मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना : आता पशुपालकांच्या दारातच आरोग्य सेवा!
मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना (Mukhyamantri Pashu Swasthya Yojana) ही महाराष्ट्र शासनाने पशुपालकांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. मुख्यमंत्री पशुस्वास्थ (Mukhyamantri Pashu Swasthya Yojana) योजनेचा उद्देश राज्यातील पशुधनाच्या आरोग्यासाठी दर्जेदार सेवा थेट पशुपालकांच्या दारापर्यंत पोहचवणे हा आहे. ग्रामीण भागातील पशुपालकांना त्यांच्या जनावरांसाठी त्वरित व दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात आणि त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरते.
मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना – Mukhyamantri Pashu Swasthya Yojana:
सन 2017 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मा. अर्थमंत्र्यांनी मुख्यमंत्री पशुस्वास्थ (Mukhyamantri Pashu Swasthya Yojana) योजनेची घोषणा केली होती. त्यात राज्यात 349 फिरते पशुवैद्यकीय दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. मुख्यमंत्री पशुस्वास्थ (Mukhyamantri Pashu Swasthya Yojana) योजनेचा प्राथमिक टप्पा 2019 मध्ये राबविण्यात आला, ज्यात 80 नवीन फिरते पशुवैद्यकीय पथके सुरू करण्यात आली.
ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी बहुल भागात पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे. अशा भागात पशुपालकांना जनावर आजारी पडल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यात जाण्यासाठी मोठा आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पशुधन मृत्यूचा आणि आर्थिक नुकसानाचा धोका असतो. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री पशुस्वास्थ (Mukhyamantri Pashu Swasthya Yojana) योजना राबवण्यात आली.
योजनेचे स्वरूप:
मुख्यमंत्री पशुस्वास्थ (Mukhyamantri Pashu Swasthya Yojana) योजनेत खालील बाबी अंतर्भूत आहेत:
फिरते पशुवैद्यकीय पथक: ही पथके विशेष उपकरणांनी सुसज्ज असलेल्या वाहनांद्वारे कार्यरत असतील. या पथकांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, वाहनचालक व मदतनीस यांचा समावेश असेल.
उपलब्ध सेवा: कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व तपासणी, गाभण तपासणी यांसारख्या सेवा पथकाद्वारे पुरविल्या जातील.
संपर्क सुविधा: टोल फ्री क्रमांक आणि कॉल सेंटरसह अॅपच्या माध्यमातून सेवा मागवता येईल.
योजनेत समाविष्ट उपकरणे व औषधे:
पथकातील वाहनांमध्ये खालील महत्त्वाची उपकरणे असतात:
कास्टिंग उपकरणे (पशुधनास पकडण्यासाठी दोरी, जाळी)
शस्त्रक्रियेसाठी आवश्यक औषधे (झायलाझाईन, केटामाईन, डाएझेपाम)
तात्पुरते अस्थीभंग लसीकरणासाठी स्प्लिंट, आयव्ही कॅथेटर
प्राथमिक उपचाराचे साहित्य (सुई, सूत, बॅन्डेज)
सेवा क्षेत्र:
मुख्यमंत्री पशुस्वास्थ (Mukhyamantri Pashu Swasthya Yojana) योजनेअंतर्गत प्रथमतः 80 तालुक्यांत फिरते पथक सुरू करण्यात आली आहेत. यात मुरबाड, मोखाडा, दापोली, जुन्नर, मावळ, खटाव, कवठेमहांकाळ, बागलाण, सोयगाव, देवणी, देगलूर, कारंजा, नरखेड, तूमसर, मुलचेरा, भद्रावती अशा विविध दुर्गम व आदिवासी भागांचा समावेश आहे.
योजनेचे फायदे:
पशुपालकांसाठी त्वरित मदत: पशुपालकांना पशुधन आजारी पडल्यावर दवाखान्यात न्यायची गरज नाही, सेवा थेट घरीच मिळते.
आर्थिक बचत: वाहतुकीचा खर्च वाचतो आणि उपचार वेळेवर मिळाल्याने पशुधनाचे प्राण वाचतात.
दुधाळ जनावरांची उत्पादकता वाढते: निरोगी पशुधनामुळे दूध उत्पादनात वाढ होते.
ग्रामीण अर्थव्यवस्थेस चालना: पशुपालकांचा आर्थिक स्तर सुधारतो.
प्रशासनिक रचना:
आयुक्त पशुसंवर्धन हे मुख्यमंत्री पशुस्वास्थ (Mukhyamantri Pashu Swasthya Yojana) योजनेचे राज्यस्तरीय नियंत्रण अधिकारी आहेत.
विभागीय व उपआयुक्त पशुसंवर्धन हे विभागीय पातळीवर योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहेत.
तालुका स्तरावर उपविभागीय पशुसंवर्धन अधिकारी जबाबदारी पार पाडतात.
निधी व्यवस्थापन:
मुख्यमंत्री पशुस्वास्थ (Mukhyamantri Pashu Swasthya Yojana) योजनेकरिता आवश्यक निधी शासनाच्या मंजूर लेखाशिर्षांखाली मंजूर करण्यात आला आहे. अंदाजे खर्चात वाहन व उपकरणांसाठी 12.80 कोटी रुपये व मनुष्यबळ, इंधन, औषधे यासाठी 3.94 कोटी रुपयांची तरतूद आहे.
भविष्यातील योजना:
मुख्यमंत्री पशुस्वास्थ (Mukhyamantri Pashu Swasthya Yojana) योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर उर्वरित तालुक्यांत देखील फिरते पशुवैद्यकीय पथक सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व पशुपालकांना ही सुविधा मिळणार आहे.
मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना (Mukhyamantri Pashu Swasthya Yojana) ही महाराष्ट्रातील पशुपालकांसाठी वरदान ठरत आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात ही योजना पशुधनाच्या आरोग्य सुधारण्यासाठी मोठा हातभार लावत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि राज्यातील दुग्ध व्यवसाय, पशुपालन अधिक बळकट होईल.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय:
- मुख्यमंत्री पशुस्वास्थ (Mukhyamantri Pashu Swasthya Yojana) योजना.. पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरु करण्याबाबत शासन निर्णय (13-06-2025) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरू करणेबाबत शासन निर्णय (25-02-2019) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना (Mukhyamantri Pashu Swasthya Yojana) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा !
- मोबाईलवर पशुसल्ला मिळवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे फुले अमृतकाळ ॲप डाउनलोड करा !
- पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण योजना – Livestock Health and Disease Control
- राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM); शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – National Livestock Mission
- मनरेगा आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचे अभिसरण !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!