नोकरी भरतीवृत्त विशेष

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अप्रेंटिस पदाच्या 612 जागांसाठी भरती

ITI उत्तीर्ण करून चांगल्या संधीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अप्रेंटिस भरती 2026 (BMC Apprentice Bharti 2026) अंतर्गत विविध ITI ट्रेडमधील एकूण 612 शिकाऊ उमेदवार पदे निश्चित करण्यात आली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागाने शिकाऊ उमेदवार अधिनियम, 1961 अंतर्गत ही भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना महानगरपालिकेच्या विविध खाते, विभाग आणि रुग्णालयांमध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या भरतीसाठी खास भरती मेळावा 20 आणि 21 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारांना उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज करून परीक्षा देण्यापेक्षा या भरतीची प्रक्रिया काहीशी वेगळी आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह भरती मेळाव्यात उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका अप्रेंटिस भरती – BMC Apprentice Bharti 2026:

जाहिरात क्र.: प्रकाअ/५८५/एमसी दि. 11.08.2026

एकूण : 612 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पदाचे नावपदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)612
एकूण 612

ट्रेड नुसार तपशील:

अ. क्रट्रेडपद संख्या
1इलेक्ट्रिशियन40
2प्लंबर66
3रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक06
4ड्राफ्ट्समन सिव्हिल05
5टर्नर04
6डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर03
7मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर04
8डिझेल मेकॅनिक87
9मशिनिस्ट01
10वायरमन33
11फिटर58
12मेसन (बिल्डिंग कंस्ट्रक्शन)28
13कारपेंटर20
14पेंटर जनरल13
15मेकॅनिक मोटर व्हेईकल39
16वेल्डर16
17कोपा154
18पंप ऑपरेटर कम मेकॅनिक35
एकूण 612

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

वयाची अट: किमान 14 वर्षे पूर्ण

नोकरी ठिकाण: मुंबई

फी : फी नाही

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

भरती मेळाव्याचे ठिकाण: जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोवंडी, एस. टी. वर्कशॉप जवळ, किरोळ रोड, विद्याविहार (प), मुंबई 400 086

महत्त्वाच्या तारखा: 

  • भरती मेळावा (अ. क्र.1 ते 9): 20 ऑगस्ट 2026 (10:00 AM ते 05:00 PM)
  • भरती मेळावा (अ. क्र.10 ते 18): 21 ऑगस्ट 2026 (10:00 AM ते 05:00 PM)

जाहिरात (RRB Technician Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन नोंदणी (Apply Online Registration for RRB Technician Bharti 2026): ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया कशी होईल?

बृहन्मुंबई महानगरपालिका अप्रेंटिस भरती 2026 (BMC Apprentice Bharti 2026) मध्ये स्वतंत्र लेखी परीक्षा किंवा ऑनलाइन CBT घेण्याऐवजी ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे.

जाहिरातीनुसार केवळ महाराष्ट्र राज्यातून ITI उत्तीर्ण झालेले उमेदवार Apprenticeship India पोर्टलवर Login करून Apprenticeship Opportunities मध्ये MCGM ही संस्था निवडतील.

यानंतर भरती मेळाव्यात उमेदवाराने सादर केलेल्या अर्जानुसार, अंतिम ITI परीक्षेत मिळालेल्या अधिकतम गुणांच्या आधारे, तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाच्या नियमानुसार निवड केली जाईल.

दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवारांचे गुण समान असल्यास जन्मतारखेनुसार ज्येष्ठ उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

उमेदवारांनी कोणती काळजी घ्यावी?

अर्जामध्ये चुकीची माहिती देणे टाळावे. खोटी माहिती किंवा चुकीची कागदपत्रे सादर केल्याचे आढळल्यास प्रशिक्षण रद्द केले जाऊ शकते. नियुक्तीनंतर ही बाब लक्षात आली तरी करार रद्द होण्याची शक्यता आहे.

तसेच उमेदवारांनी ई-मेल, मोबाइल क्रमांक आणि पत्ता अचूक भरावा. BMC ने भरती प्रक्रियेतील पुढील सूचना अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील, असे नमूद केले आहे.

या लेखात, आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये (BMC Apprentice Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 282 जागांसाठी भरती
  2. पंजाब नॅशनल बँकेत 545 जागांसाठी भरती
  3. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026
  4. इंडियन ओव्हरसीज बँकेत 250 जागांसाठी भरती
  5. कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 134 जागांसाठी भरती
  6. महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 | 30,209 रिक्त पदे | Pavitra Portal
  7. भारतीय रेल्वेत 4098 जागांसाठी भरती
  8. महाराष्ट्र राज्य तलाठी भरती 2026
  9. कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती 2026
  10. IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी मेगाभरती
  11. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती 2026
  12. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2026
  13. DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
  14. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  15. सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
  16. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.