ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे ऑनलाईन कसं पाहायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती !
ग्रामपंचायत मध्ये मनरेगा अंतर्गत वैयक्तिक तसेच सार्वजनिक कामांच्या माध्यमातून जसं की शेततळं बांधणं, फळबागेची लागवड या कामांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देणं हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. पण, रोजगाराची हमी मिळाल्यानंतर तुमच्या गावात मनरेगाअंतर्गत कोणती कामं सुरू आहेत, त्यांचं स्टेटस काय आहे, हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे. या लेखामध्ये आपण ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेचे पैसे (MGNREGA Payment) खात्यावर जमा झाले की नाही हे ऑनलाईन कसं पाहायचं? याची सविस्तर माहिती पाहूया.
आजच्या या लेखात आपण मनरेगा पेमेंट, NREGA Job Card Payment Status, ग्रामपंचायत मनरेगा पेमेंट, NREGA FTO Status, NREGA muster roll payment, job card payment list अशी सर्व माहिती एकाच ठिकाणी सोप्या उदाहरणांसह पाहणार आहोत.
मनरेगाचं पेमेंट कसं पाहायचं?- MGNREGA Payment:
ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेचे पैसे (MGNREGA Payment) खात्यावर जमा झाले की नाही हे ऑनलाईन पाहण्यासाठी सर्व प्रथम खालील लिंक वर क्लिक करून महात्मा गांधी नॅशनल रुरल इम्प्लॉयमेंटची वेबसाइट (नरेगा) ची वेबसाइट ओपन करा.
https://nrega.dord.gov.in/MGNREGA_new/Nrega_home.aspx
नरेगाची वेबसाइटओपन केल्यानंतर Reports या पर्यायावर क्लिक करा. पुढे Captcha Code टाकून व्हेरिफाय करा.
आता इथे सुरुवातीला फायनान्शियल ईयरमध्ये आर्थिक वर्ष निवडायचं आहे, त्यानंतर आपले राज्य महाराष्ट्र निवडायचं आहे.
पुढे Job Card Related Reports मध्ये Category wise Household/Workers वर क्लिक करा आणि जिल्हा, तालुका आणि मग गाव निवडायचं आहे.
यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमच्या ग्रामपंचायतीत मनरेगाचे जितके जॉब कार्ड रेजिस्टर आहे, नोंदणी झालेली आहे ते तिथं येतील. महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्डसाठी नोंदणी अर्ज कसा करायचा ? हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे.
इथं जॉब कार्डचा नंबर आणि ते कुणाच्या नावावर आहे, हेसुद्धा दिसेल. त्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीचं जॉब कार्ड पाहायचं आहे त्या व्यक्तीच्या नावासमोरील जॉब कार्ड नंबरवर क्लिक करायचं आहे.

जॉब कार्ड :
त्यानंतर संबंधित व्यक्तीचं जॉब कार्ड ओपन होईल. यावर सुरुवातीला संबंधितांचं नाव, पत्ता, ही माहिती दिलेली असेल.

त्यानंतर Requested Period of Employment या रकान्यात या व्यक्तीनं रोजगारासाठी कधी विनंती केली ते दिलेलं असेल.

Period and Work on which Employment Offered मध्ये या व्यक्तीला रोजगार कधी ऑफर करण्यात आला आणि त्या कामाचं नाव काय आहे, याची माहिती दिलेली असते.

Period and Work on which Employment Given मध्ये कालावधी आणि काम ज्यावर रोजगार दिला, याची माहिती दिलेली असते.

मनरेगाचं पेमेंट (MGNREGA Payment) पाहण्यासाठी तुम्हाला ज्या कामासाठी रोजगार मिळाला, त्या कामाचं जे नाव आहे, (Work Name) त्याच्यावर क्लिक करायचं आहे.
यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. ज्यात हे काम कधी सुरू करण्यात आलं आहे, त्याचं स्टेटस काय आहे इत्यादी माहिती सांगितलेली असेल.
यानंतर पुढे असलेल्या Distinct Number of Muster Rolls used(Amount) या रकान्यात हजेरी पट क्रमांक दिलेली असतील.
या हजेरी पट क्रमांकावर क्लिक केलं की, हजेरीपट क्रमांकावरील काम, त्याचा दिनांक आणि नाव तिथं दाखवलं जाईल.

त्यानंतर Measurement Book Detail या रकान्यात या कामासाठी रोजगार मिळालेल्या व्यक्तींची नावं, त्यांना किती दिवसांची मजुरी केली , प्रतिदिन किती रुपये मजुरी मिळाली आणि एकूण मजुरीची रक्कम संबंधितांच्या नावासमोर दिलेली असेल. त्यानंतर पुढे Status या रकान्यात मजुरीची रक्कम खात्यावर जमा झाली हे नमूद केलेलं असेल.

Status समोर Credited असं नमूद असेल तर मजुरीची रक्कम खात्यात जमा झाली असा त्याचा अर्थ होतो. पुढे A/c Credited Date या रकान्यात संबंधितांच्या खात्यात ते पैसे किती तारखेला जमा झाले, याची माहिती दिलेली असते.
मनरेगा पेमेंट बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1) मनरेगा पेमेंट (MGNREGA Payment) किती दिवसात येते?
साधारणपणे 7–15 दिवसांत मजुरी खात्यात जमा होते.
2) मनरेगा पैसे जमा झाले का हे कसं कळतं?
Measurement Book मध्ये Status = Credited दिसल्यास पैसे आले आहेत.
3) NREGA Job Card Payment Status कुठून पाहायचा?
अधिकृत साइटवर Reports → Job Card → Work → Muster Roll → MB Details.
4) FTO Status Success म्हणजे काय?
सरकारकडून पैसा बँकेकडे पाठवला आहे.
5) मनरेगा पेमेंट अडकण्याची कारणे कोणती?
बँक खाते लिंक नसणे
आधार सीडिंग नसणे
बायोमेट्रिक mismatch
जॉबकार्डवरील चुकीची माहिती
या लेखात, आम्ही ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेचे पैसे (MGNREGA Payment) खात्यावर जमा झाले की नाही हे ऑनलाईन कसं पाहायचं?विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणा-या मजुरांना मस्टर बंद होण्याच्या 8 दिवसाच्या आत मजूरी मिळणार, शासन निर्णय जारी
- महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत जॉब कार्डसाठी अर्ज कसा करायचा? जॉब कार्ड यादी मध्ये ऑनलाईन नाव तपासा!
- ग्रामरोजगार सेवक मनरेगा हजेरीपट निर्गमित करणार !
- ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले की नाही हे ऑनलाईन कसं पाहायचं? जाणून घ्या सविस्तर माहिती – Measurement Book & Mustroll Detail
- मनरेगा संबंधित तक्रार आणि सुचना ऑनलाईन नोंदवा ! Register MNREGA related complaints and suggestions online!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

