शेतकऱ्यांनो शासनाच्या कॅम्प मध्ये संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरुस्त करून घ्या

शेतकऱ्यांनो आता लवकरात लवकर शासनाच्या कॅम्प मध्ये संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरुस्त करून घ्या, अन्यथा नंतर तुम्हाला जमीन खरेदी विक्री करताना सातबाऱ्यावरील या चुका दुरुस्त करण्यासाठी जास्त किंमत आकारली जाते. सातबाऱ्यावरील चुका दुरुस्त केल्यावर लक्षपूर्वक सातबारा वाचून घ्या, त्यामध्ये जर पुन्हा चूक आढळली तर वेळीच चूक दुरुस्त करा. 

काही शासकीय अधिकारी जाणूनबुजून आपल्या सातबाऱ्यावर चुका करत असतात, कारण त्यांना नंतर आपल्याकडून सातबाऱ्यावरील चूक दुरुस्त करण्यासाठी पैसे उकळायचे असतात, त्यामुळे सातबारीवरील चुका आताच या शासनाच्या कॅम्प मध्ये लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. 

शेतकऱ्यांनो शासनाच्या कॅम्प मध्ये संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरुस्त करून घ्या


संगणकीकृत सातबारा मधील चुका दुरुस्त करण्यासाठी कॅम्प घेणे बाबत:

ई- फेरफार फेरफार प्रणालीमध्ये राज्यातील 100% अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण झाले असनू , या संगणकीकृत गाव न.नं. 7/12 चे आधारे दस्त नोंदणी केली जाते. यामध्ये अचूकता येण्यासाठी सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. तथापि अजून देखील संगणकीकृत ७/१२ मध्ये चुका किंवा त्रुटी असल्याची निवेदने अथवा तक्रारी शासनाकडे, जमाबंदी आयुक्त कार्यलयाकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होत आहेत. तसेच अनेक खातेदार ई-मेल द्वारे किंवा दूरध्वनी द्वारे अडचणी मांडतात. काही खातेदार ई-हक्क प्रणालीद्वारे अर्ज दाखल करतात. तरीही त्यात दुरुस्ती होत नाही. अश्या असंख्य तक्रारी इकडे दाखल होत आहेत. आता हा प्रकल्प अंतिम टप्यात असताना १०० % अचकूता साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजचे आहे. 

संगणकीकृत ७/१२ मधील अचूकता साध्य करण्यासाठी शासनाने चावडी वाचन, एडीट, री-एडीटसह कलम १५५ ´या आदेशाने दुरुस्तीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याचा वापर करून अचूक ७/१२ चे उद्दिष्ट शासनाने ९८% साध्य केले आहे. तरीही ही अचकूता १०० % साध्य करण्यासाठी तसेच ई-फेरफार प्रणालीत निदर्शनास न येणाऱ्या काही त्रुटी/चुका खातेदार निदर्शनास आणून देत असतील तर त्यासाठी चूक दुरुस्तीचे अर्ज स्वीकारणे आणि त्याप्रमाणे तहसीलदार यांचेकलम १५५ खालील आदेश कडून ७/१२ दुरुस्ती करण्यासाठी तालुका किंवा मंडळ स्थरावर कॅम्प घेण्याचा निर्णय  शासनाने घेतला आहे . त्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.

हेही वाचा - सातबारा (7/12) वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी?

संगणकीकृत ७/१२ मधील चुका दुरुस्तीसाठी प्रत्येक तालुक्यात तालुका स्थरावर किंवा मंडळ स्थरावर आठवड्यातून एक दिवस कॅम्प आयोजनासाठी निश्चित करणार व त्याची व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे. 

१. या कॅम्प च्या ठिकाणी ७/१२ दुरुस्ती साठी नवीन अर्ज स्वीकारणे व जुन्या हस्तलिखित अभिलेखांवरून खात्री करणे, तलाठी यांनी कलम १५५ चे ऑनलाईन प्रस्ताव दाखल करणे, तहसीलदार यांनी ऑनलाईन प्रस्तावांना खात्री करून मान्यता देणे, परिशिष्ट क मधील आदेश तहसीलदार यांनी स्वाक्षरी करणे आणि मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार यांच्या स्वाक्षरीत आदेश पाहून फेरफार नोंदी प्रमाणित करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत.

२. संगणकीकृत ७/१२ मधील एकही चूक दुरुस्ती आता तहसीलदार यांचे आदेशाशिवाय होवू शकत नसल्याने, या कॅम्प साठी तहसीलदार व नायब तहसीलदार (ई-फेरफार) यांची उपस्थिती बधंनकारक राहणार आहे.

३. ई-हक्क प्रणालीतून आलेले सर्व ऑनलाईन अर्ज या कॅम्प मध्ये निर्गत केले जाणार आहेत .

४. सदरचे सर्व कॅम्प उप विभागीय अधिकारी यांचे पर्यवेक्षणाखाली पार पडणार आहेत .

५. या कॅम्प मध्ये ODC अहवालातील विसंगत ७/१२ ची दुरुस्ती देखील करण्यात येईल. तसेच शासनाच्या दिनांक ११.१.२०२१ च्या निर्देशाप्रमाणे गाव नमुना नं.१ (क) मधील नोंदी देखील अद्यावत करण्यात येणार आहेत . 

६. हे कॅम्प दर आठवड्यात एका ठराविक दिवशी २० जानेवारी-2021 ते २० मार्च २०२१ या कालावधीत प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात येणार आहे. आणि या कॅम्प च्या पर्यवेक्षणासाठी जिल्हा स्थरावरून व विभागीय स्थरावरून वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा आणि शासन निर्णय पहा.

हेही वाचा - सातबारा (7/12) उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर

 मी आशा करतो की आपण या लेखाचा आनंद घेतला असेल. जर आपल्याला हा लेख आवडत असेल तर तो आपल्या सर्व मित्रांना सामायिक करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी हिथे क्लिक करा !!

Post a Comment

0 Comments