गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
राज्यात शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्ती, सर्पदंश , विचूदंशमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्याचा मृत्यू ओढवतो किंवा काहीना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पनाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य ( आई – वडील, शेतकऱ्याची पती / पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती ) असे १० ते ७५ वयोगटातील एकूण २ जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास संदर्भ क्र. ( १ ) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सुधारित स्वरूपातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यासाठी संदर्भ क्र. ( २ ) येथील शासन परिपत्रकान्वये कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येणार आहेत.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना:
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्यामध्ये राबविण्यासाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीची व ऑक्झॉलियम इन्शुरन्स ब्रोकिंग, प्रा. लि या विमा सल्लागार कंपनीची स्पर्धात्मक ई-निविदेच्या माध्यमातून संदर्भ क्र. (3) नुसार निवड करण्यात आलेली आहे. त्यानुसार विमा कंपनीस विमा हप्ता अदा केल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत योजना राबविण्यासाठी विमा कंपनी व विमा सल्लागार कंपनी यांची नियुक्ती करणे तसेच विमा हप्ता व विमा ब्रोकरेज निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे.
1. “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन 2021-22 मध्ये राबविण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत असून संबंधित विमा कंपनीला विमा हप्त्याचे प्रदान केल्यापासून 12 महिन्याच्या कालावधीकरिता विमा योजना चालू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येणार आहे.
2. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संपूर्ण राज्यामध्ये दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि .या विमा कंपनीमार्फत प्रति शेतकरी प्रति वर्ष रु.29.07 इतक्या विमा हप्ता दराने (विना ब्राकरेज) व ऑक्झॉलियम इन्शुरन्स ब्रोकिंग, प्रा. लि . या विमा सल्लागार कंपनीमार्फत ठाणे, नाशिक, अमरावती, व नागपूर या महसूल विभागासाठी 0.0६५ टक्के तर पुणे व औरंगाबाद या महसूल विभागासाठी 0.070 टक्के इतका विमा ब्रोकरेज दराने राबविण्यास शासनाची मान्यता देण्यात येणार आहे.
3. सन 2021-22 मध्ये विमा हप्ता रकमेचे विमा कंपनीला प्रदान झाल्यापासून 12 महिने इतक्या कालावधीकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला एक सदस्य यांना विविध अपघातांपासून संरक्षण देण्यासाठी विमा कंपनीला व विमा सल्लागार कंपनीस अदा करावयाची विमा हफ्ता रक्कम व विमा ब्रोकरेज रक्कम तसेच आयुक्त कार्यालयास कार्यालयीन खर्चासाठी रक्कम खालील शासन निर्णया नुसार निश्चित करण्यात येणार आहे.
विमा कंपनीस, विमा सल्लागार कंपनीस वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे १२ महिने कालावधी करीता होणारी विमा हप्ता व विमा ब्राकरेज रक्कम तसेच आयुक्त ( कृषी ) कार्यालयीन खर्चासाठी एकूण रक्कम रु. 88,44,04,662/- मंजूर करण्यात येणार आहेत.
4. विमा कंपनी व विमा सल्लागार कंपनीस देय ठरणारी विमा हप्ता रक्कम विभागून दोन हप्त्यात देण्यात येणार आहे.
5 . “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना” शासन निर्णय दि 31 ऑगस्ट, 2019 व दि. 19 सप्टेंबर,2019 मध्ये नूमद तरतूदी व अटींनुसार राबविण्याची जबाबदारी आयुक्त (कृषी ) यांची राहणार आहे.
7. प्रस्तुत प्रयोजनासाठी आयुक्त (कृषी ), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,पुणे याना नियंत्रक अधिकारी, तसेच, सहाय्यक संचालक (लेखा-1), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,पुणे याना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.