून एका वर्षात रु. 12,000/- लाभ मिळतो.

7) DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार फायदा.

8) NSMNY चा लाभ फक्त आधार लिंक केलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाईल.

9) NSMNY मधील अपात्रांना जमा केलेला लाभ PMKISAN च्या SOP नुसार वसूल केला जाईल.

या लेखात, आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना खात्याचे किंवा हप्त्याचे स्टेट्स (NSMNY Beneficiary Status) ऑनलाईन चेक करण्या विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स ऑनलाईन चेक करा !
  2. प्रधानमंत्री किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
  3. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  4. PMKisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा!
  5. पीएम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रोसेस !
  6. बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन/ऑफलाईन लिंक करण्याची सविस्तर प्रोसेस !
  7. ॲग्रिस्टॅक योजनेचे फायदे काय? ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
  8. ॲग्रिस्टॅक फार्मर आयडी यादी अशी करा डाउनलोड !
  9. ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीचे स्टेटस ऑनलाईन कसे चेक करायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती!
  10. ‘नमो किसान सन्मान निधी योजनें’तर्गत ३ हजार रुपये वाढविणार!
  11. नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? मग पीक विम्याचा दावा करताना या गोष्टी लक्षात ठेवल्यास नुकसान भरपाई मिळू शकते !
  12. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत मिळवण्यासाठी या गोष्टी करा !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
```html
Join Now
Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.