अल्पसंख्यांक मंत्रालयमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृती योजना

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकीत विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून त्यांना वंचित रहावे लागते. अल्पसंख्याक समुदायातील मुलांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून शासनाकडून अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना “परदेश शिष्यवृत्ती योजना” लागू करण्यात येईल व त्यासाठी रूपये १२० कोटीचा निधी उपलब्ध केला जाईल. अशी मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी सन २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केली. व त्यास अनुसरुन अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना “परदेश शिष्यवृत्ती योजना” लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृती योजना :-

क्यूएस वर्ल्ड रॅन्कींग (Qs World Ranking) मधील २०० च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पी.एच्. डी अभ्यासक्रमासाठी बीनशर्त (Unconditional) प्रवेशास पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समूदायातील २७ विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेश शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून तिचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.

१) विद्यार्थ्यांची पात्रता –

>

(१) विद्यार्थी हा केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाने धार्मिक अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेल्या समुदायातील व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

(२) विदयार्थ्यांने परदेशातील क्युएस् अद्ययावत वर्ल्ड रॅकींगमध्ये २०० च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्थेत खात्रीशीर व बिनशर्त प्रवेश मिळविलेला असावा.

(३) ज्या विद्यार्थ्यांने परदेशी शैक्षणिक संस्थाकडून Unconditional offer letter मिळालेले असेल, त्यांनाच ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहील. यासाठी Conditional offer letter गृहीत धरेल जाणार नाही.

(४) विद्यार्थ्यांने या योजनेखालील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना, त्याने यापूर्वी महाराष्ट्र शासनाची वा कोणत्याही अन्य विद्यापीठाची वा इतर कोणत्याही राज्य शासनाची वा केंद्र शासनाची वा अन्य संस्थांकडून परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी.

(५) परदेशातील विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा. तसेच अभ्यासक्रमाचा कालावधी कमीत कमी दोन वर्षांचा असावा.

(६) एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किंवा एक्झीक्युटीव्ह पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमांस प्रवेशीत विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत.

(२) शैक्षणिक अर्हता

पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पी.एच.डी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे.

(३) वयोमर्यादा:-

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आणि पी.एच.डी अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष असावी.

(४) उत्पन्न:-

विद्यार्थ्यांच्या पालकांचे/कुटुंबाचे व विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्याच्या स्वत:च्या उत्पन्नासह सर्व स्त्रोतातून मिळणारे उत्पन्न रु. ८.०० लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी अविवाहीत असल्यास कुटुंबामध्ये त्याच्या पालकांचा समावेश असेल. विद्यार्थी विवाहीत असल्यास कुटुंबामध्ये पती/पत्नीचा समावेश असेल.

(५) एकाच कुटुंबातील कमाल पात्रता धारक:-

एका कुटुंबातील एका मुलास फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.

६) अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे प्रमाण:-

अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाकरीता शिष्यवृत्ती प्रदान करण्याकरीता त्यांची लोकसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थीसंख्येचे वाटप खालीलप्रमाणे आहे.

(सन २०११ च्या जनगणनेनुसार)

अ.क्र. अल्पसंख्याक समुदायाचे नाव लोकसंख्या अल्पसंख्याक समुदायातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात टक्केवारी शिष्यवृती देय संख्या (27 पैकी)
मुस्लीम १२,९७,११५२ ५८.१५ १५
बौद्ध ६५,३१,२०० २९.२७
3 ख्रिश्चन १०,८००७३ ४.८४
4 जैन १४००३४९ ६.२७
5 पारशी ५७,००० ०.२५
6 शीख २२३२४७ १.०
7 ज्यू २४६६ ०.००२
8 शीख २२३२४७ १.०
एकूण २,२२,६५,४८७ २७

मात्र एखाद्या समुदायाचे पात्र विद्यार्थी कमी झाल्यास आंतरबदलाने अन्य समुदायाच्या विद्यार्थ्यांना त्या रिक्त जागांचा लाभ देय राहील.

७) योजनेखाली समाविष्ट असलेले अभ्यासक्रम

सदर शिष्यवृत्तीसाठी खालील अभ्यासक्रम निश्चित करण्यात येत आहेत :-

एकूण शिष्यवृत्ती संख्या २७

अ.क्र. विषय पदव्युत्तर डॉक्टरेट एकूण
मुस्लीम ०८ ०२ १०
बौद्ध ०४ ०२ ०६
3 ख्रिश्चन ०४  ०२ ०६
4 जैन ०२ ०१ ०३
5 पारशी ०२ ०२
एकूण २० २७

निवड वर्षामध्ये पदव्युत्तर पदवी / डॉक्टरेट (पीएचडी) अभ्यासक्रमांसाठी जर एखाद्या शाखेमध्ये उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, तर दुसऱ्या शाखेतील पदव्युत्तर पदवी / डॉक्टरेट (पी.एच.डी) अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये आंतरपरिवर्तनाने बदल करण्याचे अधिकार शासनास असतील. उपरोक्त आंतरपरिवर्तन हे उभे अथवा आडवे (Horizontal or Vertical) असे कोणत्याही स्वरुपात राहील.

(८) अभ्यासक्रमाचा कालावधी :-

(१) पी.एच.डी साठी ४ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी या पेक्षा कमी असेल तो. तथापि कोणत्याही परिस्थितीत दोन वर्षा पेक्षा कमी नसावा.

(२) पदव्युत्तर पदवीसाठी ३ वर्षे किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल तो. तथापि कोणत्याही परिस्थितीत २ वर्षापेक्षा कमी नसावा.

९) विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ:-

परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांस / उमेदवारास खालील लाभ देण्यात येतील.

(१) परदेशातील शैक्षणिक संस्थेने ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी (Tuition Fee) ही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकृत केलेल्या यंत्रणेमार्फत थेट संबंधित शैक्षणिक संस्थेस अदा करण्यात येईल.

(२) भारत सरकारच्या DOPT विभागाने विदेशी शिष्यवृत्तीसाठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे येणारा खर्च अथवा महाराष्ट्र शासन वेळोवेळी या प्रयोजनासाठी जाहीर करेल ती रक्कम ही निर्वाह भत्ता (Maintenance Allowance) म्हणून संबंधित विद्यार्थ्यांच्या परदेशातील वैयक्तिक खात्यामध्ये जमा केला जाईल. यासाठी खालील दराने निर्वाह भत्ता अनुज्ञेय असेल:-

(i) यु.एस.ए आणि इतर देशांसाठी तसेच यू. के. साठी प्रती वर्षासाठी केंद्र शासनाने निश्चित केल्याप्रमाणे, National Overseas Scholarship Scheme या योजनेसाठी ठरविलेल्या दराने किंवा विद्यार्थ्यांस प्रत्यक्ष येणारा खर्च यापैकी कमी असणारी रक्कम अनुज्ञेय असेल. अमेरिकेत वा इतर देशात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता प्रति वर्षी १५,४००/- अमेरिकन डॉलर मिळतील. तसेच युके (UK) मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांस प्रति वर्षी ९,९००/-जी.बी.पी. उपलब्ध करून दिले जातील. जेव्हा जेव्हा केंद्र शासन National Overseas Scholarship Scheme द्वारे या दरात बदल करेल तेव्हा तेव्हा या दरांमध्ये बदल करण्यात येईल.

(ii) विद्यार्थ्यांस परदेशी शिक्षण संस्थेमार्फत किंवा इतर कोणत्याही यंत्रणेमार्फत मिळणारी शिष्यवृत्ती इतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ किंवा शिकविण्याबाबतचे मानधन किंवा फेलोशिप किंवा रिसर्च असोसिएट म्हणून मिळणारी ही रक्कम देय होणाऱ्या या शिक्षण फी वा एकूण देय रकमेमधून कपात करण्यात येईल.

(iii) विद्यार्थ्यास परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी कमीत कमी कालावधीचा आणि जवळच्या मार्गाचा (Shortest Route) इकॉनॉमी क्लासचा विमान प्रवासाचा दर (Air Travel Expenditure) दिला जाईल.

(iv) विद्यार्थी / उमेदवारास खालील बाबींवर होणाऱ्या खर्चाचा भार हलका व्हावा म्हणून दरवर्षी यु. एस. ए आणि इतर देशांसाठी तसेच (यू. के. वगळून) फक्त १५०० युएस् डॉलर्स, आणि यु. के. साठी फक्त ११०० जीबीपी इतका निर्वाह भत्ता / इतर खर्च आकस्मिक खर्च (Contingency Expenditure) म्हणून देण्यात येईल जसे की, आवश्यक ती क्रमिक पुस्तके, वह्या व स्टेशनरी, प्रबंध अहवाल तयार करणे, टायपिंग, बायडिंग, स्थानिक भेटी व इतर अभ्यास सहली प्रवास खर्च, प्रबंधासाठी आवश्यक खर्च, इतर प्रासंगिक खर्च,

(v) वरीलप्रमाणे शिक्षण फी व इतर फी, निर्वाह भत्ता आणि आकस्मिक खर्च यासाठी निर्धारीत केलेल्या दरापेक्षा कोणताही जास्तीचा खर्च अनुज्ञेय होणार नाही. निर्धारित दरापेक्षा होणारा जास्तीचा खर्च विद्यार्थी / उमेदवारास स्वतः सोसावा लागेल व अशा प्रकारचे हमीपत्र विद्यार्थ्यास व पालकांस अर्जासोबत द्यावे लागेल. अशा प्रकारचे हमीपत्र देताना प्रवासासाठी जवळचा व कमी खर्चाचा मार्ग निवडला जाईल ही बाब देखील विद्यार्थ्यांस हमीपत्रात नमूद करावी लागेल.

(३) पदव्युत्तर पदवी किंवा पी.एच.डी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षाकरिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस शिष्यवृत्तीचा लाभ देय राहील.

(४) ज्या विद्यापीठामध्ये / शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे, ते विद्यापीठ / शैक्षणिक संस्था ही त्या देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठ / शैक्षणिक संस्था असावी. (Accredited University / Institute) या सबंधीची कागदपत्रे विद्यार्थ्यांनी अर्जासोबत सादर करावीत. याबाबत काही वाद निर्माण झाल्यास परदेशातील भारतीय उच्चायुक्त यांच्याकडून खात्री करून समिती त्याबाबत निर्णय घेईल.

(५) अर्जात नमूद केलेले विद्यापीठ व अभ्यासक्रमासाठी काही कारणास्तव विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नसल्यास, त्याच विद्यापीठात त्याच अभ्यासक्रमासाठी पुढील एका सत्राचा (६ महिन्याचा) कालावधी, कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता संबंधित विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थेने विनाअट वाढवून दिल्यास आणि विद्यार्थ्यांने त्यासाठी सबळ कारण / पुरावा सादर केल्यास, अशी मुदतवाढ देण्याचे अधिकार योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या प्राधिकरणास असतील. तद्नंतर विद्यार्थ्यांस आणखी मुदतवाढ मिळणार नाही.

(६) एकदा निवड झालेले विद्यापीठ व अभ्यासक्रम कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.

(७) विद्यार्थ्यांना अर्ज करतेवेळी विद्यापीठाकडून मान्य करून घेतलेल्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठीच्या कालावधीच्या शिक्षण फी, निर्वाहभत्ता, आकस्मिक खर्चाची जी माहिती सादर केली आहे, त्यापेक्षा जास्तीचा खर्च अनुज्ञेय होणार नाही.

(८) अभ्यासक्रमाच्या कालावधी व्यतिरिक्त कोणत्याही परिस्थितीत वाढीव कालावधीच्या व्हिसासाठी मान्यता देण्यात येणार नाही.

(९) काही कारणास्तव विद्यार्थ्यास त्याची निवड होऊनही त्या वर्षी प्रवेश घेता आला नाही, तर त्यास वयोमर्यादेच्या अधीन राहून पुढील वर्षी नव्याने अर्ज करण्याची मुभा राहील.

(१०) परदेशातील भारतीय दूतावासात राज्य शासनाकडून संबंधित विद्यार्थ्याचा प्रगती अहवाल, वर्तणूक खर्चाचा हिशोब इ. माहिती पुरविण्याबाबत विनंती करण्यात येईल. तसेच काही विपरीत बाबी असल्यास, परदेशातील भारतीय दूतावास त्या बाबी राज्य शासनास कळवतील. परदेशात प्रवेशित विद्यार्थ्याच्या प्रगतीविषयी मार्गदर्शन व सल्ला देणेबाबत परदेशातील दुतावासास विनंती करण्यात येईल. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना परदेशात काही अडचणी उद्भवल्यास मदत करण्यासाठी संबंधित भारतीय दूतावासांना विनंती करण्यात येईल. विद्यापीठात / शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी तात्काळ तेथील भारतीय परदेशी दूतावासास संपर्क साधून आपली नोंदणी करेल व त्याचा तपशील योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकरणाकडे सादर करेल.

(११) विद्यार्थ्यांना कोणत्या दिनांकास व कोणत्या विमानाने परदेशात जाणार आहे, याची लेखी माहिती ही योजना अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकरणाकडे सादर करणे आवश्यक आहे. ही माहिती न देता विद्यार्थी परदेशात गेल्यास त्यास विमान खर्च अनुज्ञेय होणार नाही.

(१२) आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, उपस्थिती, वर्तणूक, खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र व इतर तद्नुषंगिक बाबींचा अहवाल परदेशातील भारतीय दूतावासाकडून प्राप्त करून घेण्यात येईल.

(११) अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्यानंतर परदेशातील वास्तव्यासाठी कोणताही पत्रव्यवहार शासनाकडे किंवा योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकरणाकडे केला जाणार नाही. विद्यार्थी किंवा त्याच्या वतीने अन्य कोणत्याही व्यक्तीने केलेला असा पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही.

(१२) परदेशी विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी GRE (Graduate Record Examination), TOFEL (Test of English as a foreign language), IELTS (International English Language Testing System) इ. प्रकारच्या परीक्षा जेथे अनिवार्य आहेत, त्या उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक असेल.

(१३) विद्यार्थ्यांने शिष्यवृत्तीसाठी अर्जामध्ये नमूद केलेले विद्यापीठ व अभ्यासक्रम, त्यांचा कालावधी आणि खर्चाचे तपशील यामध्ये निवड समितीने निवडीची शिफारस केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.

(१४) पी. एच. डी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने ज्या विषयाची संशोधनासाठी निवड केली आहे, त्या विषयाचा, भारतीयांमध्ये कोणत्याही विद्यापीठामध्ये अंतिम प्रबंध अहवाल (Thesis) सादर केला नसल्याबाबतचे घोषणापत्र (Declaration) सादर करणे आवश्यक आहे.

१०) अर्ज करण्याची पद्धत :-

(१) सदर शिष्यवृत्तीसाठी प्रत्येक वर्षी एप्रिल महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या प्राधिकरणामार्फत वृत्तपत्रात तसेच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीरात प्रसिद्ध केली जाईल.

(२) सदरची योजना अल्पसंख्याक विकास विभागाची असली तरी या शासन निर्णयातील नियमावली, अटी व शर्तीनुसार योजनेची अंमलबजावणी व कारवाई योजनेसाठी प्राधिकृत केलेल्या प्राधिकरणामार्फत करण्यात येईल.

(३) सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याच्या आत किंवा प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त ३१ मे अखेर उमेदवारांनी विहीत नमुन्यातील परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह ऑनलाईन / ऑफ लाईन मूळ कागदपत्रासह सादर करावेत. अभ्यासक्रम निहाय असलेल्या आरक्षणाच्या अधीन राहून, निवड समितीने निश्चित केलेली पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी दिनांक १ जूलै पूर्वी अथवा निवड समितीच्या निर्णयानंतर शासन जाहीर करील.

(४) शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर १५ जुलै पर्यंत संबंधित विद्यार्थ्यांना कळवून त्यांच्याकडून आवश्यक ती अतिरिक्त माहिती मागविण्यात येईल. तसेच या विद्यार्थ्यांची गृहचौकशी करण्यात येईल.

११) सादर करावयाची आवश्यक कागदपत्रेः

1. विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज.

II. अर्जदार अल्पसंख्याक असल्याबाबतचा पुरावा.

III. सक्षम प्राधिकाऱ्यानी दिलेला उत्पन्नाचा दाखला.

IV. पदवी/पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे पुरावे (सनद/गुणपत्र)

V. परदेशातील QS World Ranking २०० च्या आतील शैक्षणिक संस्थेमध्ये विनाअट प्रवेश मिळाला असल्याबाबतचे पत्र (Unconditional) ऑफर लेटर.

VI. ज्या विद्यापिठामध्ये प्रवेश मिळाला आहे त्याच्या सविस्तर माहिती पत्रकाचे पत्र Prospect

VII. आवश्यक ते करारनामे व हमीपत्रे.

VIII. संपुर्ण अभ्यासक्रम होण्यासाठी वर्षनिहाय खर्चाचे अंदाजपत्रक. जाण्या-येण्याचा विमान प्रवास, राहण्याचा खर्च याचा समावेश असावा.

IX. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी परदेशातील विद्यापिठामध्ये प्रवेश घेणार असेल त्या विद्यापिठास व अभ्यासक्रमास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता असणे आवश्यक आहे.

Χ. नोकरीमध्ये असलेल्या उमेदवारांनी तो जेथे नोकरी करतो त्या यंत्रणेचे (Organization/ Employer) नाहरकत प्रमाणपत्र दाखल करणे अनिवार्य आहे.

XI. विद्यार्थी, शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या कालावधीसाठी किंवा शिक्षण त्यापूर्वी पूर्ण झाल्यास जो कालावधी लागेल, या दोघांपैकी जो कमी आहे, त्या कालावधी पुरतेच परदेशात राहण्याचे बंधपत्र (Bond) राज्य शासनास तसेच परदेशातील भारतीय दूतावासास लिहून देईल. या आवश्यक कालावधीपेक्षा जास्त कालावधीकरीता परदेशात राहण्यास विद्यार्थ्यांस परवानगी मिळणार नाही

XII. उमेदवारास / विद्यार्थ्यांस शासनाने विहीत करुन दिलेल्या नमुन्यात Record Release Consent Form हा बंधपत्राच्या स्वरुपात द्यावा लागेल.

XIII. ज्या विद्यार्थ्यांना परदेशी शैक्षणिक संस्थांकडून Unconditional Offer Letter मिळालेले असेल, त्यांनाच ही शिष्यवृत्ती अनुज्ञेय राहील. यासाठी conditional Offer Letter गृहीत धरले जाणार नाही.

(१२) विद्यार्थ्यांची कर्तव्ये व त्यांना अपात्र ठरवू शकणारी कारणे

(१) विद्यार्थ्यांस वरील लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून तसेच शैक्षणिक संस्था / विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी सादर करणे अनिवार्य आहे.

(२) प्रवेशित विद्यार्थ्याने प्रत्येक सहा महिन्याच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे (Utilization Certificates), खर्चाच्या पावत्या इ. विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाकडून प्रमाणित करून सादर करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय शिष्यवृत्ती पुढील रक्कम अनुज्ञेय होणार नाही.

(३) सुरूवातीस परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणे आणि विहीत कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्वरित कालमर्यादेत भारतात परत येण्यासाठी नजिकच्या मार्गाने इकॉनॉमी क्लासचे विमान प्रवास भाडे देण्यात येईल. त्यासाठी विमान प्रवासाचे मूळ तिकीट, मूळ बोर्डोंग पास, परतीचे प्रवासभाडे मिळण्यासाठी अभ्यासक्रम विहीत कालावधीत यशस्वीपणे पूर्ण केल्याचा पुरावा इ. कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

(४) अपवादात्मक प्रसंगी, विद्यार्थ्यांनी / पालकांनी, परदेशी शिक्षण संस्था/ विद्यापीठात शिक्षण फी / इतर अनुज्ञेय फी स्वतः भरलेली असेल, अशावेळी आवश्यक त्या पावत्या व पुरावे सादर करावे, त्यानंतर अशा रकमा विद्यार्थ्यांस देय होणाऱ्या शिष्यवृत्तीमधून विद्यार्थ्यांच्या परदेशातील खात्यावर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकरणाकडून जमा करण्यात येईल.

(५) विद्यार्थ्यांने भारतात राष्ट्रीयकृत बँकेत व परदेशात अधिकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य आहे. त्याच खात्यावर त्यांना देय होणारी शिष्यवृत्ती CMP किंवा RTGS किंवा SWIFT ने अदा केली जाईल. या खात्याचा तपशील त्याने परदेशात जाऊन प्रवेश घेतल्यानंतर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकरणाकडे तातडीने सादर करावा.

(६) परदेशी शिक्षण संस्था / विद्यापीठाने ऑफर लेटरमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीच्या निर्धारीत केलेल्या फीच्या मर्यादेतच लाभ संबंधित विद्यार्थ्यांस अनुज्ञेय होतील. भविष्यात त्यामध्ये वाढ झाल्यास परदेशातील भारतीय उच्चायुक्तालयाच्या शिफारशीनंतरच ही वाढ संबंधित विद्यार्थ्यास अनुज्ञेय असेल.

(७) प्रत्येक सहा महिन्यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृतीचे (शिक्षण फी, परीक्षा फी, निर्वाह भत्ता इ. चे) उपयोगिता प्रमाणपत्र आणि प्रगती अहवाल योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या प्राधिकरणाकडे सादर केल्यानंतर पुढील ६ महिन्यांची शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल. प्रत्येक ६ महिन्यांनी विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रगती अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र / खर्चाचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांस पुढील शिष्यवृत्ती अनुज्ञेय होणार नाही.

१३) विद्यार्थ्यांची अपात्रताः-

(अ) कर्तव्यात कसूर (Default under the scheme)

१) या योजनेखाली निवड झालेल्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेताना नियमांचे तसेच अटी व शर्तीचे आणि बंधपत्रामध्ये लिहून दिलेल्या बाबींचे उल्लंघन केल्यास किंवा परदेशी शैक्षणिक संस्थेने अभ्यासाविषयी / वागणूकीविषयी / गैरहजेरीविषयी प्रतिकूल अहवाल दिल्यास किंवा विद्यार्थ्याने प्रवेश अर्धवट सोडला असल्यास, किंवा विद्यार्थ्यांने जेथे प्रवेश घेतला आहे तो देश सोडून निघून गेला असल्यास किंवा विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यापीठ / शैक्षणिक संस्थेमध्ये विना परवानगी प्रवेश घेतला असल्यास, किंवा विद्यार्थ्यांची ज्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे, तो अभ्यासक्रम त्याने विनापरवानगी बदलल्यास, किंवा तो भारतात कोणत्याही प्रकाराची परवानगी न घेता परत आल्यास, विद्यार्थ्याने कर्तव्यात कसूर केल्याचे (Defaulter) समजण्यात येईल.

२) कोणतेही कारण अथवा सबबी सांगून अभ्यासक्रम पूर्ण न करणे किंवा विहित प्रयोजनासाठी खर्च न करणे किंवा खर्चात काटकसर न करणे किंवा विहीत लाभ मर्यादेपेक्षा जास्तीची मागणी परदेशात जावून करणे किंवा कोणत्याही प्रकारचा दबाब आणणे किंवा धमकी देणे किंवा सदर नियमावलीतील तरतुदींचे उल्लंघन करणे किंवा परदेशातील नियम / अटी तरतुदींचे उल्लंघन करणे / वाममार्गास लागणे किंवा परदेशातील शैक्षणिक कालावधीत कोणत्याही प्रकाराचे गैरकृत्य करणे किंवा अशा गैरकृत्यासाठी दंड / शिक्षा होणे किंवा भारतीय राष्ट्रीयत्वास हानी पोहचविणे किंवा भारताची बदनामी करणे याबाबी कर्तव्यातील कसूर समजण्यात येतील. वरीलप्रमाणे कर्तव्यात कसूर झाल्यास त्याला देण्यात आलेली शिष्यवृत्तीची सर्व रक्कम दरसाल दर शेकडा १२% व्याजाने वसूल करण्यात येईल, अशा आशयाचे विद्यार्थी व पालक यांचे संयुक्त हमीपत्र सादर करणे आवश्यक राहील. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अशा विद्यार्थ्यांकडून १२% व्याजासह त्याच्यासाठी शासनामार्फत झालेला खर्च वसूल करण्यात येईल.

(ब) खोटी माहिती सादर करणे:-

कोणत्याही विद्यार्थ्याने / उमेदवाराने खोटी माहिती / कागदपत्रे सादर केल्याचे सिद्ध झाल्यास अथवा उपरोक्त उपपरिच्छेद (अ) प्रमाणे कर्तव्यात कसुर केल्यास, त्यास ताबडतोब पुढील शिक्षणासाठी अटकाव (Debar) केला जाईल व त्याच्यासाठी झालेल्या शासनाच्या खर्चाची रक्कम १५% चक्रवाढ व्याजासह वसूल करण्यात येईल. अशा विद्यार्थ्याचा / उमेदवाराचा काळया यादीत समावेश केला जाईल. तसेच प्रचलित कायद्यानुसार त्याच्या विरूद्ध कारवाई करण्यात येईल. आणि त्यांनी दिलेले जामीनदार आणि संदर्भ अधिकारी / व्यक्ती यांना सुद्धा ही बाब लेखी स्वरूपात कळविण्यात येईल.

(क) कायदेशीर बाबी:-

या संदर्भात कोणत्याही कायदेशीर बाबी उद्भवल्यास, त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात असतील. परदेशात उद्भवलेल्या कायदेशीर बाबीसाठी परदेशातील भारतीय उच्चायुक्त कार्यवाही करतील.

(१४) योजनेच्या अनिवार्य अटी:-

(१) विवाहीत उमेदवाराच्या पत्नी / पती व मुले पालक वा नातेवाईक यांना परदेशामध्ये सोबत घेवून जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सहाय्य दिले जाणार नाही. त्यासाठी पासपोर्ट मिळविणे, व्हिसा मिळविणे, आर्थिक तरतुद करणे, परदेशातीत निवास व दैनंदिन खर्चाची व्यवस्था करणे ही उमेदवाराची वैयक्तिक जबाबदारी असेल.

(२) नोकरी करणाऱ्या उमेदवारांनी सर्व प्रशासकीय बाबी उदा. रजा, वेतन आणि सेवेच्या इतर बाबी या स्वतः प्रत्यक्षपणे निराकरण करून घ्यावयाच्या आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची सवलत शासनाकडून मिळणार नाही.

(३) (i) अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये, परदेशामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांस भारतामध्ये यावयाचे असल्यास त्यासाठी त्याने संबंधित शैक्षणिक संस्था आणि राज्य शासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल आणि याबाबतची माहिती संबंधित विद्यार्थी भारतीय दूतावासास कळवतील.

(ii) जेवढया कालावधीमध्ये विद्यार्थी परदेशातील शैक्षणिक संस्थेमधून दूर असेल, तेवढया कालावधीचा कोणताही खर्च त्यास अनुज्ञेय होणार नाही. तथापि, तो पुन्हा त्याच शैक्षणिक संस्थेत त्याच अभ्यासक्रमाचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी हजर झाल्यास हजर झालेल्या दिवसापासून त्यास उर्वरित देय लाभ अनुज्ञेय होतील.

(iii) अशा परिस्थितीत विद्यार्थ्याने परत त्याच परदेशी शिक्षण संस्थेमध्ये हजर न होता शिक्षण अर्धवट सोडल्यास त्यास अदा करण्यात आलेले शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क इतर शुल्क व निर्वाह भत्ता याची व्याजासह वसुली करण्यात येईल, या आशयाचे लेखी हमीपत्र विद्यार्थ्यास / उमेदवारास शिष्यवृत्ती मंजुरीपूर्वी द्यावे लागेल.

(४) पासपोर्ट व व्हिसा मिळविण्याची जबाबदारी उमेदवार / विद्यार्थी याची असेल.

(५) उमेदवारास / विद्यार्थ्यांना केवळ ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये, ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेला आहे व शिष्यवृत्ती मिळाली आहे, केवळ त्याच कारणासाठी व्हिसा घेणे बंधनकारक असेल.

(६) निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे सादर करणे व आवश्यक ते करारनामे देणे बंधनकारक असेल.

(७) निवड झालेल्या विद्यार्थ्यास / उमेदवारास त्याच्या शैक्षणिक कालावधीमध्ये जास्तीची रक्कम अदा झाली असल्यास त्याची परतफेड करणे विद्यार्थ्यांवर बंधनकारक असेल अथवा ती वसूल करण्याबाबत प्रचलित कायदे व नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. याबाबतचा उल्लेख हमीपत्रामध्ये करणे बंधनकारक असेल.

(८) सदर शिष्यवृत्तीबाबत महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने घेतलेला निर्णय अंतिम असेल.

(१५) इतर अटी व शर्ती:-

(१) अभ्यासक्रम संपल्यानंतर या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांस व्हिसा मुदत वाढीसाठी परवानगी दिली जाणार नाही. अभ्यासक्रमाचा कालावधी कोणत्याही कारणास्तव वाढल्यास त्यासाठी अतिरिक्त निधी दिला जाणार नाही.

(२) परदेशात शिक्षणासाठी निवड झाल्यानंतर प्रवेश घेण्यासाठी जाताना व अभ्यासक्रम संपल्यानंतर परदेशातून भारतात येण्याचा खर्च नजीकच्या मार्गाचा व इकॉनॉमिक वर्गाच्या मर्यादेत एकदाच देण्यात येईल.

(३) वर बाब (१) मध्ये नमूद केल्याप्रमाणे अभ्यासक्रम निहाय विद्यार्थी प्रवेश संख्या निर्धारीत केलेली असून त्यामर्यादेत विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. सदर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड करताना निवड समितीने अभ्यासक्रमांसाठी पदव्युत्तर पदवी व पी. एच. डी करीता राखुन ठेवलेल्या अभ्यासक्रमांसाठी बाब (१) नुसार निवड करावी. निर्धारीत केलेल्या प्रत्येक अभ्यासक्रमासाठी संपूर्ण राज्याची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करावी व गुणवत्तेप्रमाणे आरक्षित कोट्याच्या मर्यादेच्या अधीन राहून शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी शासनास शिफारस करावी. ही गुणवत्ता विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्थांच्या अद्ययावत जागतिक क्रमवारीनुसार (QS World Ranking) प्रमाणे असेल.

(१६) निवडीची कार्यपद्धती:-

परदेशातील शैक्षणिक संस्था / विद्यापीठाची जागतिक क्रमवारी (QS World Ranking) जेष्ठताक्रम हाच विद्यार्थी निवडीचा मुख्य निकष असेल. उच्च Q.S. जागतिक क्रमवारीच्या शैक्षणिक संस्थेतील प्रवेशित विद्यार्थी हा या शासन निर्णयाच्या सुरूवातीस आभ्यासक्रम सदरातील विद्याशाखा / अभ्यासक्रम कोट्याच्या आरक्षणाच्या अधीन राहून निवडला जाईल. निवड करताना समान (टाय) गुणवत्ता असलेल्या प्रकरणी वयाने जेष्ठ असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येईल.

अल्पसंख्याक विकास विभाग शासन निर्णय : राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच्.डी. अभ्यासक्रमासाठी शिष्यवृती योजना शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – राजर्षी शाहू महाराज शिष्यवृती योजना – Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.