ग्रामपंचायत नमुना ८ (घरठाण उतारा) – ऑफलाईन व ऑनलाईन उतारा कसा काढावा?
गावातील ग्रामपंचायत हद्दीमधील येणाऱ्या क्षेत्रात आणि करास पात्र असलेल्या सर्व जमिनी, खुली जागा व घरे, इमारती यांची ग्रामपंचायतीने मान्यता दिलेले यादी त्यांची नोंद नमुना नं ८ (Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara) कर आकारणी वहीत केली जाते त्याला आकरणी नोंदवही म्हटले जाते. या नोंदवही मध्ये ग्रामपंचातमध्ये येणाऱ्या सर्व करांच्या मिळकतीचे वर्णन असते यामध्ये उदा. इमारतीचे वर्णन त्याची लांबी- रुंदी क्षेत्रफळ व त्यांची किंमत तसेच कर आकारणी असते, याला ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara) असे म्हटले जाते.
ग्रामपंचायत नमुना ८ (घरठाण उतारा) Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara:
गावामध्ये आपले घर किंवा खुली जागा गावठाण क्षेत्रामध्ये येत असेल, तर त्याची नोंद ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara) ला केली जाते व त्याची कर आकारणी सुद्धा केली जाते. यामध्ये आपल्या घराचे मिळकतीचे उल्लेख असेलेले पत्रक असते त्यामध्ये ग्रामपंचायतचा कर म्हणजेच घरपट्टी, दिवाबत्ती, आरोग्य, पाणीकर असे कर आकारले जातात. त्याच प्रमाणे आपल्या मालमत्तेवर आपण जर कर्ज काढले असेल तर त्याचा सुद्धा उल्लेख ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara) मध्ये केला जातो.
ग्रामपंचायत नमुना ८ (घरठाण उतारा) म्हणजे काय?
ग्रामपंचायतीकडून गावातील सर्व घरांची, इमारतींची आणि खुल्या जागांची नोंद नमुना ८ मध्ये केली जाते.
यामध्ये खालील तपशील नमूद असतो –
मालकाचे नाव व पत्ता
घर/जागेचे क्षेत्रफळ (लांबी–रुंदी, चौरस मीटर/फुट)
इमारतीचे वर्णन, बांधकामाचे वर्ष
भांडवली मूल्य, घसारा दर
कराचे प्रकार (घरपट्टी, नळपट्टी, आरोग्यकर, पाणीकर इ.)
जर मालमत्तेवर कर्ज असेल तर त्याची नोंद
हा उतारा विविध शासकीय कामांसाठी गरजेचा असतो.
ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (घरठाण उतारा – Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara) विविध शासकीय कामांसाठी गरजेचा असतो, जसे की मिळकत प्रमाणपत्र, कर्ज घेण्यासाठी उपयोगी पडतो, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी घरठाण उतारा उपयोगी पडतो.
ग्रामपंचायत नमुना ८ (घरठाण उतारा) का महत्त्वाचा आहे?
मालमत्तेची अधिकृत नोंद – तुमची मालमत्ता ग्रामपंचायतीकडे नोंदलेली असल्याचे पुरावा.
शासकीय योजना – विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी गरजेचा.
कर्जासाठी उपयोग – बँक कर्ज घेताना मागवला जातो.
मालमत्ता प्रमाणपत्रासाठी आवश्यक.
कर आकारणीसाठी – घरपट्टी, पाणीकर यांची माहिती यात असते.
ऑफलाईन अर्ज प्रोसेस – Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara Offline:
ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (घरठाण उतारा) ऑफलाईन मिळवण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत मध्ये सचिव ( ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी) ला उद्देशून लेखी विनंती अर्ज करावा लागतो, त्यानंतर आपल्याला आपल्या नावे ग्रामपंचायत दप्तरी ज्या मिळकती नोंद असतील याचा उतारा मिळून जाईल.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे:
- घराचा जागेचा ७/१२ उतारा
- खरेदी पत्र/बक्षीस पत्र
- चतुसिमा (रु. १०० च्या बॉंड पेपरवर)
- आणेवारी संमती पत्र.
ग्रामपंचायत नमुना 8 (घरठाण उतारा) मिळणेबाबत अर्ज नमुना PDF फाईल: ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा (घरठाण उतारा) मिळणेबाबत अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज प्रोसेस – Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara Online:
ग्रामपंचायत घराचा/घरठाण उतारा ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची”
https://aaplesarkar.mahaonline.gov.in हि वेबसाईट ओपन करायची आहे.
त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन नोंदणी करावे लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी (युजर प्रोफाईल) कशी करायची? हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे.
नोंदणी झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.

आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.
त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “ग्रामविकास व पंचायत राज विभाग” हा पर्याय निवडायचा आहे.
हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यु नोंद दाखला, निराधार असल्याचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला, विवाह नोंद दाखला, असे विविध पर्याय दिसतील, त्यामध्ये “नमुना 8 चा उतारा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करा.

त्यानंतर “महाऑनलाईन” हे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये “Assessment Certificate” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

नमुना ८ नियम ३२ (१) नुसार खालील प्रमाणे अर्जदाराची माहिती आणि नमुना ८ उताऱ्यानुसार संपूर्ण तपशील भरा.
- जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव, आणि ग्रामपंचायतीचे नाव.
- रस्त्याचे नाव / गल्ली चे नाव, गट क्र. / भूमापन क्र. / नगर भूमापन, मालमत्ता क्रमांक
- मालकाचे (धारण करणाऱ्याचे) नाव, भोगवटा करणाऱ्याचे नाव,
- मालमतेचे वर्णन, मिळकत बांधकामाचे वर्ष (मिळकतीचे वयोमान वर्षांमध्ये)
- क्षेत्रफळ चौ. मी / (चौ.फू), जमीन, इमारत, बांधकाम, घसारा दर, इ. वापरा नुसार भारांक, भांडवली मूल्य, कराचा दर.
- इमारत कर, दिवाबत्ती कर, आरोग्य कर.
- सर्वा. / खा स. पा. पट्टी, इमारत कर, दिवाबत्ती कर, नंतर वाढ किंवा घट झालेल्या बाबतीत आदेशाच्या संदर्भात शेरा.
अर्जदाराची माहिती आणि नमुना ८ उताऱ्यानुसार संपूर्ण तपशील भरल्यानंतर ‘Apply‘ बटनवर क्लिक करा आणि ‘Application Id‘ जतन करून ऑनलाईन पेमेंट करा. अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ७ दिवसांमध्ये आपले सरकार मध्ये लॉगिन करून, ग्रामपंचायत नमुना ८ चा उतारा (Grampanchayat Namuna 8 Gharthan Utara) डाऊनलोड करू शकता.
ग्रामपंचायत नमुना ८ (घरठाण उतारा) चे फायदे:
गावठाणातील मालमत्तेचे अधिकृत प्रमाणपत्र मिळते.
मालमत्तेच्या कायदेशीर व्यवहारांसाठी महत्त्वाचा.
शासकीय अनुदान, योजना, कर्ज, प्रमाणपत्र मिळवताना उपयोगी.
मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी महत्वाचा दस्तऐवज.
ग्रामपंचायत नमुना ८ (घरठाण उतारा) हा मालमत्ताधारकांसाठी एक अतिशय महत्वाचा दस्तऐवज आहे. तो काढण्यासाठी ऑफलाईन ग्रामपंचायत कार्यालयातून किंवा ऑनलाईन आपले सरकार पोर्टलवरून अर्ज करता येतो.
शासकीय कामे, कर्ज, मालमत्ता प्रमाणपत्र किंवा योजनांचा लाभ घेण्यासाठी हा उतारा अत्यावश्यक आहे. त्यामुळे वेळेवर हा उतारा काढून ठेवणे प्रत्येक घरमालकासाठी गरजेचे आहे.
FAQ – ग्रामपंचायत नमुना ८ (घरठाण उतारा)
Q1. ग्रामपंचायत नमुना ८ (घरठाण उतारा) म्हणजे काय?
– गावठाण क्षेत्रातील घर/मालमत्तेची नोंद असलेला अधिकृत उतारा.
Q2. नमुना ८ चा उतारा कुठे लागतो?
– शासकीय योजना, बँक कर्ज, मालमत्ता प्रमाणपत्र, कर आकारणीसाठी.
Q3. हा उतारा ऑफलाईन कसा काढायचा?
– ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करून आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात.
Q4. ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे?
– आपले सरकार पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करून ७ दिवसांत उतारा डाउनलोड करता येतो.
Q5. ऑनलाईन अर्जासाठी कोणती माहिती लागते?
– जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत नाव, गट क्रमांक, घर तपशील, मालकाचे नाव, क्षेत्रफळ, कर माहिती.
पुढील लेख देखील वाचा!
- तलाठी कार्यालयातील – गाव नमुना १ ते २१ नोंदवही विषयीची संपूर्ण माहिती!
- ग्रामपंचायत नमुना 1 ते 33 (अभिलेख) विषयीची सविस्तर माहिती – ग्रामपंचायत नमुना 1 ते 33 PDF फाईल डाउनलोड करा
- तलाठ्याची कर्तव्ये कोणती आहेत? तलाठ्याकडून माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकार अर्ज कसा करायचा?
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!


Gharacha utara
How to find Land Gut/Survey No. from Namuna No.8 of a House in Grampanchayat?
घराच्या जागेच्या सातबाऱ्यावर पहा!